माळशिरस तालुका

माझ्यासोबत अदृश्य शक्ती आहे असे म्हणत राम सातपुतेनी भरला उमेदवारी अर्ज

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

https://youtu.be/-SU1L8stIvc?si=Nc8Gs5nZyUA7bfR_

आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील भाजपचे आमदार म्हणून ते आमच्या सोबत असतील-राम सातपुते
अदृश्य शक्ती माझ्यासोबत आहे. व रणजितसिंह मोहिते पाटील तेही आमच्या सोबत असतील या राम सातपुतेंच्या वक्तव्यावर संपूर्ण माळशिरस तालुक्याचे लक्ष लागले आहे.अदृश्य शक्ती कोण ? हा प्रश्न देखील माळशिरस तालुक्यातील जनतेच्या समोर पडला आहे.

254 माळशिरस विधानसभेसाठी आमदार राम सातपुते यांनी शेवटच्या दिवशी दुपारी दोन वाजल्याच्या दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राम सातपुते यांनी मोठे शक्ति प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. मांडवे येथील निवासस्थानापासून ते अकलूज प्रांत कार्यालय पर्यंत रॅली काढत कार्यकर्त्यांनी घोषणा देत राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बोलताना आराम सातपुते म्हणाले की ही लढाई जनतेच्या हातातील आहे.जनतेने मला उभ केलं आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला दुसऱ्यांदा संधी दिली आहे. माझ्या पाठीमागे अदृश्य शक्ती आहे.त्यामुळे ही निवडणूक मी निवडून येणारच.तसेच पत्रकार करांनी प्रश्न विचारला असता मोहिते पाटील तुमच्या सोबत असतील का? या प्रश्नाचे उत्तर देताना राम सातपुते म्हणाले रणजीत सिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद आमदार आहेत निश्चितच ते आमच्या सोबत असतील लाडकी बहीण योजनेतील बहिणींना सरकारकडून साडेसात हजार रुपये आमच्या सरकारने दिले आहेत आणि या पुढेही ही योजना चालू राहील असे राम सातपुते म्हणाले.

आ. राम सातपुते आज भरणार अर्ज

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

दाखल करण्याची मंगळवार दिनांक २९ ऑक्टोंबर ही शेवटची तारीख असल्यामुळे माळशिरस मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आरोग्य दूत दमदार आम दार राम सातपुते हे उद्या दिनांक २९/१०/२०२४ रोजी सकाळी ठीक ११ वाजता अर्ज भरणार आहेत.

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच राम सातपुते आपल्या मतदारसंघात आल्यानंतर तालुक्यातील कानाकोपऱ्यातील जनतेने लाखोंच्या संख्येने उपस्थित राहुन त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी राम सातपुते तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. राम सातपुते यांनी आपण स्वतःच्या हिमतीवर या मतदारसंघात मागील पाच वर्षात प्रामाणिकपणे केलेल्या विकास कामाच्या जोरावर व गोरगरिबांच्या आशीर्वादावर निवडून येणार असल्याचे आत्मविश्वासाने सांगितले आहे. यावेळी अनेकांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

माळशिरस मधून उत्तमराव जानकर व विकास धाईंजे यांनी भरला उमेदवारी अर्ज.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

– माळशिरस 254 विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीचा अधिकृत  उमेदवार म्हणून .उत्तमराव जानकर साहेब व आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे यांचा मोठ्या शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज भरण्यात आला यावेळी  अकलूज सहकारी साखर  कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, संसदरत्न व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार..सुप्रियाताई सुळे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख तसेच हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

