शिखर शिंगणापूर घाटात भाविकांच्या क्रूजरवर दरोडा नातेपुते (प्रमोद शिंदे) :फलटण शिंगणापूर रोडवरील कोथळे गावाच्या पुढील शिंगणापूर घाटात तीन मोटरसायकलवर सहा जण येऊन क्रुझर गाडी अडवून शिखर शिंगणापूर कडे जाणाऱ्या भाविकांना मारहाण करून त्यांच्याकडून दागिने व रोख रक्कम एक लाख रुपयाचा माल दरोडेखोरांनी पळवला व दरोडेखोर फरार झाले.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की चिवरी व उमरगा गावातील लोकांना आळंदी देहू जेजुरी खर शिंगणापूर पंढरपूर अशा देव दर्शनाकरिता भाड्याने गाडी केली होती. सदर गाडी देहु आळंदी जेजुरी देवदर्शन करून फलटण मार्गे शिखर शिंगणापूर ला जात असताना रात्री साडे दहा वाजता कोथळे ते शिंगणापूर रोडवर कोथळे गावाच्या पुढे घाटात या भाविकांच्या गाडी ला तीन मोटरसायकल त्यावरील सहा दरोडेखोरांनी पास करून पुढे जाऊन घाटात गाडी थांबवली व ते ड्रायव्हर ला मारहाण करून त्याच्या कडील क्रूजर गाडी च्या चाव्या हिसकावून घेतल्या व भाविकांना म्हणाले तुमच्या जवळील सर्व पैसे व सोने आम्हाला द्या नाहीतर तुम्हाला जीवे मारू असे म्हणून गाडी च्या पाठीमागे गाडी च्या काचेवर दगड लाकडी दांड्याने काच फोडली व गाडीतील पुरुष व महिला यांच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतले. व ते दरोडेखोर मोटरसायकली वरून शिंगणापूरच्या दिशेने निघून गेले यामध्ये गाडीचा ड्रायव्हर चैतन्य बडुरे राहणार येवती तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद त्याच्याकडील 500 रुपये किमतीच्या सॅमसंग कंपनी रंगाचा आयडिया कंपनी सिम कार्ड व गजू बाई त्रिंबक सूर्यवंशी यांचे सहा हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व दोन हजार रुपये रोख तसेच कोंडाबाई अनिल सावंत यांचे बारा हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र व दोन हजार रुपये तसेच धोंडाबाई गोविंद वडजे त्यांचे सहा हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र तसेच भामाबाई भागवत कदम यांच्या आठ हजार रुपये किमतीचे मणी-मंगळसूत्र व दोन हजार रुपये तसेच सुरेखा दिलीप शिरगिरे यांचे मनी मंगळसूत्र 14 हजार रुपये किमतीचे सोने तसेच वनिता मधुकर शिरगिरे यांच्याकडे दीड हजार रुपये रोख तसेच सुमन ज्ञानदेव सावंत यांच्याकडील 23 हजार रुपये किमतीचे मणी मंगळसूत्र दोन ग्रॅम ची कर्णफुले रोख नऊ हजार रुपये तसेच मंगल नागनाथ शिरगिरे यांचे चार हजार 600 रुपयांची मंगळसूत्र रोख रक्कम सहाशे रुपये तसेच काशीबाई शिवाजी वडजे यांच्याकडील चार हजार रुपये मनी मंगळसूत्र तसेच रुक्मिणीबाई आबा शिरगिरे यांच्याकडील सात हजार पाचशे रुपयाची मणी-मंगळसूत्र तसेच संगीता धनाजी सावंत यांच्याकडील दहा हजार रुपये किमतीची काळ या महिन्यातील मणी-मंगळसूत्र तसेच घनाजी मारुती सावंत पाचशे रुपये किमतीचा स्माईल कंपनीचा मोबाइल तसेच विमल वसंत शिरगिरे यांच्याकडील आठ हजार रुपये किमतीचे मनी मंगळसूत्र असा एकूण एक लाख पाच हजार सहाशे रुपये किमतीचे दागिने घेऊन 6 अनोळखी इसम रात्री साडेदहा वाजता फरार झाले त्यांनी क्रूजर गाडी नंबर एम एच 13 ए सी8359 या गाडीच्या काचा फोडून 1000 रुपयाचेही नुकसान केले याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर ८०/२०२० प्रमाणे कलम३९५, ३४१,५०४,५०६,४२७ प्रमाणे नातेपुते पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय युवराज खाडे हे करीत आहेत. सदर आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पीडित भाविकांनी केली आहे.
