आंतरराष्ट्रीय

12 जानेवारी जिजाऊ जयंतीनिमित्त पिरळे येथे पुरोगामी महाराष्ट्र व ग्रामपंचायत यांच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे दिनांक 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती तसेच सावित्री-जिजाऊ जयंती सप्ताह निमित्त पुरोगामी महाराष्ट्र व ग्रामपंचायत पिरळे यांच्या वतीने तसेच नेत्र रुग्णालय महम्मद वाडी हडपसर पुणे यांच्या विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच या शिबिरात डोळे तपासणी करून अल्पदरात चष्मे वाटप करण्यात येणार आहे.
हे शिबिर ग्रामपंचायत कार्यालय पिरळे येथे
सकाळी 9 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत सुरू राहणार असून या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त गरजू ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन पिरळे गावचे सरपंच संदीपसेठ नरोळे, पुरोगामी महाराष्ट्रचे प्रमोद शिंदे, व उपसरपंच उमेश खिल्लारे ,मोहम्मद वाडी हॉस्पिटलचे डॉ.वाघमारे तसेच ग्रा.पं.सदस्यांनी आव्हान केले आहे.

नातेपुते येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते तालुका माळशिरस येथे पत्रकार दिनानिमित्त विविध ठिकाणी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
पत्रकार हा समाजाचा आरसा असल्याने पत्रकार दिनानिमित्त नगरपंचायत नातेपुते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,राष्ट्रीय समाज पक्ष, महात्मा फुले समता विकास परिषद,नागरी विकास आघाडी,वारकरी संप्रदाय तसेच वैभव कवितके मित्रपरिवार नातेपुते,पुरोगामी महाराष्ट्र व एन.डी.एम.जे,अक्षय भांड मित्रपरिवार, गणेश प्रतिष्ठान नातेपुते,लोकमंगल बँक,अण्णा पांढरे यांच्या वतीने डायरी,पेन, गुलाब पुष्प देऊन पत्रकारांचा उचित सन्मान करण्यात आला.यावेळी नगर पंचायत चे मुख्याधिकारी माधव खांडेकर,माजी सरपंच ऍड.बी वाय.राऊत राष्ट्रवादीचे नेते धैर्यशीलभाऊ देशमुख, राजकुमार हिवरकर,निजाम काझी,अक्षय भांड विनायक ऊराडे, डॉक्टर नरेंद्र कवितके वैभव कवितके, नंदकिशोर ढालपे,शाहिद भाई मुलाणी, पै.सुळ, माऊली सरक, बिपिन सातपुते, शेखर आटक, नी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी दुग्ध विकास मंत्र महादेवजी जानकर यांनी फोनद्वारे नातेपुते येथील सर्व पत्रकारांना वैयक्तिक फोन करून शुभेच्छा दिल्या.पत्रकार दिनानिमित्त नगरपंचायत येथे माझी वसुंधरा ही प्रतिज्ञा घेण्यात आली.तसेच पुरोगामी महाराष्ट्र च्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचा निकाल मुख्य अधिकारी माधव खांडेकर व पत्रकारांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला.पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार सुनील दादा राऊत यांनी आभार व्यक्त केले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार लतीफ भाई नदाफ, सुनील दादा राऊत, श्रीकांत बाविस्कर,एन के साळवे, अभिमन्यू आठवले,आनंद लोंढे,प्रमोद शिंदे,विलास भोसले,मनोज राऊत,आनंद जाधव,उमेश पोतदार, सचिन रणदिवे,श्रीराम भगत,अमित सोरटे. व इतर प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

दिव्यांगांचा पाच टक्के निधी तात्काळ द्या अन्यथा आंदोलन

एन.डी.एम.जे संघटनेचे दिव्यांग आघाडीचे शंभर टक्के अंध जीवन (तात्या) धांडोरे यांचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन

दिव्यांगांचा पाच टक्के निधी तात्काळ द्या अन्यथा आंदोलन आंध जीवन धांडोरे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना दिव्यांगांकडे मात्र दुर्लक्ष होत असून दिव्यांगांचा हक्काचा 5 टक्के निधी प्रत्येक ग्रामपंचायतींच्या मार्फत प्रत्येक गावातील दिव्यांग बांधवांना दिला जातो हा निधी माळशिरस तालुक्यात कोणत्याही गावात निधी दिव्यांगांना दिला नाही तो तात्काळ देण्यात यावा व ज्या ग्रामपंचायतींनी 5 टक्के निधी अद्याप दिला नाही त्या ग्रामसेवकांना निलंबित करावे म्हणून यामुळे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) च्या दिव्यांग युवा आघाडीचे प्रमुख शंभर टक्के अंध असलेले जीवन (तात्या) धांडोरे यांनी थेट माळशिरस चे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले अन्यथा 26 जानेवारी 2022 रोजी तहसीलदार कार्यालयापुढे आंदोलन करणार असल्याचे सांगितले. याची गंभीर दखल घेत तहसीलदार निंबाळकर यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे जलद अहवाल मागितला आहे.
100 टक्के अंध असलेला जीवन (तात्या) धांडोरे याच्या सामाजिक कामाचे सर्वत्र कौतुक होत असून युवकांनी यातून शिकण्यासारखे आहे
.

एन.डी.एम.जे. मुंबई ठाणे प्रदेश या संघटनेनी वसई गाव सातीवली पालटी पाडा येथे मूळनिवासींची घेतली भेट

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ठाणे बंदिश सोनवणे दि.७\१\२०२२/ वसई गाव सातीवली पालटी पाडा येथे
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस राज्य महासचिव
ॲड.डॉ केवलजी उके सर यांच्या आदेशाने व
एन.डी.एम.जे.मुंबई ठाणे प्रदेशआध्यक्ष मा बंदिशजी सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली. एन.डी.एम.जे.मुंबई ठाणे प्रदेश सचिव शशिकांतजी खंडागळे
,ठाणे जिल्हा एन.डी.एम.जे.
विधी सलागार ॲड. प्रशांत जाधव व कल्याण डोंबिवली एन.डी.एम.जे.सचिव संदीपजी घुसळे सर यांनी ता. वसई गाव सातीवली पालटी पाडा येथे भेट घेतली
येथील स्थानिक आदिवासींवर जे काही अन्याय अत्याचार पिडीत कुटुंबातील जमीन,पाणी, लाईट, व शिक्षणा पासून वंचित आहेत आशा सर्व समस्या जाणून समजुवून घेऊन ऐन. डी .एम. जे. मुंबई ठाणे प्रदेश ह्या संघटनेनी आदिवासी बांधवास सर्व समस्या निवारण करण्याचा दिलासा दिला.
व तेथील प्रत्येक वैक्ती चे वयक्तीक अडचण समजून घेतली व अध्यक्ष बंदिश सोनवणे सरांनी त्यांना दिलासा दिला कि जोपर्यंत तुमच्या समस्यांचा निवारण करत नाही तोपर्यंत एन.डी.एम.जे.महाराष्ट्र राज्य चा प्रत्येक सदस्य तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहील व तुमच्या प्रत्येक समस्यांच निवारण करेल
त्या वेळेस शिर्वंन भिमरा, प्रवीण भिमरा,दामोदर भोईर, शकुंतला पोवार,सुनंदा,भिमरा,सुमन दांडेकर, तुळशी बाई ठाकरे ,शेवंती ठाकरे,रंजना ठाकरे,रामु भिमरा,लक्ष्मण मंजळकर,सुदाम लोखंडे,आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रतिनिधि. बंदिश सोनवणे

पिलीव येथील सुजित सातपुते राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित..!

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील सा.माळशिरस टाईम्स या वृत्तपत्राचे मुख्य संपादक सुजित दिगंबर सातपुते यांना आज बुधवार दिनांक 5 जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य या समितीच्यावतीने आदर्श पत्रकार या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पत्रकारीता एक वसा,एक चळवळ,ध्येय,ध्यास समजून सर्व सामान्य माणसांच्या न्याय हक्कासाठी सुजित सातपुते यांनी आज पर्यंत आपल्या लेखनीच्या माध्यमातून वेळोवेळी आवाज उठवून पिडीतांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.पिलीवसह परिसरातील ग्रामीण भागातील विविध समस्यांविषयी जागृत राहून संबंधित प्रशासनास शासकीय काम करण्यासाठी भाग पाडून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची सातपुते महत्वाची भूमिका बजावत असल्याबद्दल पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्याचे सर्वेसर्वा यशवंतजी पवार व प्रदेश सचिव डॉ.आशिषकुमार सुना यांच्या मार्गदर्शनखाली आज सुजित सातपुते यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी ॲड.सत्यजित गलांडे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस,चेअरमन अविनाश जेऊरकर,तंटामुक्ती अध्यक्ष तथा जेष्ट पत्रकार दामोदर लोखंडे,माजी सरपंच आप्पासाहेब लोखंडे,ग्रा.पं सदस्य जीवन गुरव,तानाजी लोखंडे,निसार शेख यांसह पिलीव पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

