प्रमोद शिंदे

समीर नवगिरेंवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करा….रामदास आठवले सामाजिक न्याय राज्य मंत्री

समीर नवगिरेंवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करा….रामदास आठवले सामाजिक न्याय राज्य मंत्री

मिरे एट्रोसिटी प्रकरणातील आरोपींवर मोक्का कायदा लावून स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याचा अहवाल विशेष न्यायालयात पाठवावा….रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निर्देश

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मिरे ता.माळशिरस जि. सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते समीर अरुण नवगिरे व सुदीप बाळकृष्ण नष्टे यांच्यावर दिनांक 1 जुन 2020 रोजी एट्रॉसिटी दाखल केल्याचा राग मनात धरून प्राणघातक हल्ला झाला होता.सुदीप नष्टे यांच्या फिर्यादीवरून राजू गुंड याच्यासह 11 आरोपींवर अकलूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा.रजी.नं.256/2020 भा.द.वी.307 व एट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झाल्याने पोलीस अधीक्षक मा.मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना स्थानीक पोलीस प्रशासनास दिल्या होत्या
उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज मा.नीरज राजगुरू यांनी अतिशय सखोल गुणवत्तेच्या आधारावर तपास करून दिनांक 24 जुलै 2020 रोजी आरोपपत्र भा.द.वी.120 (ब),143,147,148,149,307,323,326,329,341,395,504,506अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा सुधारणा 2015 कलम 3(1)आर,एस,वाय,यु,3(2)व्ही ए,3(2)व्ही नुसार मे.विशेष न्यायालय माळशिरस येथे दाखल केले आहे.तपासात आरोपींनी कट करून संगनमताने समीर नवगिरे व सुदीप नष्टे यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे.या गुन्ह्यातील दोन आरोपी विजय गुंड व बबलू गुंड हे अद्याप फरार आहेत.नऊ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.आरोपी हे वाळू तस्कर असल्याने विविध पोलीसस्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.घटना घडल्यापासूनच आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते मा.विकास दादा धाइंजे व नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव यांनी पीडितांना मदत केली आहे.वैभव गिते यांनी मा.रामदासजी आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांची भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली.
रामदासजी आठवले यांनी या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करून यांची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याचा अहवाल मे.विशेष न्यायालयात दाखल करवा तसेच फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर पुन्हा हल्ला होऊ नये म्हणून एट्रोसिटीचे खटले संपेपर्यंत मिरे या गावात पोलीस संरक्षण ठेवावे असे निर्देश विशेष पोलीस महानिरीक्षक कैसर खालिद,सोलापुर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहेत.

पत्रकार सुनील राऊत यांनी दीक्षित गुरुकुलला 25 हजार देणगी देऊन मुलीचा विवाह सोहळा केला साजरा

सुनील राऊत यांनी दीक्षित गुरुकुलला 25 हजार देणगी देऊन विवाह सोहळा केला साजरा

पुरोगामी महाराष्ट्र नवीन नेटवर्क -नातेपुते येथील ज्येष्ठ पत्रकार व शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक सुनील राऊत यांनी आपली कन्या केतकी हिच्या विवाह प्रसंगी महाराष्ट्र बंधू राजीव दीक्षित गुरुकुलला पंचवीस हजार रुपये देणगी देऊन सामाजिक भान राखत वेगळ्या पद्धतीने विवाह सोहळा साजरा केला.
पत्रकार सुनील राऊत यांची कन्या केतकी व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांचे चिरंजीव निखील यांचा शुभविवाह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स व इतर नियमांचे पालन करत पार पडला.
यावेळी युवकमित्र ह.भ.प.बंडातात्या कराडकर, श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष ह.भ.प.संजय महाराज धोंडगे, माजी आमदार रामहरी रुपनवर,श्रीमती पद्मजादेवी मोहिते-पाटील, माजी आमदार योगेश टिळेकर,उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील,बाबाराजे देशमुख, डॉ. एम. पी.मोरे, धैर्यशील देशमुख, सरपंच ॲड. बी.वाय. राऊत,ॲड.डी.एन.काळे, सोपानराव नारनवर व इतर मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे, चंद्रकांत कुंभार, मिलिंद गिरमे, व्यसनमुक्त युवक संघाचे प्रदेश सचिव विवेक राउत यांनी केले.