Blog
केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आज गुरुवार दि. 12 मार्च रोजी राजसभा निवडणुकीचा अर्ज भरणार
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे )मुंबई दि. 11 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले हे आज गुरुवार दि.12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरणार आहेत. राज्यात भाजपशी युती असल्याने रिपाइं एन डी ए चा घटक पक्ष आहे. भाजप रिपाइं युती चे उमेदवार म्हणून ना रामदास आठवले उद्या राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरणार असून या वेळी त्यांच्या समवेत भाजप नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; भाजप प्रदेश अध्यक्ष चांद्रकांतदादा पाटील आणि रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित असतील.
येत्या दि. 26 मार्च रोजी राज्यसभेच्या 7 जागांसाठी राज्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 13 मार्च पर्यंत आहे. ना रामदास आठवले यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाची मुदत येत्या 2 एप्रिल रोजी संपत आहे.ते यापूर्वी 2014 च्या राज्यसभा निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून ना.रामदास आठवले यांची दुसऱ्यांदा निवड झाली आहे.
राज्यसभेसाठी भाजप ने मित्रपक्ष म्हणुन रिपाइं प्रमुख रामदास आठवले यांना दुसऱ्यांदा संधी दिली आहे. उद्या गुरुवार दि. 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता ना रामदास आठवले राज्यसभा निवडणुकीचा आपला उमेदवारी अर्ज विधानभवन येथे भरणार आहेत. भाजप ने मित्रपक्ष म्हणून राज्यसभेची महाराष्ट्रातील एक जागा रिपाइं( आठवले) या पक्षाला सोडली असल्याने ना रामदास आठवले आपल्या रिपाइं च्या एबी फॉर्मवर उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
ईगल फौंडेशनचा राज्यस्तरीय गरुडझेप गौरव सोहळा थाटात
ईगल फौंडेशनचा राज्यस्तरीय गरुडझेप गौरव सोहळा थाटात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ( प्रमोद शिंदे )-राजश्री शाहु स्मारक कोल्हापूर येथे रविवार दि 8/3/2020 याठिकाणी ईगल फौंडेशनचा राष्ट्रीय गरूडझेप कार्यगौरव सोहळा अत्यंत उत्साहात,थाटात व प्रचंड गर्दीमध्ये पार पडला.
