कार्यकर्त्यांनी ताकद दिल्यामुळे यश संपादन करता आले-धैर्यशील मोहिते-पाटील


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –पिरळे तालुका माळशिरस येथे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांच्या स्थानिक विकास निधीतून काशी विश्वेश्वर मंदिर नरोळे वस्ती येथे सभामंडप तसेच वाघ वस्ती येथे हायमास्ट लॅम्प बसवण्यात आला आहे. सभामंडप भूमिपूजन व हायमास्ट तसेच पवार कृषी केंद्र,भाजप कार्यालय व विविध विकास कामांचे उद्घाटन धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पुरोगामी महाराष्ट्र च्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल धैर्यशील मोहिते-पाटील व बाबाराजे देशमुख यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला.याप्रसंगी धैर्यशील मोहिते पाटील बोलताना म्हणाले की कार्यकर्त्यांनी ताकद दिल्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत यश संपादन करता आले.आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील,जयसिंह मोहिते पाटील आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले त्यामुळे 37 जागा मिळाल्या पुढे भविष्यात कार्यकर्त्यांकडून पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकीत सुद्धा अशाच प्रकारे अपेक्षा आहे.पिरळे गावची जबाबदारी संदीप नरोळे,शिंदे बंधू,महादेव होळकर व कार्यकर्त्यांवर असेल.या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे, मा.सरपंच ऍड.बी.वा.यराऊत,पं.स.सदस्य हनुमंत पाटील,नूतन नगरसेवक मालोजीराजे देशमुख,ऍड.शिवाजी पिसाळ,महेश शेटे, प्रताप पाटील ,शहाजी धायगुडे, रामभाऊ पाटील,कैलास निकम,औदुंबर बुधावले,दत्तात्रय लवटे,दत्तात्रेय रुपनवर,प्रमोद डूडू ,संतोष पाटणे, दादासाहेब शिंदे,नानासो शिंदे सर,पत्रकार श्रीकांत बाविस्कर,प्रमोद शिंदे,संभाजी साळवे
तसेच सरपंच अलका नरोळे,उमेश खिल्लारे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेव शैला साळवे व अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन संदीप नरोळे,भारत पवार, संदीप वाघ यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी,अजित खंडागळे,भाऊसाहेब भिसे, मनिषा पवार यांनी केले.

कार्यकर्त्यांनी ताकद दिल्यामुळे यश संपादन करता आले-धैर्यशील मोहिते-पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना
हायमास्ट लॅम्प चे उद्घाटन करताना धैर्यशील भैय्यासाहेब मोहिते पाटील मामासाहेब पांढरे व मान्यवर
मे.पवार कृषी सेवा केंद्र पिरळे चे उद्घाटन धैर्यशील मोहिते-पाटील बाबाराजे देशमुख व मान्यवर

You may have missed