एन.डी.एम.जे महाराष्ट्राचे काम उल्लेखनीय आहे -ऍड राहुल सिंग दिल्ली
एन.डी.एम.जे महाराष्ट्राचे काम उल्लेखनीय आहे -ऍड राहुल सिंग दिल्ली
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे. एन डी.एम.जे महाराष्ट्र संघटनेचे काम उल्लेखनीय आहे अशाप्रकारची स्तुती दिल्लीचे नॅशनल दलित मोमेंट जस्टीस राष्ट्रीय महासचिव ऍड.राहुल सिंग यांनी केले.एन.डी.एम.जे या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय सामाजिक संघटनेचे दोनदिवसीय ऑनलाइन कार्यशाळा व आढावा बैठक संपन्न झाली. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी या वर्षात कशा प्रकारे काम केले याचा आढावा घेण्यात आला.आढावा बैठकीत राज्य सचिव वैभव गीते यांनी महाराष्ट्रामध्ये वाढता अन्याय अत्याचार व त्यावर काम करत असलेल्या कार्यकर्त्यांन संदर्भात माहिती दिल. यामध्ये महाराष्ट्रात 32 कुटुंबाचे पेन्शन,नोकरी,जमीन मिळवून देऊन पुनर्वसन केले आहे.अनेक केसमध्ये सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.जवळपास 200 हून अधिक सामाजिक कार्यकर्त्यांना मिनी ट्रॅक्टर ची योजना मिळवून दिले आहे.बांधकाम मजूर, ऊस तोड कामगार, सफाई कामगार यांच्या नोंदी करून यांना योजना मिळवून दिले आहेत.अत्याचार पिडीतांना पोलीस स्टेशन ते न्यायालयीन गोष्टी पर्यंत मदत केली आहे.या सर्व गोष्टींचा उहापोह बैठकीत करण्यात आला यावर ऍड.राहुल सिंग यांनी महाराष्ट्र टीमचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या व ते म्हणाले सरकारी वकील नियुक्ती वरती भर दिला पाहिजे.दिल्ली येथील अडवोकेट संजय कुमार म्हणाले कार्यकर्त्यांच्या अडचणी निश्चित राष्ट्रीय पातळीवर सोडवले जातील.दिल्लीच्या राष्ट्रीय समन्वयक डॉ.जुडीत ऍनी लाल व डॉ.देबजानी नासकर यांनी सुद्धा आढावा घेतला.ही आढावा बैठक राज्य महासचिव डॉ.केवल उके यांच्या नेतृत्वात घेण्यात आली डॉक्टर केवल उके यांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच आयपीसी विषयी माहिती दिली.या दोन दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेत एन.डी.एम.जे.चे शिवराम कांबळे,पी.एस खंडारे,पंचशीलाताई कुंभारकर, बी.पी लांडगे, प्रमोद शिंदे, दिलीप आदमाने,बंदिष सोनवणे,शशी खंडागळे, दादा जाधव, जगदीप दिपके,विजय कांबळे तसेच सोलापूर,सातारा,सांगली,हिंगोली,वाशिम,उस्मानाबाद, बुलढाणा,लातूर,पुणे,रायगड,पालघर,मुंबई,ठाणे व इतर जिल्ह्यातील१०० हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.