हा दैदिप्यमान सोहळा आयोजित करून तो अतिशय सुरेख ,शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पार पडला.प्रा तौहिद मुजावर यांचे यावेळी मनशांती हा यशाचा मूलमंत्र या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन केले.प्रा.मुजावर यांचे व्याख्यान ही एक सर्वांसाठी एक पर्वणीच ठरली.अत्यंत प्रेरणादायी विचारांनी त्यांनी सर्व सभागृह खिळवून ठेवल होते .यावेळी आमदार श्री महादेव जानकर,सौ.अरुंधती धनंजय महाडिक, पोलीस निरीक्षक संजय मोरे,विलासराव कोळेकर,यांनी समारंभास शुभेच्छा दिल्या. व्यासपिठावर डॉ.डी.वाय.पाटील ग्रुपचे विश्वस्त सुर्यकांत तोडकर, लयभारी संदेशचे संपादक प्रशांत लाड, जिजामाता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष कुलकर्णी, आदींची विशेष उपस्थिती होती.या सोहोळ्याचे नेहमीप्रमाणे प्रभावी सुत्रसंचालन श्री कुलकर्णी यांनी केले. यावेळी प्रा.डॉ.स्मिता गिरी यांच्या ‘काव्य-विभोरी ‘ या कविता संग्रहाचे व दै.झुंजार सेनापती यांच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या गौरव विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या प्रसंगी सौ.स्मिता लंगडे,डॉ.लक्ष्मी भारती,सौ.अरूंधती महाडिक ,सौ.पुजा कदम,,कु.जयश्री चव्हाण, डॉ.राजेंद्र पाटील,कँप्टन गणपतराव घोडके,प्रा.तौहिद मुजावर, प्रा.डॉ.महेशकुमार मोटे आदी कर्तृत्ववान व्यक्तींना दर्जेदार मानपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी ईगल फौंडेशनचे उपाध्यक्ष सागर पाटील, शेखर सुर्यवंशी,प्रकाश वंजोळे, प्रा.तुकाराम पाटील ,सुभाष भोसले, दिपक पोतदार, सौ.श्रद्धा पाटील, अशोक शिंदे,कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी चे सर्व पदाधिकारी ,तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच महाराष्ट्र पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष सचीन बैरागी, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष संजय नवले,रायगड संपर्कप्रमुख संजय गायकवाड आदी पदाधिकारीही उपस्थित होते.
तुकाराम गाव तांबेवाडी येथे संत तुकाराम महाराज बीज उत्सव मोठ्या उत्साहात*
तांबेवाडी येथे संत तुकाराम महाराज बीज उत्सव मोठ्या उत्साहात*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) तुकाराम गाव तांबेवाडी ता. माळशिरस येथे संत तुकाराम महाराज बीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या उत्सवाची परंपरा आशि की माळशिरस तालुक्यातील हे पश्चिमेकडील शेवटच्या टोकाचे गाव आहे. हा उत्सव एकशे आठ वर्षापासून अखंडपणे सुरू आहे. या गावाला तुकाराम गाव असे म्हटले जाते 1912 पासून तुकाराम महाराज बिजो उत्सव साजरा होत आहे. या उत्सवाची सुरुवात तरडगाव चे ह.भ.प बापू दादा महाराज यांनी केली आहे. तर ह.भ.प सोनोपंत मामा दांडेकर महाराज यांनी 1962 साली संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. सुरुवातीला छोट्या प्रमाणात बीज उत्सव होत होता आता हजारोंच्या संख्येने पंचक्रोशीतील भाविक बीजो उत्सवासाठी या तुकाराम गावात येतात. .याठिकाणी दरवर्षी 3000 किलोचा महाप्रसाद केला जातो. या उत्सवासाठी गावातील ग्रामस्थ तन-मन-धनाने अहोरात्र काम करतात हा सोहळा दरवर्षी होळी आणि धुलीवंदन दरम्यान येतो परंतु या गावात एकशे आठ वर्षापासून धुलीवंदन, धुळवड साजरी केली जात नाही. हा सोहळा नवमीला सुरू होतो व बीजेला समाप्त होतो. त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते व कीर्तन सेवा ठेवली जाते. याहीवर्षी ही सप्ताहाचे आयोजन केले होते या सप्त्या मध्ये.मध्ये ह-भ-प दत्तात्रय महाराज गलांडे लासुरणे, ह-भ-प सोमनाथ महाराज घोगरे देशमुखवाडी, ह भ प सुनील महाराज यादव, ह भ प केशव महाराज लासुरने, ह भ प हनुमंत महाराज फुले, ह-भ-प गोरख महाराज रायते पंढरपूर, ह-भ-प सागर महाराज बोराटे नातेपुते, ह-भ-प कैलास महाराज केंजळे, ह भ प माणिक महाराज निंबाळकर चे कीर्तन सेवा झाली आहे.धुलीवंदन या दिवशी दिंडीचे आयोजन केले जाते. व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी चे पूजन करून गाव प्रदक्षणा वाजत गाजत मोठ्या उत्साहात केली जाते दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनाचे आयोजन केले जाते अशाप्रकारे आगळावेगळा कार्यक्रम तुकाराम गाव तांबेवाडी येथे दरवर्षी साजरा केला जातो .