चि. सौ. केतकी व चरंजिवं निखिल

मोटारसायकली चोरी करणाऱ्यांना दोघा संशयितांना पोलीसांनी केली अटक

मोटारसायकली चोरी करणाऱ्यांना दोघांना पोलीसांनी केली अटक

अवघ्या बारा तासात प्रकरणाचा लावला झडा परांडा पोलीसांची धडक कारवाई

जवळा नि/सिरसाव प्रतिनिधी अजिनाथ राऊत
परांडा तालुक्यातील भांडगाव येथील धन्यकुमार मधुकर अंधारे यांची दुचाकी क्र. MH 25 A7543 चोरी गेल्याची तक्रार दि 01/08/2020 रोजी जवळा नि औटपोस्ट येथे देण्यात आली होती.
त्यानुसार सदर प्रकरणी परांडा पोलीसात अज्ञात चोरट्याविरुंध्द गु.र.न – 193/2020 कलम 379 भा.द.वी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रार दाखल होताच त्याच दिवशी रात्री बाराच्या नंतर पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे जलदगतीने फिरवत नाईट पेट्रोलीग दरम्यान वारदवाडी येथे सापळा रचण्यात आला होता. तिथुन दोन दुचाकी घेऊन जाणाऱ्या इसमांचा पोलीसांना संशय आल्याने पोहेका-काळेवाड,पोना-कळसाईन पोना काटवटे,पोका माळी ,पोका कवडे ,पोहेका शेंडगे यांनी सदर इसमांचा सिंघम स्टाईल पाठलाग करुन दोन संशयत इसमांना पकडून मोटर सायकलसह ताब्यात घेण्यात आले आहे.
त्याचेकडे अधिक तपास करता त्यातील आरोपी महादेव सुरेश पेटाडे वय 21वर्षे असुन त्यास दिनांक 06/08/2020 पावेतो पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. दुसरा आरोपीचे वय 17 वर्षे असुन अल्पवयीन असल्याने त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांचे ताब्यातील दोन्ही मोटर सायकली चोरीच्या आहेत अशी माहिती मिळाली. त्यात MH25-A 7543 हिरो होन्डा कंपणीची आहे तर दुसरी MH-13-BF7491 ही बार्शी येथिल आहे सदर दोन्ही मोटारसायकली जप्त करुन अधिक तपास परांडा पोलीस करत आहेत

अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त माळशिरस येथे एन डी एम जे यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*

अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त माळशिरस येथे एन डी एम जे यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-प्रमोद शिंदे-
नातेपुते-दि.2 ऑगस्ट .
माळशिरस येथे नॅशनल दलीत मोमेंट फोर जस्टीस (एन.ङी.एम.जे) माळशिरस तालुका युनिटच्या त्यांच्या वतीने 1ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या100 व्या जयंती व जन्मशताब्दी वर्ष निमित्त गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा वाटपाचा कार्यक्रम माळशिरस चे माजी सरपंच, उपविभागीय दक्षता समिती सदस्य विकासदादा धाईजे व एन.डी.एम.जे चे राज्य सचिव वैभव गीते यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. एन.डी.एम.जे माळशिरस तालुका युनिट च्या वतीने लॉकडाऊन चालू झाल्यापासून तीन ते चार महिने झाले कोरोना प्रादुर्भावा मुळे माळशिरस तालुक्यातील अनेक गरीब ऊस तोड कामगार,आदिवासी बांधव, स्थलांतरित कामगार यांची उपासमार होत असल्यामुळे आशा गरजू लोकांना गहू,तांदूळ,साखर,तेल,शेंगदाणे,साबण आशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यातआलेआहे.तसेच सर्व महापुरूषांच्या जयंती चे औचित्य साधून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आज अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून माळशिरस येथे गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमादरम्यान विकासदादा धाईजे म्हणाले की इतर कामगारांसोबत सध्या विविध क्षेत्रातील कलाकारांचे सुद्धा हाल होत आहेत.येत्या काळात लोकशाहिर, गायक,तमाशा कलाकार,जागरणात काम करणारे, बँड वाले या कलाकारांना सध्या कार्यक्रम नसल्यामुळे काम नाही अशा गरीब कलाकारांना सुद्धा जीवनावश्यक वस्तूंची मदत करणार आहोत. जोपर्यंत कोरणा प्रादुर्भाव आहे तोपर्यंत कोणत्याही गरीब व्यक्तीला उपाशी राहू देणार नाही असे मत विकासदादा धाईजे व वैभव गीते यांनी व्यक्त केले.यावेळी संजय झेंडे ,दत्ता कांबळे, संभाजी साळे ,रवि झेंडे,बाबासाहेब सोनवणे आदि उपस्थीत होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बुध्दभूषण धाईजे,भैय्या धाईजे, बुध्दभूषण बनसोङे यांनी परिश्रम घेतले.

