दहिगाव- पिरळे रस्त्यावर खड्ड्यात वृक्षारोपण करून एन.डी.एम.जे विद्यार्थी संघटनेकडून बांधकाम विभागाचा निषेध

दहिगाव- पिरळे रस्त्यावर खड्ड्यात वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांकडून बांधकाम विभागाचा निषेध
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –दहिगाव-पिरळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला.
पिरळे दहिगाव, हा रस्ता सतत वर्दळीचा असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत
. या रस्त्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व नागरिक ये जा करत असतात खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो परंतु पडलेल्या खड्ड्यावर बांधकाम विभागाचे पूर्ण दुर्लक्ष असल्याने एन.डी.एम.जे.चे प्रसिद्धीप्रमुख पत्रकार प्रमोद शिंदे यांनी वेळोवेळी बांधकाम विभागाशी संपर्क करून या संदर्भात रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भात बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या परंतु बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मुळे काल एन डी एम जे प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व एन.डी.एम.जे विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रज्ञेश कांबळे यांच्या नेतृत्वात पिरळे-दहिगाव रस्त्यावर विद्यार्थ्यांच्या वतीने खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला.पश्चिम भागातील रस्ते दुरुस्त झाले नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असेही सांगण्यात आले आहे.तात्काळ पिरळे-दहिगाव, पिरळे-फोंडशिरस,नातेपुते-पिरळे या रस्त्यांची कायमस्वरूपी दुरूस्ती 30 जानेवारी च्या आत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. रस्ते दुरुस्त झाले नाही तर एक फेब्रुवारीला तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

दहिगाव- पिरळे रस्त्यावर खड्ड्यात वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांकडून बांधकाम विभागाचा निषेध

You may have missed