कायदा हातात घ्याल तर खैर नाही:-पो.नि.भिमराव खणदाळे.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची यादी तयार केली आहे.
या सर्व गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपारी, एमपीडीए यासारखी कारवाई करण्यात येणार आहे सांगोला पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली असून त्यातील सुमारे ५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, टोळीने गुन्हे केलेल्या २ टोळ्यावर (महाराष्ट्र पोलीस कलम ५५ प्रमाणे) २ वर्षांसाठी ४ जिल्ह्यातून तडीपारीचा प्रस्ताव पाठविण्यात येत आहे तर १ जणांवर एमपीडीएची कारवाई (महाराष्ट्र पोलीस कलम कायदा ५६ प्रमाणे) ४ जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपारीची कारवाई प्रस्तावीत करण्यात येणार आहे.
तसेच सांगोला तालुक्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार केली असून प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपारी व एमपीडीएची कारवाई प्रस्तावीत करण्यात येणार आहे.विधानसभा निवडणुकीसाठी २२ ते २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. ३० ऑक्टोबरला अर्जाची छाननी होवून अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल. त्यानंतर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्या दिवसापासून उमेदवारांना पुढे १८ नोव्हेंबरपर्यंत प्रचार करता येईल. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
या काळात पोलिसांचे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष राहणार आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही गुन्हा केल्यास पुढे त्यांच्यावर स्थानबद्धतेची किंवा तडीपारीची कारवाई होवू शकते.
त्यामुळे सर्वांनी शांतता पाळावी, लोकशाहीचा उत्सव आनंदात साजरा करावा असे आवाहन यावेळी सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी केले आहे.
निवडणूक काळात सामाजिक शांतता व ‘सुव्यवस्थेला बाधा होईल, असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांचे नेहमीच लक्ष असते, पण निवडणूक काळात विशेष लक्ष राहणार आहे.

धनत्रयोदशीपूर्वी सोने झाले स्वस्त ; चांदीचे भावही घसरले, जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचा भाव

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-


दिवाळीपूर्वी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. गुरुवारनंतर शुक्रवारी सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे सोन्याचा भाव विक्रमीएचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) सौमिल गांधी यांनी सांगितले की, यूएस फेडरल रिझर्व्ह पॉलिस रेटमध्ये कपात होणार नाही असे अमेरिकेच्या मॅक्रो इकॉनॉमिक डेटाने सूचित केल्यामुळे शुक्रवारी सोन्यामध्ये घसरण झाली.
गांधी म्हणाले की, अमेरिकेतील बेरोजगारीचा दर दुसऱ्या आठवड्यात कमी झाला आहे. तर S&P PMI मधील वाढ खाजगी क्षेत्रातील ताकद दर्शवते. या सगळ्याचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला.
Gold Silver Price on 26 October 2024: दिवाळीपूर्वी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त झाले आहे. गुरुवारनंतर शुक्रवारी सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे सोन्याचा भाव विक्रमी पातळीपासून 1,450 रुपयांनी स्वस्त झाला आहे. दुसरीकडे, चांदीच्या भावातही घसरण दिसून आली आहे.
3000 रुपयांची ही घसरण दिसून आली आहे. त्यानंतर दिल्ली चांदीचा भाव 1 लाख रुपयांच्या खाली आला आहे. प्रॉफिट बुकींग आणि परदेशातील कमकुवत मागणीमुळे सोन्या- चांदीच्या भावात घसरण झाली आहे.
ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांच्या घसरलेल्या मागणीमुळे शुक्रवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच भाव 1,150 रुपयांनी घसरून 80,050 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
याशिवाय 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 350 रुपयांनी घसरून 80,450 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

जवानांविषयी मुलांमध्ये प्रेम निर्माण केले पाहिजे : सुभेदार चव्हाण

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचा उपक्रम : जवानांसमवेत लहान मुलांनी केली दिवाळी साजरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