पिरळे येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रतिमापूजन

पिरळे येथे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त प्रतिमापूजन –

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे- दि.1ऑगस्ट पिरळे तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे साहित्यसम्राट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी व जयंती निमित्त पिरळे ग्रामस्थांच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतीमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी पिरळे गावचे सरपंच ज्ञानदेव शिंदे, माजी सरपंच महादेव शिंदे,उपसरपंच दशरथ जाधव, मातंग युवा संघटना अध्यक्ष सुभाष खिल्लारे, जिल्हाध्यक्ष उमेश भैय्या खिलारे, सोमनाथ निकम,कालिदास दडस, भाऊसाहेब खिल्लारे,विजय खंडागळे,सागर खिलारे,तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते

सत्यशोधक चळवळीचे रघुनाथ ढोक सर वाढदिवस विशेष

रघुनाथ श्रीरंग ढोक हे माण(वावरहिरे) व नातेपुते चे रहिवाशी असून त्यांचे बालपणीचे शिक्षण वावरहिरे,नातेपुते,चंद्रपुरी व पुणे माध्यमिक तसेच कॉलेज शिक्षण बीकॉम व नुकतेच 25 वर्षानंतर एम ए मराठी पूर्ण केले आहे.गेली अनेक वर्षांपासून पुणे येथे रहात आहेत.ते गेली अनेक वर्षापासून महाराष्ट्र परिसरात राष्ट्रीय ओबीसी महासंघ ,फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन, मुद्रणम्हर्षी डॉ प.भ.कुलकर्णी,अखिल भारतीय माळी प्रबोधन शिक्षण संस्था व इतर संस्थेचे माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहेत.त्यांना विविध संस्थेचे पुरस्कार मिळाले असुन मानाचा पुरस्कार पुणे महानगरपालिकेने सामाजिक ,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील 15 ऑगस्ट 2018 रोजी पालकमंत्री व अन्नपुरवठा मंत्री खा.गिरीष बापट यांचे शुभहस्ते व महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांचे उपस्थित दिला होता.तसेच ते पंढरपूर येथे समता पुरस्कार, पुणे येथे सत्यशोधक पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत.सद्या त्यांनी महाराष्ट्रात सत्यशोधक पद्धतीने आंतरजातीय, धर्मीय,स्वजातीय,घटस्फोटीत, विधवा,बीजवर,आंतरराष्ट्रीय व दिव्यांग असे 20 सत्यशोधक विवाह मोफत स्वखर्चाने अनेक ठिकाणी जाऊन लावले.त्या मध्ये बरेच सत्यशोधक विवाह त्या त्या भागात पहिले होते.तसेच या कोव्हिडं 19 मध्ये देखील 5 सत्यशोधक विवाह बाहेर गावी जाऊन देखील लावले आहेत.
