पिरळे येथे खासदार व आमदार यांचा भव्य नागरी सन्मान सोहळा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
पिरळे तालुका माळशिरस येथे खासदार धैर्यशील (भैय्या) मोहिते-पाटील खासदार माढा मतदार संघ आमदार उत्तमरावजी जानकर साहेब( आमदार माळशिरस विधानसभा) यांचा भव्य नागरी सत्कार तसेच दलित पॅंथर चे प्रदेशाध्यक्ष डॉ. घनःश्याम भोसले व इतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार दि-20 जानेवारी २०२५ रोजी सायं.6 वा. आयोजीत केला आहे.तसेच यावेळी पारंपरिक गाजी ढोल खेळ होणार असून यात सहभागी होणारे गजी मंडळ श्री नाथ गजी मंडळ लोणंद धुळदेव गजी मंडळ मारकडवाडी सतोबा गजी मंडळ बांगर्डे बिरदेव गजी मंडळ पांगरी व टाकेवाडी. बानलिंग गजी मंडळ फोंडशिरस,चक्रेश्वर हलगी, सनई ग्रुप चाकोरे ,हलगी ग्रुप पलसमंडळ / मावळा, दहा जणांचा तुतारी ग्रुप, कै. बबनरावजी ठोंबरे गजी मंडळ उंबरे दहीगांव या द्वारे मा. खा. धैर्यशील मोहिते पाटील व आ. उत्तमरावजी जानकर यांची भव्य- दिव्य अशी मिरवणूक व JCB मधुन पुष्प वृष्टी होणार आयाजन करून गवच्यावतीने भव्य असा नागरी सन्मान सोहळा समत विद्यालय क्रीडांगणावर संपन्न होणार असून मान्यवरांचे हस्ते समता माध्य.व. श्री भिदेवी कनिष्ठ, पिरळे,एस. एम. एस. इंग्लिश मेडिअम स्कूल पिरळे यांचा वार्षिक स्नेह संम्मेलन उद्धघाटन सोहळा संपन्न होणार आहे.पंच कृशितील सर्व नागरिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दालित पँथर जील्हा अध्यक्ष दादासाहेब शिंदे व प्राचार्य दीपक शिंदे सर यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन चेअरमन- सचिव आबारत्न शिक्षण संस्था, पिरळेसरपंच व सर्व सदस्य ग्रा.पं.पिरळेचेअरमन व सचिव सर्व सदस्य वि.का.स.पिरळेसमस्त ग्रामस्थ पिरळे माळशिरस यांनी केले आहे.