लहान मुलांमध्ये भारतीय जवानांविषयी प्रेम निर्माण झाले तर येणार्‍या काळात त्यांच्या मनात सैन्यात भरती होण्याची इच्छा निर्माण होईल. आजी – माजी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी करणे हा उपक्रम स्तुत्य आहे. एक वेगळे समाधान यातून लाभते, असे प्रतिपादन सुभेदार तानाजी चव्हाण यांनी केले.
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्यावतीने सात रस्ता म्हाडा कॉलनी येथील आदर्श बालक मंदिर प्रशाला शाळेत विद्यार्थ्यांनी माजी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नाईन महाराष्ट्र एनसीसी बटालियन सोलापूरचे सुभेदार तानाजी चव्हाण, हवालदार निलेश तांबे, नव दलातील मास्टरचिप पेटीओ निवृत्त ऑफिसर सचिन देशपांडे, अशोक विद्युतचे प्रमुख संजीव मुंदडा, सोलापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल काबरा, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज शारीरिक शिक्षणचे संचालक संतोष गवळी, आदर्श बालक मंदिर संस्थेचे सचिव अरूणराव गायकवाड, प्रशालेचे मुख्याध्यापक औदुंबर धोत्रे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते.
दिवाळीनिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानच्यावतीने शंकरपाळी, लाडू, चिवडा व चकली (फराळ) पदार्थ यावेळी वाटप करण्यात आला. देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढलेल्या सैनिकांच्या हस्ते फराळ खाऊ मिळाल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. सुत्रसंचालन ऐश्वर्या संगटे यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहन साठे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षता कासट, मनुश्री कासट, संतोष अलकुंटे, शिला तापडिया, निशांत वाघमारे, गणेश माने, महेश ढेंगले, रंजना ढेंगले, राहुल बिराजदार, भारती जवळे, सुजाता सक्करगी, तुप्ती पुजारी, स्वराज ढेंगले, प्रविण तळे, सुरेश लकडे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

पुन्हा एकदा भाजपाची माळशिरस विधानसभा राम भरोसे

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज प्रमोद शिंदे –


https://youtu.be/1S4DW_PuWmQ?si=F1YPJzXkFUR2fe1L

2024 विधानसभा निवडणुकी चे रणसिंग फुंकून बराच कालावधी झाला व तयारी अंतिम टप्प्यात आली असताना. अद्यापही भाजपाची असणारी माळशिरस विधानसभा राम भरोसे होती.अंतिम टप्प्यात असताना सुद्धा उमेदवारा संदर्भात संभ्रम होता.कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्सुकता असून उमेदवार जाहीर नसल्याने कार्यकर्ते थंडावले होते.अखेर आज भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे.पुन्हा एकदा आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली असून. माळशिरस विधानसभा राम भरोसे म्हणजेच रामभाऊ सातपुते यांच्या भरोशावरती ही निवडणूक भाजपाला लढवावी लागणार आहे. कारण 2019 ला मोहिते-पाटील कुटुंबीयांनी भाजपमध्ये प्रवेश करून भाजपला ताकद दिली होती.भाजप समोर तगडे आव्हान असलेले उत्तमराव जानकर यांची माळशिरस तालुक्यात मोठी ताकद  असल्याने एकट्या भाजपला त्यांच्याविरुद्ध लढून जिंकून येणे अशक्य बाब होती. यात  मोहिते-पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश करून भाजपचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांना पाठिंबा देऊन 2702 मातांनी थोडक्या मताधिक्याने निवडून आणले होते. परंतु भाजपला 2019 मोहिते पाटील यांनी मदत करून सुद्धा. 2024 ला लोकसभेला मात्र भाजपने डावलले. भाजपने त्या बदल्यात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषद दिली होती.व कारखाना उभा करण्यासाठी मदत केल्याचे समजते. तसेच उत्तम जानकरांच्या बाबतीतही लोकसभेला त्यांना डावल्यामुळे ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासोबत गेले. उत्तम जानकर यांनी लोकसभेला मोहिते-पाटील यांना ताकतीने मदत केली.व राजकीय वैर संपुष्टात आणले. त्या बदल्यात मोहिते-पाटील यांनी उत्तम जानकर यांना विधानसभेला मदत करण्याचे ठरवले. दोन्ही ही मोठ्या ताकती एकत्र आल्याने.भाजपच्या पुढे मोठे आव्हान उभे झाले आहे.त्यामुळे भाजपने लवकर उमेदवार जाहीर केलेला नव्हता. या मतदारसंघात गेली पाच वर्ष राम सातपुते यांनी चांगल्या पद्धतीने काम केले असून. त्यांनी अनेक लोकांना आरोग्य संदर्भात मदत केली आहे. विविध प्रकारच्या रुग्णांची लाखो रुपयांची ऑपरेशन त्यांच्या माध्यमातून मोफत करण्यात आली. कामाच्या जोरावर आमदार राम सातपुते यांना मानणारा गट सुद्धा तयार झाला आहे. याच जोरावर ते माळशिरस विधानसभा निवडणूक लढवून चांगली मते मिळू शकतात. दोन्ही विरोधक गट एकत्र आल्याने भाजपाची असणारी माळशिरस विधानसभा ही रामभरोसे म्हणजेच रामभाऊ सातपुते यांच्या कामाच्या भरोशावर असल्याचं पाहायला मिळते सकाळी साडेनऊ वाजता धर्मपुरी येथे राम सातपुते यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे.