ते पुणे येथे पुणे विध्यार्थी गृह इजि. कॉलेज मध्ये नोकरी करीत असून संस्थेचे पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून देखील काम करीत सामाजिक कार्य करीत आहेत.त्यांनी ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले रंगीत पुस्तक मराठी ,हिंदी,इंग्रजी सिक्कीम चे राज्यपाल खा.श्रीनिवास पाटील तर जर्मन नांदेड विद्यापीठ चे कुलगुरू डॉ.विद्या सागर व महापौर आणि मान्यवरांचे उपस्थित लेखक म्हणून प्रकाशित केले तसेच दीनांची साउली,विध्येची अधिष्ठात्री सावित्रीबाई फुले,व इतर पुस्तके प्रकाशित केली आहेत.दरवर्षी गरीब ,गरजू,गुणवंत विध्यार्थ्यांनचा सत्कार करीत असतात तसेच मान्यवरांचे देखील सन्मान करीत असतात.त्याचप्रमाणे ते महात्मा फुले यांचे वेशभूषेत बरेच ठिकाणी सहभाग घेतात तसेच दिवाळीमध्ये बळीराजा भूमिकेत ईडा पिडा टळो बळीच राज्य येवो या साठी सहभाग घेत असतात.ते फुले शाहु आंबेडकर यांचे कृतिशील पाईक असून ते अंधश्रद्धा, कर्मकांड यातून सर्व समाजाला बाहेर काडून विवाह प्रसंगी नाहक आर्थिक उधळपट्टी करून कर्जबाजारी होऊ नये म्हणून प्रयत्न करीत असतात तसेच ते विवाह देखील जमवितात.दरवर्षी सर्व समाजातील विधवा,घटस्फोट, व विधुर वधु वर यांचा मोफत मेळावे घेत असतात.त्यांनी पहिल्यादा हरियाणा कुरुक्षेत्र येथे सावित्री जोतिबा ग्रंथलयास गेल्या वर्षी छगन भुजबळ यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने थोरसमाज सुधारक महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांचे 3 पुटी फायबर चे पुतळे स्वखर्चाने 72 ग्रंथ भेटीसह पुण्यातून अनेकांना रेल्वेने स्वखर्चाने नेऊन तिकडे चांगला प्रथमच असा कार्यक्रम केला.तर त्यांनी आपले गावी मोफत सत्यशोधक सर्व समाजाचे विवाह लावणेसाठी वधु वर यांचे काही साहित्य,तसेच साऊंड सिस्टीम सर्व आधुनीक सोयीस्कर अशी सोयीसह सोय केली आहे.कारण माण चे लोकांनी विवाह वर होणारा खर्च त्यांनी वधु वर यांचे भविष्यासाठी वापरावा हा उद्देश असून त्या ठिकाणी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज,थोरसमाजसुधारक महात्मा फुले,स्त्री शिक्षणाचे जननी सावित्रीबाई फुले ,भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 3 पुटी फायबर चे पुतळे बसवून स्मारक केले आहे त्याचे उदघाटन झाले नसले तरी त्या ठिकाणी विवाह व इतर सत्यशोधक कार्य होत आहेत त्यासाठी त्यांनी बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र यांची निर्मिती केली आहे. सर्वाना आपलेशे वाटावे असे काम केले असले तरी सर्व समाजाने त्याचा फायदा ग्यावा अशी अपेक्षा आहे.समाजाचे काहीतरी देणे आहे आणि मानवनिर्मित जात मोडीत काडून सर्व स्त्री पुरुष समान आहेत फहक्त सर्वांनी मानवताधर्म पाळावा असे त्यांना नेहमी वाटते.त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देऊ या.
त्यांना आजच्या 1 ऑगस्ट 2020 दिनी वाढदिवसाच्या …तर्फे हार्दिक शुभेच्छा.

