रुपेश विरले यांना आर्ट बीट फाउंडेशन पुणे यांचा राज्यस्तरीय “महाराष्ट्र युवा कला गौरव “पुरस्कार देऊन सन्मान
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेरावआर्ट
.
समाजात मध्ये सेवाभावी वृत्तीने आदर्शवंत आणि प्रामाणीकपणे संगित कलेचे कार्य जोपासणाऱ्या ,कर्जत तालुक्यातील देवपाडा गावातील, काशिनाथ बारकु विरले ,यांचे धाकटे चिरंजीव कु.रूपेश काशिनाथ विरले यांना”आर्ट बीट फाउंडेशन पुणे यांसकडुन राज्यस्तरीय “महाराष्ट्र युवा कला गौरव “पुरस्कार २०२१ मिळाला..
हा पुरस्कार यांना भजन क्षेत्रात मिळाला आहे …आणि या प्रवासामध्ये त्यांच्या सोबत असणारे त्यांचे सर्व सहकार्यांनी संगीत क्षेत्रांमध्ये पहिल्यांदा संगीताची आवड निर्माण करणारे त्यांचे पहिले गुरु गुरुवर्य ठाणे भुषण ह.भ.प. सुरेश बुवा डायरे , तसेच आवाज महाराष्ट्राचे महाविजेते सुप्रसिद्ध गायक महेश बुवा कंठे,शास्त्रिय संगीताचे गुरु रायगड भुषण :नयन बुवा गवळी… यांच्या मार्गदर्शनात संगीत क्षेत्रांमध्ये सेवा करण्याची संधी मिळत आहे.
तसेच रूपेश चे मोठे भाऊ निलेश काशिनाथ विरले यांनी सुद्धा रूपेश ला या स्तरावर येण्यास खुप मेहनत घेतली.
रूपेश च्या या कलाक्षेत्रात खुप कौतुक होत आहे त्याच्या सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार सर्व सहकार्यांनी रूपेश च्या या कारकीर्दीत च कौतुक करून रूपेश वर शुभेच्छा चा वर्षाव केला व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या