चेंबुर..रूपाली चंदनशिवे हत्या प्रकरणातील आरोपी इकबाल शेख याचा कारागृहात मृत्यू….. रूपाली चंदनशिवे व इक्वल यांच्या मुलाची शिक्षणाची जबाबदारी वैभव गिते यांनी घेतली..

दोन वर्षांपूर्वी रुपाली चंदनशिवे यांची हत्या चेंबुर येथे झाली होती.
ही तीचे पती ईकबाल शेख याने केली होती. रुपाली व ईकबाल यांचा प्रेम विवाह होता. आपसातील वादांमधून ईकबाल याने रुपालीची गळा चिरून हत्या केली.
ही माहिती BJP च्या मंत्र्यांना व नेत्यांना समजताच त्यांनी लव्ह जिहाद झाला असुन लव्ह जिहाद चा कायदा तात्काळ मंजुर करा असा सुर टिव्ही मीडियाच्या पुढे मांडला.
त्याचवेळी मी व एन.डी.एम.जे टीम रूपाली चंदनशिवे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली कुटुंबाने सांगीतले की घरगुती कारणावरून रूपाली ची हत्या झाली तरी हे लव्ह जिहाद झाला आहे असे बोलत आहेत. आम्ही फेसबुक लाईव्ह करून जगाच्या पुढे सत्य आणले.
यावेळी लाईव्ह महाराष्ट्र न्युज चॅनल चे संपादक राहुल सावंत यांनी सर्व हकीकत लाईव्ह जनतेपुढे मांडली.
राजकारणासाठी BJP च्या नेत्यांनी अतीशय खालची पातळी गाठून लहुजी हात झाला म्हणून बौद्ध व मुस्लिम समाजाबद्दल जातीय तणाव वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न करून मड्यावरचे लोणी खाण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्यांचे मनसुबे उधळून लावले.
या बी.जे.पी च्या राजकारनी नेत्यांनी रूपाली चंदनशिवे यांच्या घरी भेट देउन लव्ह जिहाद झाल्याचे सांगून राजकारण केले परंतू रुपलीला न्याय मिळण्यासाठी काहीही केले नाही. एक रुपयाची मदत दिली नाही शिवाय मुख्यमंत्री सहायता निधीतून देखील मदत दिली नाही.
रुपाली चंदनशिवे व इकबाल शेख यांना 3 वर्षांचा लहान मुलगा आहे. तो रुपालीच्या आईं वडिलांकडे असतो. या निरागस बाळाच्या शिक्षणात कोणतीही कमी पडणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ.

मला काल चेंबुर पोलीसांनी व रुपाली च्या कुटुंबीयांनी फोन करूण सांगीतले कि, इकबाल याचा कारागृहात मृत्यू झाला आहे……

वैभव तानाजी गिते
राज्य सचिव
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकर व विकास धाईंजे आज भरणार उमेदवारीचा अर्ज.