पत्रकार संपादक प्रमोद शिंदे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क9975903040

खुडूस येथे साहित्यरत्न लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सवात साजरी

खुडूस येथे साहित्यरत्न लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सवात साजरी

खुडूस प्रतिनिधी – मकरंद साठे

खुडूस येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती जन्मशताब्दीनिमित्त पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी युवा क्रांती सेना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मकरंद साठे, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब साठे,युवा क्रांती सेना संघटनेचे तालुकाध्यक्ष दिपक पवार, ए.बी.प्रतिष्ठाणचे महादेव लोखंडे, पांडुरंग साठे, दादासाहेब साठे, चंद्रकांत साठे, छगन लोखंडे, राम कांबळे, बंडू कांबळे,धनाजी साठे,पोपट साठे,स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे अश्वसेन गोरवे,शंकर सकट,अंकुश शिंदे रोहित साठे,माऊली साठे,वैभव गायकवाड,भागवत साठे,सचिन कांबळे,सुशांत गायकवाड कार्यकर्ते उपस्थित होते. साहित्यरत्न लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र साहित्याचा माणुस हा केंद्रबिंदू आहे.माणसाचे,माणुस असणारे मुल्य आणि त्याची मानवी प्रतिष्ठा,जगण्यासाठी धडपडणाऱ्यांची निष्ठा यासाठी अण्णाभाऊ साठे लिहित व गात राहिले. सर्वसामान्य माणसाला नायक,नायिका बनविणारे अण्णाभाऊ साठे मराठीतील महत्त्वाचे साहित्यिक आहेत कृष्णा-कोयना नद्यांच्या खोऱ्यातील म्हणजेच सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरातील लोकपरंपरा, लोकरूढी,गावगाढा, स्वातंत्र्य चळवळ त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळ अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून सातासमुद्रापलीकडे पोहचवली. या सर्व कर्मठ आणि कट्टर पणाला विरोध करून न्याय, समता, बंधुता स्वातंत्र्य, बंधुभावाची रूजवणुक अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून केली. अशा या महामानवाच्या 100 व्या जन्मशताब्दीनिमित्त व जयंतीनिमित्त सर्वांनी त्यांच्या कार्याचे चरित्राचे, त्यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांचे प्रती आदर व्यक्त करून व शासनाच्या नियमांचे पालन करून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिसटन्स ठेवून डाॅ.अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पांडुरंग साठे,योगेश साठे,सुशांत गायकवाड, माऊली साठे,केशव गोरवे आदींनी परिश्रम घेतले.

जवळा नि येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी

जवळा नि येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी

कोविड १९ च्या संकटामुळे जल्लोषात साजरी केली जाणारी जयंती साधेपणाने साजरी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -(जवळा नि / सिरसाव : प्रतिनिधी)-

परांडा तालुक्यातील जवळा नि येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान जवळा नि यांचे वतीने कोविड १९ चे नियम पाळुन साजरी करण्यात आली
जयंतीची सुरुवात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेस पुष्पहार घालुन पुष्प अर्पन करुन प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली,
संपुर्ण जगासमोर कोरोना विषानुचे संकट उभे आहे म्हणुन शासनाने सद्या जमावबंदी आदेश लागु केलेले आहेत कोणतेही कार्यक्रम‌ मोठेपणाने साजरे करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे त्यामुळे शासनाने दिलेल्या सुचनांचे काठेकोरपणे पालन करुन जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. म्हणुन जास्त लोकांना एकञ न जमा करता मोठ्या जल्लोषात साजरी होणारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साध्याच पध्दतीने साजरी करण्यात आली.
या जयंती कार्यक्रमासाठी सरपंच नवजीवन चौधरी, ग्रामसेवक पोपट खटकाळे, एन. डी. एम. जे. संघटना जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत तसेच साहित्यसम्राट प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्रीराम चव्हाण यांचेसह पत्रकार गणेश गवारे, कैलास चव्हाण, प्रभाकर चव्हाण सर, शाम चव्हाण, राजेंद्र चव्हाण, राजाभाऊ चव्हाण, हनुमंत पांगरे, सुनिल चव्हाण, आदिंसह गावातील सर्व जाती धर्मातील तरुण उपस्थित होते

जवळा नि येथे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी
एन डी एम चे जिल्हाध्यक्ष चर्मकार समाजाचे नेते आजिनाथ राऊत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करताना

