आपण सर्वजण मिळून काम करू तुम्हाला लागेल तेवढे सहकार्य मिळेल-धैर्यशील मोहिते पाटील
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-प्रमोद शिंदे
पिरळे तालुका माळशिरस येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार उत्तमरावजी जानकर यांचा भव्य नागरी सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमातखासदार धैर्यशील मोहिते पाटील बोलताना म्हणाले की आपण सर्वजण मिळून काम करूय जेवढं सहकार्य लागल तेवढे सहकार्य आम्ही करू पिरळे गावातील नेतेमंडळी नेहमीच गावच्या विकासासाठी झटत असतात निधी आणण्याचा प्रयत्न करतात.तुमचे कुठल्याही प्रकारचं काम थांबणार नाही.लाईटचा प्रश्न लवकरच मार्गी लावू पण सर्व गावकऱ्यांनी भव्य दिव्य कार्यक्रम घेतला आपले मनापासून धन्यवाद तसेच आमदार उत्तमराव जानकर बोलताना म्हणाले की, खासदार आपला आमदार आपला हा आनंदाचा क्षण याची देही याची डोळा पहावयास मिळाला या गावा. त्याच तोला मोलाचा कार्यक्रम पिरळे येथील ग्रामस्थांनी घेतला आहे ग्रामस्थांचे मनापासून आभार. या वेळच्या निवडणुका खूप वेगळ्या होत्या मोहिते-पाटील आणि आपण एकत्र झालो आपल्याला यश मिळाले. म्हणून यांच्या छाताडावर थया थया नाचता अल.पण ईव्हीएम मधून येणारे आकडेवारी ही चकित करणारी होती.यावर कोणीतरी विरोध करायला पाहिजे म्हणून आपण संघर्षाच्या माध्यमातून विरोध करत आहोत येथील चोरी गेलेली मते नरड्यात जरी गेली असेल तरी आतड्यासह बाहेर काढू. जंतर-मतरवर मी आंदोलन व सत्याग्रह करणार आहे माझा राजीनामा मी निवडणूक आयोगाला देणार आहे. तुमच्या हक्कासाठी काल ही संघर्ष करत होतो आणि आज उद्या संघर्ष करणार आहे. योग्य वेळ आल्यावर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन करू पिरळे हे गाव हृदयापासून खासदार साहेब आणि आमचाच आहे. तसेच दलित पॅंथर चे घनश्याम भोसले, माजी सरपंच संदीप नरोळे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक शिंदे सर यांनी केले.खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार उत्तमराव जानकर यांची ढोल ताशा हलगी गजी सह गाजत वाजत जे.सी.बी मधून पुष्पृष्टी करत भव्य दिव्य गावातून मिरवणूक काढण्यात आली 200 किलो वजनाचा गुलाब व झेंडूच्या फुलांचा हार घालून सत्कार करण्यात आला.तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.यावेळी आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादां धाईंजे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,माऊली पाटील,अजय सकट,पांडुरंग वाघमोडे,मधुकर पाटील,राजाभाऊ रुपनवर व अनेक मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन आबारत्न शिक्षण संस्थेचे दादासाहेब शिंदे सर,दीपक शिंदे सर चेअरमन महादेव शिंदे यांनी केले होते.तसेच कार्यक्रमय शस्वी होण्यासाठी.शिवाजीराव लवटे-पाटील,संदीप वाघ,गणेश दडस,दत्तात्रय लवटे पाटील,सर्व शिक्षक स्टाफ संस्थेतील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.