तांबेवाडीत संत तुकाराम महाराज बीजोत्सव १०८वर्षाची परंपरा उद्या होणार मोठा उत्सव
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे) : तांबेवाडी (तुकाराम गाव) ता. माळशिरस येथील श्री संत तुकाराम मंदिरात दिनांक ४ मार्च ते ११ मार्च पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहासह तुकाराम गाथा पारायण महोत्सव संपन्न होत आहे यावर्षी संत तुकाराम महाराज बिजोत्सवाचे १०८ वे वर्ष असून तांबेवाडी (तुकाराम) गावात प्रसन्न व भक्तिमय वातावरण झाले आहे अखंड हरिनाम सप्ताह मध्ये ह-भ-प दत्तात्रय महाराज गलांडे लासुरणे, ह-भ-प सोमनाथ महाराज घोगरे देशमुखवाडी, ह भ प सुनील महाराज यादव, ह भ प केशव महाराज लासुरने, ह भ प हनुमंत महाराज फुले, ह-भ-प गोरख महाराज रायते पंढरपूर, ह-भ-प सागर महाराज बोराटे नातेपुते, ह-भ-प कैलास महाराज केंजळे, ह भ प माणिक महाराज निंबाळकर यांची कीर्तन सेवा चालू असून दिंडी पालखी प्रदक्षिणा मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे सर्व परमार्थ प्रेमी भाविक आणि परिसरातील सर्व श्रोते जनानी लाभ घ्यावा असे संयोजकांनी कळविले आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपाशीर्वादाने आणि सर्व संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले मौजे तांबेवाडी गाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे पवित्र ते कुळ पावन तो देश | जिथे हरीचे दास जन्म घेते | अशा पवित्र भूमीमध्ये स्वल्प वाटे चला जाऊ | वाचे गाऊ विठ्ठला | या न्यायाने वै. हरीभक्त पारायण सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर आणि वै. गुरुवर्य राजाराम बापू पवार, शेलार मामा, साधू अण्णा शिंदे महाराज यांचे आशीर्वादाने आयोजित केले आहे तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी तनमनधनाने श्रवण सुखाचा आनंद घ्यावा असे आव्हान ग्रामस्थ तांबेवाडी (तुकारामगाव) यांनी केले आहे
*धर्मपुरी ग्रामपंचायत च्या वतीने मागासवर्गीय मुलींना सायकल वाटप व कुस्ती केंद्राचे उद्घाटन
*धर्मपुरी ग्रामपंचायत च्या वतीने मागासवर्गीय मुलींना सायकल वाटप व कुस्ती केंद्राचे उद्घाटन*
*नातेपुते (प्रमोद शिंदे) -धर्मपुरी ता.माळशिरस येथे ग्राम निधी 15 टक्के मागासवर्गीय निधी मधून मागासवर्गीय विद्यार्थिनींना 25 सायकल वाटप करण्यात आले तर दहा टक्के महिला बालकल्याण निधी मधु अंगणवाडी तील विद्यार्थ्यांना 240 ड्रेस वाटप करण्यात आले. व पाच टक्के अपंग निधी तून 19 लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येकी २००० रुपये जामा करण्यात आले. तसेच स्वर्गवाशी मा.आमदार हनुमंतराव डोळस यांच्या फंडातून कुस्ती केंद्र उभारण्यात आले. जय हनुमान कुस्ती केंद्र धर्मपुरी कुस्ती केंद्राचे उद्घाटन नातेपुते पोलीस स्टेशनचे ए.पी.आय.युवराज खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ए.पी.आय. युवराज खाडे कुस्ती निवेदक युवराज केचे, 1988 महाराष्ट्र केसरी नाना मगर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते पै.उमेश सूळ , दादा जवळकर आदी मान्यवर होते. ए.पी.आय.