*पुरोगामी महाराष्ट्राची शान अण्णाभाऊ साठे*

*पुरोगामी महाराष्ट्राची शान अण्णाभाऊ साठे*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे )-ये आझादी झुठी है देश कि जनता भुकी है…
ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती येथील शोषित पीडित दलित कष्टकरी नाहिरे वर्गाच्या यांच्या तळहातावर तरलेली आहे.
जग बदल घालुनी घाव  मज सांगून गेले भीमराव .
हे अवघ्या महाराष्ट्राला ठणकावून सांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. साहित्यरत्न साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शंभरावी जयंती, ही जयंती आज  संपूर्ण जगभरात  मोठ्या दिमाखात  साजरी झाली असती परंतु  सध्या  जगामध्ये  covid-19  कोरणा प्रादुर्भावाने  थैमान घातला आहे.यामुळेआज अण्णाभाऊंची जयंती  घराघरात  वैचारिक पद्धतीने आपण देशभर मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत.उपेक्षित शोषित पीडित कष्टकरी कामगार त्यांचं दुःख साहित्यातून मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुरोगामी महाराष्ट्रासाठी भरीव असं योगदान आहे.त्यांचं साहित्य लिखाण महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता सातासमुद्रापलीकडे म्हणजे जगभरात गाजले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कोल्हापूर आणि सातारा च्या मध्यभागी डोंगर पायथ्याशी वसलेल्या वाटेगाव या निसर्गाने नटलेल्या गावी कृष्णा आणि वारणा नदीच्या परिसरात वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला.त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊ साठे आईचे नाव वालुबाई राघोबा साठे असे होते.अण्णाभाऊ चे शिक्षण अगदी दीड दिवसाचे कुलकर्णी नावाच्या मास्तरने अण्णाभाऊंना मारले त्यामुळे अण्णाभाऊंनी शाळेकडे पाठ फिरवली. कुटुंबाची दारिद्र्य पराकाष्टा पाहून रोजगारासाठी त्यांच्या वडिलांनी मुंबईचा रस्ता धरला चार मुले व पत्नी घेऊन ते पायी मुंबईच्या दिशेने निघाले 1931 आली भाईखेळा येथे चांदबिबीच्या चाळीमध्ये जिन्याखाली आपला फाटका संसार मांडला.मिळेल ते काम मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागले.   त्यात अण्णाभाऊंची ओळख एका कापड विक्रीकाशी झाली.कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अण्णाभाऊ ने कापड विक्रीचा व्यवसाय सुरू केला व ते कपड्याचे गाठोडे घेऊन अण्णाभाऊ मुंबईच्या रस्त्याने वन वन फिरत होते.त्यामुळे त्याचा रोजीरोटीचा प्रश्न काहीसा मिटला होता.त्यानंतर माटुंगा येथील लेबर कॅम्प मध्ये राहावयास गेले लेबर कॅम्प म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मानव मुक्ती लढ्याचा बालेकिल्लाच होता.याच बालेकिल्ल्यात अण्णा भाऊंसारखा साहित्यसम्राट घडत गेला आणि अख्ख्या जगाला तो लेखणीच्या माध्यमातून कळाला.त्यांच्यात लपून बसलेला विद्रोही लेखक अखेर साहित्याच्या माध्यमातून बाहेर आला.कम्युनिस्टांच्या स्टडी सर्कल मुळे अण्णाभाऊंच्या लेखणीला धार मिळत गेली. 1946 साली टिटवाळा येथे शेतकरी परिषद भरली त्याच ठिकाणी लाल बावटा कला पथकाची स्थापन झाले.आणि शाहीर अमर शेख शाहीर,गव्हाणकर यांच्या साथीने अण्णाभाऊ लोकशाहीर झाले.15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालेल्या स्वातंत्र्यावर अण्णाभाऊ नाखूष होते.इंग्रजांच्या पारतंत्र्यातून ब्राह्मण प्रस्थापित वर्ग स्वतंत्र झाला परंतु बहुजन वर्ग मात्र गुलामच आहे हे त्यांच्या निदर्शनास आले. म्हणूनच ते म्हणतात ये आजादी झुठी है देश कि जनता भुकी है. महाराष्ट्राची परंपरा या पोवाड्यात बहुजन पुरुषांच्या आदर्शाचा गौरव करतात तसेच मनुवादी विचारधारा जोपासणाऱ्या ची चिरफाड करतात अण्णाभाऊ साठे यांनी सुरुवातीला पुरोगामित्वला पोषक ठरणारी प्रेरक ऊर्जा कम्युनिस्ट कडून घेतली त्यांच्या नंतर लक्षात आले भारतात वर्ग नाहीतर जाती आहेत.