Uncategorized

खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी नातेपुते स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे – माळशिरस तालुक्यातील शेती पंपाचा बंद केलेला विद्युत पुरवठा परत चालू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे. जिल्हाध्यक्ष भीमराव फुले यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने नातेपुते येथे रास्ता रोको व महावितरण कार्यालयास घेराव आंदोलन करण्यात आले.
मागील आठ ते दहा दिवसापासून माळशिरस तालुक्यातील शेती पंपाचा विद्युत पुरवठा पूर्वसूचना न देता विज बिल वसुलीसाठी खंडित करण्यात आला. तो वीजपुरवठा त्वरित चालू करण्यासाठी व शेतकऱ्यांचे एचपी प्रमाणे नोंद करून वाढीव बिल दुरुस्त करून, बिल आकारण्यात यावे या मागणीसाठी मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन नातेपुते येथील अण्णाभाऊ साठे चौक येथे करण्यात आले.आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अमरसिंह कदम,भीमराव,फुले हरिदास थिटे,दत्ता भोसले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच उपकार्यकारी अभियंता किरण डोईफोडे यांनी तात्काळ तोडलेला विद्युत पुरवठा जोडून देऊन शेतकऱ्यांना सर्वे करून कमी एचपी प्रमाणे बिले दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी विनंती केले आहे. तसेच हे आंदोलन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मध्यस्थीने माघार घेण्यात आले. या आंदोलनास महादेव सावंत ,नारायण सावंत प्रशांत पवार अरुण ढगे मानसिंग पाटील,अंकुश बनकर,मुरलीधर सावंत, तुकाराम किर्दक कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष भीमराव फुले मनोगत व्यक्त करताना
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अमरसिंह कदम उपस्थितांना मार्गदर्शन करताना
दत्ता भोसले मनोगत व्यक्त करताना

महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी कार्यकारी उपअभियंता किरण डोईफोडे व दत्ता रुपनवर पुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना आश्वासन देताना

नातेपुते येथील महावितरणच्या कार्यालयास शेतकऱ्यांचा घेराव

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची राज्यपालांकडे सरकार बरखास्त करण्याची मागणी

राज्यपाल कोषारी यांना निवेदन देताना एडवोकेट प्रकाश आंबेडकर


  पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

राज्यपालांच्या भेटीत सरकार बरखास्त करण्याची मागणी  – ॲड. प्रकाश आंबेडकर.
  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी राज्यपालांची भेट घेत हे सरकार चोरांचे, खुन्यांचे असून ते बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ह्यांनी राज्यपालांची भेट घेऊन केली आहे. तसेच त्यांनी राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी निवेदन दिले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की पोलीस अधिकारी सांगत आहेत की राजकीय व्यवस्थेने आम्हाला वसुलीचे आदेश दिले आहेत त्याचे पत्र सुद्धा प्रसिद्ध केले आहे.शंभर कोटीच्या प्रकरणात एक मंत्री असू शकत नाही हा निर्णय एका मंत्र्याचा की पार्टी स्तरावर झाला आहे. याचा शोध घेतला पाहिजे आणि हे सर्व पुढे आणायचे असेल तर राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे. तसेच मनसुख हिरेन ,सुशांत सिंह,पूजा चव्हाण यांना सुसाईड  दाखवण्यात आले आहे हे सुसाईड आहे त का? मर्डरत आहेत? हे लोकांमध्ये शंका आहे.अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या सोबत पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आ.धनराज वंजारी  तसेच महिला आघाडीच्या अध्यक्ष मा.रेखाताई ठाकूर ह्या उपस्थित होत्या.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची राज्यपालांकडे सरकार बरखास्त करण्याची मागणी 

माळशिरस येथे वीज कनेक्शन कट करण्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने रास्ता रोको

निवेदन देताना भाजप आमदार राम सातपुते व भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील,बाळासाहेब सरगर, बाजीराव काटकर व कार्यकर्ते
आंदोलनात मनोगत व्यक्त करताना आमदार राम सातपुते
मोर्चादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर

माळशिरस येथे वीज कनेक्शन  कट  करण्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने रास्ता रोको 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे– माळशिरस येथील अहिल्या देवी चौक येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने वीज कनेक्शन कट करण्याच्या निषेधार्थ व गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.या यावेळी माळशिरस चे आमदार राम सातपुते भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, ओबीसी मोर्चा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.आमदार राम सातपुते बोलताना म्हणाले की हे सरकार लाईट बिलाच्या नावाखाली  जनतेची लूट करत आहे तात्काळ शेतकऱ्यांची पिळवणूक  थांबवा तसेच धैर्यशील मोहिते पाटील बोलताना म्हणाले की कोरोना  व नैसर्गिक संकटामुळे कोलमडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी सक्तीची विजवल वीज बिल वसुली तात्काळ थांबवा तोडलेले कनेक्शन तात्काळ चालू करावी, तसेच गृहमंत्री अनिल देशमुख त्यांच्यावर असलेला शंभर कोटी रुपये वसुली च्या आरोपाचा निपक्षपाती तपास होण्यासाठी अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा.अन्यथा त्यांची हकालपट्टी करण्यात यावी.अशाप्रकारे त्यांनी आंदोलनात मागणी केली. हे आंदोलन  विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील व आमदार राम सातपुते तसेच धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष सोपान काका नारनवर, के.के पाटील तालुकाअध्यक्ष बाजीराव काटकर, रचिटणीस संजय देशमुख, अतुल सरतापे, मारुती वाघमोडे दादासाहेब खरात दामोदर पालवे हनुमंत दुधाळ सर, शहराध्यक्ष संतोष वाघमोडे, शहर उपाध्यक्ष राजेन्द्र वळकुंदे,सुनील बनकर व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

एन.डी.एम.जे ने दिल्ली में दलित मानवाधिकार कार्यकर्ताओं के लिए चार दिवसीय अंतर्राष्ट्रीय कार्यशालाका आयोजन किया


  पुरोगामी महाराष्ट्र न्यूज़ नेटवर्क दिल्ली– नेशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिस ने दलित और आदिवासी बच्चों के अधिकारों और सुरक्षा पर चार दिवसीय अंतर्राष्ट्रीय कार्यशाला का आयोजन किया और भारतीय सामाजिक संस्थान, नई दिल्ली में न्याय के लिए राष्ट्रीय दलित आंदोलन की ओर से सोशल मीडिया का उपयोग कैसे किया जाए? 17 से 20 मार्च 2021। देश के विभिन्न राज्यों के कार्यकर्ता अपने-अपने राज्यों का प्रतिनिधित्व करने के लिए उपस्थित थे। उनमें से राज्य महासचिव एडवोकेट डॉक्टर केवलजी उके, सचिव वैभवजी गीते, सहाय्य सचिव पीएस खंदारे, महिला राज्य संगठक पंचशीला ताई कुंभकार, अहमदनगर जिला अध्यक्ष प्रेरणा ढेंडे शामिल थे। महाराष्ट्र का प्रतिनिधित्व किया। महाराष्ट्र में दलितों पर अत्याचार की गंभीर घटनाओं पर भी चर्चा हुई। कार्यशाला में महिलाओं की उपस्थिति महत्वपूर्ण थी।
  बच्चों की देखभाल कैसे करें, ये बच्चे हमारे देश का भविष्य हैं, इसलिए हमें उन पर विशेष ध्यान देने की आवश्यकता है। लेकिन वर्तमान में, बच्चों के यौन शोषण की दर में वृद्धि हुई है, इसलिए सभी को बच्चों पर विशेष ध्यान देना चाहिए और देना चाहिए उन्हें अच्छे स्पर्श, बुरे स्पर्श के बारे में ज्ञान है।  उनमें नेतृत्व की गुणवत्ता विकसित की जानी चाहिए। इस पर कार्यशाला में मार्गदर्शन दिया गया। इसके अलावा, दलित मानवाधिकार कार्यकर्ताओं ने सोशल मीडिया का इस्तेमाल किया।
  कार्यक्रम का समन्वयन डॉ। वीए रमेश नाथन, अधिवक्ता राहुल सिंह, जूडिथ ऐनी, देबजानी साहू, सलाहकार नवीन गौतम ने किया।

एन डी एम जे ने दिल्ली में दलित मानवाधिकार कार्यकर्ताओं के लिए चार दिवसीय अंतर्राष्ट्रीय कार्यशालाका आयोजन किया था उसी दरम्‍यान राष्ट्रीय महासचिव श्री रमेश नाथनजी और समन्वयक एडवोकेट राहुल सिंग महाराष्ट्र के महासचिव अडवोकेट डॉक्टर केवलजी उके सचिव वैभव जी गीते और अन्य कार्यकर्ता