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-
राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे अधिकृत उमेदवार उत्तमराव शिवदास जानकर व आंबेडकरी चळवळीचे नेते विकास संदिपान भाईंजे दोघेही शरदचंद्र पवार यांच्या ए.बी फॉर्मवर  निवडणुकीचा अर्ज भरणार आहेत. उत्तमराव जानकर हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असून तालुक्यात त्यांची मोठी ताकद आहे. सोबत मोहिते पाटील शरदचंद्रजी पवार गटात आल्यामुळे त्यांचेही ताकद उत्तमराव जानकर त्यांच्यासोबत असणार आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती साठी राखीव असून. या जागेवर उत्तम जानकर यांच्याकडे खाटीक धनगर जातीचा दाखला असल्याने ते या राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. परंतु त्यांना पूरक म्हणून आंबेडकरी चळवळीचे नेते विकास धाईंजे यांचा फार्म भरला जाणार आहे. कारण प्रत्येक उमेदवारासाठी डमी म्हणजे पूरक फार्म भरला जातो . कारण यदा कदाचित फॉर्म छालणी काही अडचण होऊन फॉर्म बाद झाल्यास त्यासाठी दुसरा उमेदवार तयार असावा म्हणून माळशिरस तालुक्या सामाजिक काम मोठ्या प्रमाणात असणारे व सर्व जाती धर्मातील लोकांना अहोरात्र मदत करणारे तसेच सोलापूर जिल्हा तसेच माळशिरस तालुक्यात प्रत्येक गावात घराघरात कामाच्या माध्यमातून पोहोचलेले  विकास धाईंजे यांचा सुद्धा फॉर. सकाळी दहा वाजता अकलूज येथील प्रतापसिंह चौकातून मोटर सायकल रॅली काढत मोठा शक्ती प्रदर्शन करत फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. हा फॉर्म भरण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, व तालुक्यातील अनेक दिग्गज नेते मंडळी उपस्थित असणार आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, माळशिरस मधून उत्तमराव जानकर यांना संधी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-

शरद पवार गटाकडून गटाकडून विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. दुसऱ्या यादीमध्ये एकूण 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती . दुसरी यादी तयार करण्यात आली.दुसऱ्या यादीमध्ये अकोल्यामधून अमित भांगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर एरंडोलमधून सतिश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गंगापूरमधून सतिश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पर्वतीमधून आश्विनी कदम, बीडमधून संदीप क्षीरसागर, माळशिरसमधून उत्तमराव जानकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी

  1. एरंडोल-सतीश अण्णा पाटील 2. गंगापूर-सतीश चव्हाण 3. शहापूर-पांडुरंग बरोरा 4. परांडा-राहुल मोटे 5. बीड-संदीप क्षीरसागर 6. आर्वी-मयुरा काळे 7. बागलान-दीपिका चव्हाण 8. येवला-माणिकराव शिंदे 9. सिन्नर-उदय सांगळे 10. दिंडोरी-सुनीता चारोस्कर 11. नाशिक पूर्व-गणेश गीते 12. उल्हासनगर-ओमी कलानी 13. जुन्नर-सत्यशील शेरकर 14. पिंपरी-सुलक्षणा शीलवंत 15. खडकवासला-सचिन दोडके 16. पर्वती- अश्विनीताई कदम 17. अकोले- अमित भांगरे 18. अहिल्या नगर शहर-अभिषेक कळमकर 19. माळशिरस-उत्तमराव जानकर 20. फलटण-दीपक चव्हाण 21. चंदगड-नंदिनीताई बाबुळकर-कुपेकर 22. इचलकरंजी-मदन कारंडे.राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पहिल्या यादीत एकूण 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती, तर दुसऱ्या यादीमध्ये आता 22 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आतापर्यंत एकूण 67 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

*उद्या उत्तमराव जानकर विकास धाईंजे राष्ट्रवादीकडून फॉर्म भरणार*

You may have missed