जातीव्यवस्था हे मनुवाद्यांचे आपत्य आहे जोपर्यंत जातिव्यवस्था आहे तोपर्यंत एक संघटन शक्य नाही. म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या पुरोगामीतत्वाला प्रेरक ऊर्जा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून घेतली आणि आपल्या शाहिरीच्या माध्यमातून व्यवस्था परिवर्तनाची ललकारी ठोकली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली त्याकाळी 1936 ते 1941 या काळात मोठी राजकीय लढाई उभी केली होती.या दलित उद्धरण्या च्याआंदोलनाने अण्णाभाऊ साठे भारावून गेले होते.अण्णाभाऊ साठे म्हणतात “ज्या धनिक शहानी धर्मांधांनी दलित समाजाचा हत्ती व्यवस्थेच्या चिखलात घालून रुतून ठेवला आहे”त्यांनी आम्हाला कलंकित अवमानित केले आहे.तेव्हा आपली एकजूट करून या विषमता मूलक समाजव्यवस्थेवर आपल्या विचारांचा जोरदार घाव घालू व अन्यायसमाज व्यवस्था मोडून टाकू व गुलामगिरीतून मुक्त होऊन आपला स्वतंत्र समतेवर आधारित वेगळी समाज व्यवस्था निर्माण करू. ज्या  समाजव्यवस्थेने नाकारले आहे त्यांची गुलामी पत्करणे शक्य नाही. म्हणून ती व्यवस्था झुगारून नवीन समाज व्यवस्था निर्माण केली पाहिजे या मताशी अण्णाभाऊ ठाम होते. सध्या आपण एकविसाव्या शतकात वाटचाल करत असून अजूनही समाजव्यवस्था बदललेली नाही जैसे थे आहे. फक्त अन्याय-अत्याचाराच्या पद्धती बदलल्या आहेत. आजही असंघटित असल्यामुळे बौद्ध समाज व मातंग समाज,दलित समाज यांना अन्याय-अत्याचाराला पावलोपावली समोर जावे लागत आहे. याची कित्येक उदाहरणे महाराष्ट्रात पाहावयास मिळत आहेत.चंद्रकांत गायकवाड सारख्या तरुणाचा दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या केली जाते.आमच्या भगिनीवरती दिवसाढवळ्या बलात्कार केला जातो कसली मानसिकता.यात आता बदल झाला पाहिजे अन्याय अत्याचाराला वाचा फुटली पाहिजे.अखिल भारतीय साहित्य संमेलन मुठभर लोकांच्या हाती असून आपले स्वतंत्र वेगळे साहित्य संमेलन निर्माण केले पाहिजे. असे अण्णाभाऊंना प्रकर्षाने वाटत होते.त्यांनी मुंबई 1958 साली भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलन उद्घाटक म्हणून केलेल्या भाषणात प्रकर्षाने जाणवते.अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदान बहुमूल्य आहे.त्यांनी निर्माण केलेल्या साहित्याने जगभरात मराठी आणि महाराष्ट्र राज्याची मान निश्चितपणे उंचावली आहे.त्यांनी कामगार लढ्यातील संपातील यांच्या जीवनावर गाणी लिहिली अण्णाभाऊंनी फकीरा,चित्रा,वैजंता,वारणेचा वाघ अशा अनेक कथा कादंबऱ्याच लेखन केलं. अण्णाभाऊंनी एकंदर30 कादंबऱ्या, 22 कथा एक प्रवास वर्णन, एक नाटक,दहा शाहीर गीते, 15 वगनाट्य, तमाशे, एक छक्कड, आणि 100 पेक्षा अधिक गीते, एवढे मोठे साहित्य अण्णाभाऊंनी लिहिले त्यांच्या काही कथांच्या आधारे चित्रपट निर्मिती झाली.फकीरा,वारणेचा वाघ, साताऱ्याची तरा ( अलगुज), डोंगरची मैना (माकडीचा माळ), मुरली मल्हारी (चिखलातील कमळ ), बारा गावचे पाणी( वैजंता) टिळा लावते मी रक्ताचा (आवडी), हे त्या काळात गाजलेले चित्रपट होते.अण्णाभाऊंचे साहित्य अनेक भाषेत भाषांतरित करण्यात आले. आशा या पुरोगामी महाराष्ट्राची शान असणाऱ्या महान साहित्यिकास शंभराव्या जयंतीनिमित्त,जन्म शताब्दी निमित्त पुरोगामी महाराष्ट्राच्या वतीने  विनम्र अभिवादन..