कुमारीआणुष्का संदेश भालेराव हिने जिकंले पाच इन्टरनॅशनल पुरस्कार

कुमारीआणुष्का संदेश भालेराव हिने जिकंले पाच इन्टरनॅशनल पुरस्कार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कल्याण बंदिश सोनवणे दिनांक. ४\१\२०२२रोजी बी .के. बिर्ला कॉलेज कला, वाणिज्य आणि विज्ञान स्वायत्त कल्याण (पश्चिम) ईथे कु.आणुष्का भालेराव हीचा पाच गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला
कु.आणुष्का भालेराव ही बी .के .बिर्ला कॉलेज कला, वाणिज्य आणि विज्ञान स्वायत्त कल्याण ईथे T.Y.Bcom (Banking & Insurance) मध्ये शिक्षण घेत आहे
सदर काॅलेज मध्ये २९ व्या आंतरराष्ट्रीय आर्थिक अधिवेशनात(29thinternational economic convention) स्पर्धा परीक्षेचे आयोजन.


अध्यक्ष: श्री ओ आर चितलांगे सर
दिग्दर्शक(Director sir): Dr. नरेश चंद्रा सर यांच्याअदेशानुसार
मुख्याध्यापक: Dr. अविनाश पाटील सर यांच्या आयोजनात व मा.चंद्रा अय्यर मॅडम व मा. महादेव सर यांच्या मार्गदर्शनात . बी.के. बिर्ला महाविद्यालय विद्यार्थीन मधुन निवडक विद्यार्थीचा ग्रुप तयार केला ह्या मध्ये सहा विद्यार्थी
सदस्य :- आणुष्का संदेश भालेराव, आशिष कोठारी,वेदांश बर्गे तेजस भामरे,काजल जैस्वाल,
संजना केशरवाणी, ह्या विद्यार्थीना काॅलेज च्या स्पर्धा परीक्षेत उतरविण्यात आले आसता. हि परिक्षा
इंडोनेशिया ,पश्चिम जॉर्जिया,बल्गेरिया फ्रान्स, आजुन बर्‍याच देशा पैकी आपल्या भारतातील नॅशनल काॅलेज, आर.ए.पोद्दार काॅलेज, युनिवर्सिटी ऑफ डब्लू गोरेगाव,के.सी.काॅलेज ,सी एच.एम काॅलेज,” बी.के.बिर्ला काॅलेज ” इत्यादी काॅलेज मधून विशेष म्हणजे बर्‍याच देशा मधून
ठाणे जिल्ह्यातील कल्याण (पश्चिम)मधील बी. के .बिर्ला कॉलेज कला, वाणिज्य आणि विज्ञान स्वायत्त कल्याण बिर्ला महाविद्यालय (काॅलेज) चा “दुसरा” क्रमांक आला असता बिर्ला काॅलेज मधील या सहा विजेता विद्यार्थी वर शुभेच्छांचा वर्षाव झाला काॅलेज मधील सर्व सन्माननीय शिक्षक, शिक्षिका,विद्यार्थी नी या सहा विजेता विद्यार्थ्यांना शुभेछा देऊन सन्मान केला .
ह्या मधील सहा ही विद्यार्थीना अध्यक्ष: श्री ओ आर चितलांगे सर
दिग्दर्शक(Director sir): Dr. नरेश चंद्रा सर
मुख्याध्यापक: Dr. अविनाश पाटील
मार्गदर्शक :चंद्रा अय्यर ,महादेव सर यांच्या शुभ हस्ते
विजेता सन्मान ट्रॉफी व पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या विजेता विद्यार्थी पैकी
कुमारी “आणुष्का संदेश भालेराव” हीला
🏆Best innovative suggestions 1st price
🏆 Research paper 2nd price
🏆Best presentation 2nd price
🏆Best speaker
🏆And overall 3rd price
अशे पाच पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले पुरस्कार देताना सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते

पुरोगामी महाराष्ट्र च्यावतीने जि.प.शाळा पिरळे येथे सावित्री बाई जयंती नमित्त वही-पेनचे वाटप


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुरोगामी महाराष्ट्र व एन.डी.एम.जे. प्रमोद शिंदे च्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना वही-पेन चे वाटप करण्यात आले.जि.प.शाळा पिरळे यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.जयंतीनमित्त शाळेमध्ये विविध उपक्रम राबवणत आले विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, डान्स स्पर्धा खेळाच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना एन.डी.एम. जे व पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने 26 जानेवारी रोजी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिरळे गावच्या विद्यमान सरपंच अलका नरोळे ह्या होत्या सावित्रीबाई जयंती निमित्त शाळेच्या वतीने गावातील महिला यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात ढवळे सर व मुल्ला मॅडम यांनी सावित्रीची ओवी तसेच प्रतिज्ञा घेऊन सुरुवात करण्यात आली या वेळी भाऊसाहेब भिसे सर,प्रमोद शिंदे,विश्वास बनकर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास शालेय शिक्षण समिती अध्यक्ष आनंदराव लवटे, संदीप पवार,नितीन खिलारे व सदस्य उपस्थित तसेच अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ढवळे सर,जब्बर मुलानीसर, खरात सर, निगडे सर,मुल्ला मॅडम,नामदेव मॅडम, शेंडगे मॅडम यांनी परिश्रम घेतले.

एन.डी.एम.जे. ठाणे जिल्ह्या चे प्रसिद्धीप्रमुख संदेश भालेराव यांचा करत वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमाने साजरा

एन.डी.एम.जे. ठाणे जिल्ह्या चे प्रसिद्धीप्रमुख संदेश भालेराव यांच

वाढदिवस अनेक सामाजी

उपक्रमांनी साजरा..

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोनवणे ठाणे दि.१\१\२०२२रोजी
ठाणे जिल्ह्यातील कर्तव्यनिष्ठ व्यक्तीमत्व संकटकाळात पीडितांच्या मदतीला धाव घेणारे , गरजूंना मायेची साथ देणारे, अन्याला वाचा फोडणारे सर्वधर्मसमभाव जपणारे अशी भूमिका घेऊन, अन्याय करणाऱ्याना धडा शिकविणारे ठाणे जिल्ह्यातील डॅसिंग व्यक्तिमत्व पत्रकारिता मध्ये उत्कृष्ठ बदल घडवणारे कार्यकुशल सोशल न्युज नेटवर्कच्या माध्यमाने सरकारला धारेवर धरणारे पुरोगामी महाराष्ट्र न्युज चॅनलचे प्रतिनिधि व नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीसचे ठाणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मुरबाड तालुक्यातील आंबेगावचे मूळ रहिवाशी पत्रकार संदेश तुकाराम भालेराव यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक सामाजीक उपक्रम राबवून आपला जन्मदिन साजरा केला.

संदेश भालेराव यांना नॅशनल दलित मुव्हमेट फ़ॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य, ठाणे जिल्हा टिम, पुरोगामी महाराष्ट्र न्युज नेटवर्क ,बहुजन बहुउद्देशीय सामाजिक सांस्कृतिक संस्था वंचित बहुजन आघाडी ,AISCST नॅशनल रेल्वे यूनियन यांनी जन्मदिनाच्या शुभेच्छा व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभकामना व्यक्त केल्या.

सामाजीक कार्यकर्ते तथा पत्रकार संदेश भालेराव यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास ठाणे जिल्ह्यातील एन.डी.एम.जे. जिल्हा अध्यक्ष मा.विजयजी कांबळे, एन.डी.एम.जे .ठाणे जिल्हा सचिव विनोद एस रोकडे, एन.डी.एम.जे कल्याण डोंबिवली शहर जिल्हाध्यक्ष अँड. प्रविणजी बोदडे ह्यांच्या उपस्थितीने सर्व प्रथम बूद्ध वंदना घेउन संदेश भालेराव यांचा वाढदिवसाचा केक कापुन शाल व पुष्पगुच्छ देऊन जन्मदिनाच्या मंगल कामना व्यक्त करून पुढील कार्यास मान्यवरांनी सदिच्छा व्यक्त केल्या.