खाडे बोलताना म्हणाले की, कुस्ती हा खेळ पूर्वीसारखा राहिला नाही आता कुस्तीकडे खेळाडूंनी करिअर म्हणून पाहिले पाहिजे कुस्तीमुळे शरीर आणि मन तंदुरुस्त राहते. तरुणांनी नियमित व्यायाम केला पाहिजे तसेच या कुस्ती केंद्राचा चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. आपल्या ताकतीचा उपयोग चांगल्या कामासाठी व वाद मिटवण्यासाठी केला पाहिजे. तसेच पै.उमेश सुळ, युवराज केचे यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविकात सरपंच बाजीराव काटकर म्हणाले की इलेक्शन होऊन दोन वर्षे झाली गावामध्ये अनेक विकास कामे झाली आहेत गावात सीसीटीव्ही कॅमेरे, पाणी व्यवस्थापन, रस्त्याची कामे, 225 एलईडी, बसवण्यात आले आहेत .तसेच हाय मस्ट लॅम्प सुद्धा बसवण्यात आले आहेत. दरवर्षी पालखीचे जंगी स्वागत करण्यात येते. या कार्यक्रमासाठी दादासाहेब काटकर, पैलवान शंकर काळे, पांडुरंग कर्चे, दादा जवळकर,पत्रकार बंधु ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत धर्मपुरी यांच्यावतीने करण्यात आले होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व सदस्य व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
नितीन आगे खून खटल्यात न्याय मिळण्यासाठी गृह,विधी,व सामाजिक न्याय विभाग यांची संयुक्त बैठक लावण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र
नितीन आगे खून खटल्यात न्याय मिळण्यासाठी गृह,विधी,व सामाजिक न्याय विभाग यांची संयुक्त बैठक लावण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र
केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांची वैभव गिते यांनी भेट घेऊन निवेदन दिले
नितीन आगे खून खटल्यात मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात व फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याच्या खटल्यात मा जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर येथे नवीन वरिष्ठ विशेष सरकारी वकील नियुक्तीची मागणी
अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा या गावात नितीन आगे यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर आंबेडकरी जनतेनेच्या आंदोलनांनी संबंध महाराष्ट्र डोक्यावर घेतला होता अनेक लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषास सामोरे जावे लागले होते मा.अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात साक्षीदार फितुर झाल्याने पुराव्याअभावी सर्व आरोपी निर्दोष झाले होते.आंबेडकरी जनतेच्या यशस्वी आंदोलनांमुळे शासनाने मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात अपील दाखल केले होते तसेच फितूर साक्षीदारांवर कारवाई करण्याचा खटला अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.या खटल्यात सुद्धा विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती अद्याप झालेली नाही
शासनाने या खटल्यात मा.औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठात क्रिमिनल ऍप्लिकेशन क्रमांक 7226/2017 अपिलामध्ये शासनाची बाजू प्रभावी मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील मा.उमेशचंद्र यादव पाटील यांच्या संमतीपत्रानंतरच शासनाने नियुक्ती केली होती हा खटला सुनावणीस येताच अचानक शासनाने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांनी माघार घेतली आहे.तसे पत्र त्यांनी स्वतः शासनाच्या गृह विभागास पाठवले आहे.वकिलांनी हा खटला आत्ताच एवढ्या महत्वाच्या क्षणी का सोडला?यावर प्रश्नचिन्ह आहे.