…. संपादक पुरोगामी महाराष्ट्र न्यूज -प्रमोद ज्ञानदेव शिंदे,9975903040.

पुरोगामी महाराष्ट्राची शान अण्णाभाऊ साठे
जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले भीमराव ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त विनम्र अभिवादन
पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती येथील दलित शोषित कष्टकऱ्यांच्या नाहीरे वर्गाच्या हातावर तरली आहे, साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विनम्र अभिवादन- अभी वादक पुरोगामी महाराष्ट्र न्यूज

वंचित च्या वतीने एकशिव सिध्दार्थनगर येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

*वंचित च्या वतीने एकशिव सिध्दार्थनगर येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते ( प्रमोद शिंदे)– मौजे एकशिव सिद्धार्थ नगर व साठेनगर येथे वंचित बहुजन आघाडी यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. 
 काही दिवसापुर्वी मौजे एकशिव ता.माळशिरस येथे 1ला कोविड,कोरोना ग्रस्त पेशंट सापडला होता.म्हणून ज्या भागात कोरोना बाधित पेशंट सापडला तो भाग सिल करण्यात आला होता. हा भाग दलित लोकवस्ती असल्याने 200 कुटुंब अडकुन पडले होते सिल केलेल्या भागातून लोकांना बाहेर जाता येत नव्हते या वस्तीमध्ये सर्वच लोक मोलमजुरी करणारे व हातावर पोट भरणारे आहेत. परंतु लॉकडाऊन झाल्यामुळे येथील लोकांना घरातच अडकून बसावे लागले. त्यामुळे अन्न धान्य व उदरनिर्वाहाच्या साधनांसाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असल्यामुळे दैनंदिन अडचणी लक्षात घेता वंचित बहुजन आघाडी माळशिरस विधानसभा उमेदवार राज यशवंत कुमार यांच्या वतीने 101 गरजू लोकांना जिवनआवश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. या वेळी राज कुमार यांनी माळशिरस तालुक्यातील वंचित च्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की अशा परिस्थिती अडचणीत असलेल्या लोकांना वंचित आघाडीच्या वतीने तात्काळ मदत करा व काही अडचण आल्यासआमच्याशी संपर्क साधा असे आवाहन केले या वेळी वंचितचे एकशिव अध्यक्ष दिपक झोडगे,बन्नी साळवे,विजय जगताप, सुरज कांबळे, सनी बाबर,यांनी परिश्रम घेतले तसेच या कार्यक्रमास अभिजित गायकवाड ,सलमान शेख, प्रितम साळवे ,धर्माअशोक सावंत,रामभाऊ सावंत,हरीभाऊ साळवे, शांतिनिकेतन साळवे, सामाजिक कार्यकर्ते बाजिराव खताळ श्रीकेश वरुडे , प्रमोद साळवे ,रोहित असुदे उपस्थित होते.

मौज एकशिव येथे वंचित बहुजन आघाडी यांच्यावतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप शु

You may have missed