तसेच आदरणीय.डॉ.केवलजी उके राज्य महासचिव एन.डी.एम.जे.महाराष्ट्र राज्य, मा.वैभवजी गिते राज्य सचिव,
मा पी.एस.खंदारे राज्य सहसचिव, मा.प्रमोदजी शिंदे राज्य प्रसिद्धीप्रमुख व एन.डी.एम.जे.महाराष्ट्र राज्य सर्व सन्माननीय सभासद व पदाधिकाऱ्यांनी ऑनलाईन सोशियल मिडीया द्वारे वाढदिवसा च्या शुभेछा दिल्या.

वाढदिवसाचे औचित्य साधून मा.ॲड.डॉ.केवलजी उके राज्य महासचिव एन.डी.एम.जे. यांच्या अदेशानुसार विनोद रोकडे यांच्या संयोजनांने व एन.डी.एम.जे.ठाणे जिल्हाअध्यक्ष मा.विजय कांबळे व ॲड.प्रविणजी बोदडे,यांच्या उपस्थितीत नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य (एन.डी.एम.जे) या सामाजिक संघटनेचे दि. ७ जानेवारी २०२२ रोजी नातेपुते तालुका माळशिरस जिल्हा सोलापुर येथे राज्यस्तरीय दुसरे महा अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनात
एन.डी.एम.जे.महाराष्ट्र राज्य संघटने कडून संदेश भालेराव यांना छत्रपती शिवाजी महाराज बहुजन नायक पुरस्कार व सन्मानचिन्ह घोषित केले .
व त्यांचा गौरव करण्यात आला. संदेश भालेराव यांनी आज आपल्या जन्मदिनी अनेक सामाजीक उपक्रम राबवून वाढदिवसाचा अनाठायी खर्च कमी करूण शालेय विद्यार्थीना पेन पेन्सिल वाटप केले वआपला वाढदिवस साजरा केला.
ह्या कार्यक्रमात उपस्थित मा. नथुरामजी मोहिते,श्रीधर शिंदे,विक्रम जाधव, कपिल पगारे,विजय निकाळजे,सुप्रसिद्ध गायक सुरेश घोडेराव, शहापूर तालुका प्रसिद्धीप्रमुख मनोहर गायकवाड व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते

प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पेन्शन धारकांना महिना अखेर आला तरी पेन्शन नाही


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे महिना संपत आला तरीही पेन्शनधारकांना पेन्शन मिळाली नाही.आज आखेर दिनांक 22 डिसेंबर पर्यंत अद्यापि ही गेल्या महिन्यातील पेन्शन,पेन्शन धारकांच्या खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे पेन्शन धारक टेन्शनमध्ये आले आहेत. निवृत्तीनंतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचे पुढील वृद्धापकाळातील जीवन सुरळीत चालावे व कोणाचही आधाराशिवाय चांगले जीवन जगता यावे यासाठी शासनाकडून निवृत्त कर्मचाऱ्याला पेन्शन दिली जाते.परंतु ती पेन्शन सध्याच्या काळात तुटपुंजी असून महिनाभर पुरत नाही. तसेच ही पेन्शन प्रत्येक महिन्याच्या एक ते पाच तारखेच्या दरम्यान मिळायला हवी परंतु प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे दुसरा महिना उजाडेपर्यंत सुद्धा पेन्शन निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळत नाही.त्यामुळे त्यांना अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते इतरांसमोर हात पसरावे लागते. ग्रामीण भागात राहणाऱ्या पेन्शनधारकांना शहरा च्या ठिकाणी बँकेत जाऊन तासन तास रांगेत उभे राहून पेन्शन जमा झाली का नाही पाहावी लागते.पेन्शन जमा न झाल्याने हाताश होऊन ते परत घरी येतात पेन्शन वर महिनाभराचे अनेक प्रकारचे नियोजन केले जाते.पण एखाद्या महिन्यात पेन्शन नाही झाली तर मात्र तारांबळ उडते. नुकताच 17 डिसेंबर रोजी सर्वत्र पेन्शन डे साजरा करण्यात आला.
तरीसुद्धा निवृत्ती धारकांना अजूनही पेन्शन मिळाली नाही. यावरून प्रशासनाची उदासीनता दिसून येते त्यामुळे पेन्शन धारक चिंतेत पडला आहे. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला खात्यात पेन्शन जमा करण्याचे मागणी पेन्शनधारकांन कडून होत आहे. यावर अंमलबजावणी न झाल्यास तीव्र स्वरूपाचे निवृत्त कर्मचाऱ्यांकडून आंदोलन छेडले जाईल असा इशारा प्रशासनाला दिला आहे .

