पिरळे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते (प्रतिनिधी)-पिरळे ता माळशिरस येथील जिल्हा परिषद शाळा तसेच ग्रामपंचायत पिरळे या ठिकाणी 26 जानेवारी 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला कोरोना पार्श्वभूमी लक्षात घेता इतर नेहमीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम न घेता राष्ट्रगीत झेंडा गीत घेऊन राष्ट्रध्वज तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. ग्रामपंचायत येथील ध्वजारोहण सरपंच अलकाताई नरळे यांच्या हस्ते करण्यात आले जिल्हा परिषद शाळा येथील ध्वजारोहण शिक्षण समिती अध्यक्ष आनंदराव लवटे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी उपस्थित मान्यवर व महाराष्ट्र पत्रकार संघ तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रमोद शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.प्रसंगी युवा उद्योजक संदीप नरोळे बोलताना म्हणाले की आपण सर्वजण मिळून गावाच्या शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करू आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या आमदार फंडातून शाळेसाठी पेवर ब्लॉक,नवीन इमारत,वॉल कंपाऊंड या सारख्या अनेक मागण्या आपण केल्या आहेत लवकरच या सर्व गोष्टींची पूर्तता करण्याचेआश्वासन आ.रणाजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिले आहे. आठ लाख रुपये चा सभामंडप सुद्धा त्यांनी मंजूर केला आहे.शाळेची प्रगती चांगली आहेअसते बोलत होते.तसेच माजी विस्ताराधिकारी प्रल्हाद साळवे,पत्रकार प्रमोद शिंदे, अजित खंडागळे,आनंद लवटे, ग्रामसेवक शैला साळवे मॅडम,अमोल वाघ आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी सरपंच अलकाताई नरोळे,उपसरपंच कमल खिलारे,ग्रामसेवक शैला साळवे मॅडम ग्रामपंचायत सर्व सदस्य ,शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष पवार मॅडम सर्व सदस्य पदाधिकारी,जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर माजी सरपंच अशोक तोडकर, महादेव शिंदे ,भारत पवार ,भाऊसाहेब भिसे सर ,संतोष पाटणे, नाथा लवटे व तंटामुक्ती अध्यक्ष संजय पाटील ,तलाठी कार्यालय कर्मचारी विश्वास बनकर, ग्रामस्थ पस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ढवळे सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खरात सर ,जब्बार मुलानी सर निगडे सर, नामदेव मॅडम, मुलांनी मॅडम सर्व शिक्षक व ग्रामपंचायत कर्मचारी नितीन खिलारे, अनिल वाघमोडे ,धनंजय साळवे यांनी परिश्रम घेतले.

ध्वजारोहणाचे पूजन करताना पिरळे गावच्या सरपंच अलकाताई नरो प्ल व ग्रामसेविका सैला साळवे मॅडम
युवा उद्योजक माजी उपसरपंच संदीप शेठ नरोळे मनोगत व्यक्त करताना