मा.उच्च न्यायालयात हे अपील प्रथम स्टेजवर आहे.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड. डॉ.केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव तानाजी गिते यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदासजी आठवले यांची केंद्रीय मंत्रालय शास्त्रीभवन दिल्ली येथे जाऊन भेट घेऊन नितीन आगे खून प्रकरणात मंत्रालयीन अधिकारी यांची संयुक्त बैठक आपल्या अध्यक्षतेखाली घेण्यासाठी निवेदन दिले यावर मा.मंत्री रामदासजी आठवले यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.अनिल देशमुख यांना गृह विभाग,विधी व न्याय विभाग व सामाजिक न्याय विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यासाठी पत्र लिहले आहे यावेळी रिपाई (आठवले) राज्य सचिव हरेष भाई देखणे व एन.डी. एम.जे चे ठाणे जिल्हा सचिव विनोद रोकडे हे उपस्थित होते.
गटविकास आधिकारयांच्या आदेशाला ग्रामसेवकांकडुन केराची टोपली
गटविकास आधिकारयांच्या आदेशाला ग्रामसेवकांकडुन केराची टोपली…
शेकडो दिव्यांगासह एन.डि.एम.जे. संघटना करनार आंदोलन…
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क -हिंगोली जिल्ह्यातिल औंढा नागनाथ तालुक्यामध्ये जवळ जवळ 101 ग्रामपंचायती आहेत, व तालुक्यामध्ये दिव्यांग बांधवांची संख्या मोठ्या प्रमानात आहे, ग्रामपंच्यायतिच्या स्थानिक निधी मधुन व चौदावा वित्त आयोगातुन मिळनारया निधी पैकी ५ टक्के निधी आपंगावर खर्च करने बंधनकारक असुन देखिल तालुक्यातिल एकाही ग्रामपंचायतिने आपंगावर/दिव्यांगावर मागिल ५ वर्षापासुन निधी खर्च केलेला नाही तालुक्यातिल सर्व ग्रामपंचायतिच्या ग्रामसेवक व सर्व सरपंच जानुन बुजुन दिव्यांगाच्या सर्वांगिन विकासासाठी आसलेला हक्काचा निधी खर्च करन्यास टाळाटाळ करत आहेत या पुर्वी देखील नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने तालुक्यातिल सर्व दिव्यांगाचा/आपंगाचा हक्काचा निधि खर्च करून दिव्यांगाचा सर्वांगिन विकास साधावा अशी मागणी अशी मागणी गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय औंढा नागनाथ यांच्याकडे केरन्यात आली होती त्या अनुषंगाने कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी जे.एम.शाहु यांनी तालुक्यातिल सर्व ग्रांमपंचायतिंना अपंगांच्या सर्वांगिन विकासासाठी निधी खर्च करावा असे आदेश दिले होते,
परंतु तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतिंनी गटविकास अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दिली आहे,
अपंगांना हक्काचा निधी आपंगावर खर्च होत नसल्याने एन डि एम जे संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या पदाधिकार्यांनी अपंगांना सोबत घेउन मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय औंढा नागनाथ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व तात्काळ आपंगावर होनारा निधी अपंगांच्या कल्ल्यानासाठी खर्च करावा अन्यथा दिनांक १९/०३/२०२० रोजी पंचायत समिती कार्यालय औंढा नागनाथ समोर बोंबाबोंब आंदोलन करन्यात येईल असा इशारा देखिल निवेदनाद्वारे देन्यात आला आहे, सदरिल निवेदनावर नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस या सामाजिक संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके, जिल्हाध्यक्ष मोहन मदन दिपके, जिल्हानिरिक्षक अ हाफिज अ हादी, जिल्हा संघटक विजय आनंता दिपके, प्रसिद्धी प्रमुख उग्रसेन भिवसेन नवले, समाधान किसन कोकाटे, संगिता बाई सखाराम धाबे, व ईत्तर अपंग बांधवांच्या स्वक्षर्या आहेत…