रस्ते भरण्यासाठी पीडब्ल्यूडी कडून लाव लीजाव टमकी बजाव अधिकार्यांकडून टक्केवारी साठी च टेंडर?
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)- माळशिरस तालुक्यात अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्या मध्ये खड्डे झाले आहेत. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील रस्त्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पीडब्ल्यूडी कडून रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे.परंतु ते काम नाम मात्र होत असल्याचे दिसून येत आहे. रस्ते भरण्याचं काम “लाव लीजाव टमकी की बजाव” अशा पद्धतीने होत आहे. ग्रामस्थांकडून सवाल केला जात आहे की अधिकारी हे फक्त टक्केवारीसाठी टेंडर काढतात का? असे पण आरोप केले जातात अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टदार यांचे लागेबांधे आहेत त्यामुळे अधिकारी कॉन्ट्रॅक्टदार, ठेकेदार,कशा पद्धतीने काम करतात हे पाहिले जात नाही व डोळेझाक पणे बिले काढले जातात. सध्या पिरळे नातेपुते रस्ता अतिशय खराब झाला असून तेथील थोडीफार खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आला आहे.परंतु ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचा झाल्या आहे.खड्ड्यांमध्ये डांबर वापरले गेले नाही नुसतेच खडी टाकली आहे. या रस्त्याने जास्त वर्दळ आहे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शाळेत सायकल वरून ये-जा करतात असतात त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. खड्डे व्यवस्थित बुजवण्याची ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास पीडब्ल्यूडी अधिकारीच जबाबदार असणार आहेत.