नातेपुते ऐतिहासिक नगरपंचायतीसाठी ७६.२ टक्के मतदान

13जागांसाठी ५४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद,

मतमोजणीच्या तारखेकडे उमेदवारांचे व मतदारांचे लक्ष     

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे : नातेपुते ऐतिहासिक नगरपंचायतीसाठी मंगळवारी दि.२१ रोजी सकाळी ७ :३० वाजल्यापासून शांततेत मतदानास सुरुवात झाली सकाळी काही मतदान केंद्रावरती मतदारांची मतदानासाठी गर्दी तुरळक दिसत होती मात्र दुपारनंतर सर्व मतदान केंद्रावरती मतदारांची गर्दी दिसून आले एकूण १७ प्रभाग आहेत यापैकी  १३ प्रभागासाठी निवडणूक झाली आता ४ प्रभागासाठी १८ जानेवारीला निवडणूक होणार आहे १३ जागेसाठी ५४ उमेदवाराचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले  एकूण मतदान ७६ टक्के झाले एकूण मतदान १०९५४ पैकी ८३४७ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे  प्रभाग क्र १ मध्ये मतदान ५९७ पैकी ५०४, प्रभाग क्र २ मध्ये मतदान ६८८ पैकी ४७८ , प्रभाग क्र ३ मध्ये मतदान ६५३पैकी ४७८. प्रभाग क्र ४ मध्ये मतदान ५३० पैकी ४१०. प्रभाग क्र ५ मध्ये मतदान १४०४ पैकी १०८७.प्रभाग क्र ६ मध्ये ८६१ पैकी ७११  प्रभाग क्र ११ मध्ये मतदान ४१८ पैकी ३६७. प्रभाग क्र १२ मध्ये मतदान ८१८ पैकी ६०६. प्रभाग क्र १३ मध्ये मतदान  ८६३ पैकी ६३८. प्रभाग क्र १४ मध्ये मतदान ८२६ पैकी ६०७. प्रभाग क्र १५ मध्ये मतदान ८८१ पैकी ६९२. प्रभाग क्र १६ मध्ये मतदान ११४८ पैकी ८९१. प्रभाग क्र १७ मध्ये मतदान १२६७ पैकी ८७८, मतदान झाले. पहिली व ऐतिहासिक निवडणूक असल्याने या निवडणुकीमध्ये तुरस पाहावयास मिळाली.ही निवडणुक पंच रंगी झाल्याचे निदर्शनास आले.यामध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांचा गटाची जनशक्ती आघाडी तर ऍड बी वाय राऊत यांची नागरी विकास आघाडी व राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर तसेच बाबाराजे देशमुख यांचे बंधू राष्ट्रवादीचे नेते धैर्यशील भाऊ देशमुख यांचा समाजभूषण पॅनल तसेच वंचित बहुजन आघाडी, मनसे व अपक्ष उमेदवारा मध्ये तुरस पाहावयास मिळाली.या निवडणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे प्रभाग क्रमांक ३ मधील १० उमेदवार मतदानाच्या दिवशी एकत्र आले व चक्क फोटव सेल्फी काढला. व तो फोटो अपक्ष उमेदवार समीर सोरटे यांनी फोटो सोशल मीडिया वरती टाकला या फोटो मुळे सोशल मीडिया वरती चर्चेला उधाण आले. निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी माधव खांडेकर यांनी काम पाहिले. तसेच निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या नेतृत्वात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

You may have missed