आ.राम सातपुते यांच्या प्रयत्नातून सुवर्णा रणदिवे मजूर महिलेची अवघड शस्त्रक्रिया पार पडली


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रमोद शिंदे)माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून पिरळे येथील गरीब कुटुंबातील मोलमजुरी करणाऱ्या महिलेची अवघड शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.याबाबत हकीकत आशिकी पिरळे ता माळशिरस येथील मोल मजुरी करणारी सुवर्णा बिट्टू रणदिवे या महिलेला अनेक दिवसांपासून शारीरिक त्रास होत होता.त्या फलटण,बारामती,पुणे येथील दवाखान्यामध्ये उपचारासाठी गेल्या होत्या.परंतु त्या ठिकाणी अवघड शस्त्रक्रिया असल्याने उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी नकार दिला शस्त्रक्रियासाठी डॉक्टरांनी अडीच लाख रुपये खर्च सांगितला होता. घरची परिस्थिती नसल्याने मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करू शकत नव्हती म्हणून माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांच्या जनता दरबारामध्ये सुवर्णा रणदिवे व त्यांचा भाऊ अनिल खिलारे यांनी आमदार राम सातपुते यांची भेट घेतली व घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला.आमदार सातपुते यांनी तात्काळ त्यांची दखल घेत त्यांना उपचारासाठी दवाखान्यामध्ये पाठवले व डॉक्टरांना फोनवरून पेशंटची काळजी घेण्यास सांगितले आमदार राम सातपुते यांच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी ही अवघड शस्त्रक्रिया मोफत पार पाडली व सुवर्णा रणदिवे या पेशंटला जीवदान दिले.पेशंट व त्यांच्या कुटुंब तसेच पिरळे ग्रामस्थांकडून आमदार राम सातपुते यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.यासाठी ऍड तुकाराम शेंडगे,महेश इटकर,नानासो कोथमीरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

You may have missed