दिल्ली येथे एन डी एम जे यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय चार दिवसीय दलित मानवाधिकार कार्यकर्त्यांची कार्यशाळा संपन्न

दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत दरम्यान राष्ट्रीय सचिव श्री रमेश नाथन समन्वयक एडवोकेट राहुल सिंग यांच्यासमवेत महाराष्ट्र सचिव केवलजी उसके वैभवजी गिते सहसचिव पी एस खंदारे पंचशीला ताई कुंभारकर प्रेरणा धेंडे व इतर राज्यातील कार्यकर्ते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क दिल्लीदिनांक १७ ते २० मार्च २०२१ रोजी न्यु दिल्ली येथील इंडियन सोशल इन्स्टिट्यूट येथे नॅशनल दलीत मूव्हमेंट फॉर जस्टिस च्यां वतीने दलीत मानवाधिकार कार्यकत्यांची  चार दिवसीय दलीत व आदिवासी मुलांचे हक्क व संरक्षण आणि सोशल मीडिया चा वापर कसा करायचा याविषयी आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.त्यामध्ये देशातील विविध राज्यातील कार्यकर्ते आपापल्या राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपस्थित झाले होते.त्यामध्ये महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्याचे महासचिव ॲड.डॉ. केवल जी उके,सचिव वैभव जी गीते,सहसचिव पी.एस.खंदारे,महिला राज्य संघटक पंचशीला ताई कुंभारकर,अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रेरणा धेंडे यांनी महाराष्ट्र च्या वतीने प्रतिनिधित्व केले.तसेच महाराष्टातील घडलेल्या दलीत अत्याचाराच्या गंभीर घटनावर देखील चर्चा झाली.कार्यशाळेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.लहान मुलांचे संगोपन कसे करायचे,हीच मुले उद्याच्या आपल्या देशाचे भविष्य असल्याने त्यांच्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.परंतु सद्यस्थितीत लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी सर्वांनी लहान मुलांवर विशेष लक्ष द्यायला हवे त्यांना गूड टच, बड टच याविषयी चे ज्ञान द्यायला हवे.त्यांच्या मध्ये लीडर शिप क्वालिटी विकसित करायला हवी.याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.तसेच दलीत मानवाधिकार कार्यकत्यांनी सोशल मीडिया चा वापर कसा करायला हवा याविषयी देखील मार्गदर्शन करण्यात आले   कार्यक्रमाचे संयोजन डॉ.व्ही.ए.रमेश नाथन, ॲड.राहुल सिंह, जुडिथ ॲने, देबजनी साहू, ॲड नवीन गौतम यांनी केले.

महाड मुक्तीसानंग्राम 20 मार्च दिन देशाची राजधानी दिल्ली येथे साजरा

महाड मुक्तीसानंग्राम दिन देशाच्या राजधानीत साजरा करताना एन डी एम जे ची टीम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस च्या वतीने अभिवादन
महाड क्रांती दिनानिमित्त मार्गदर्शन करताना एडवोकेट डॉक्टर केवल उके व एन डी एम जे पदाधिकारी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नवी दिल्ली-
इंडियन सोशल इन्स्टिट्यूट लोधी रोड दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर व प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई बाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर सामूहिक अभिवादन करून महाड मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्यात आला.यावेळी एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवल उके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यामध्ये त्यांनी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथे 20 मार्च दोन हजार 1927 रोजी चवदार तळ्याच्या पाण्यासाठी महाड मुक्तिसंग्राम करून आपल्या हजारो अनुयायांच्या सोबत चवदार तळ्याच्या पाण्याला हात लावून पाणी सर्वांसाठी खुले असल्याची भावना अस्पृश्यामध्ये निर्माण केली होती.यासोबतच महाड चवदार तळ्याच्या संदर्भातील न्यायालयीन खटलेसुद्धा लढून जिंकले होते मुख्य म्हणजे या आंदोलनात बाबसाहेबांच्या सोबत अस्पृश्यांच्याबरोबरच काही सवर्ण सुद्धा होते.असे विचार नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवल उके यांनी व्यक्त केले.संघटनेचे राज्य सहसचिव पी.एस.खंदारे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची सुरुवात केली.यावेळी एन.डी.एम.जे संघटनेचे राष्ट्रीय टीम च्या जुडीत,नवीन गौतम,सुचिता,देबजानी,श्वेता गिमरे,व विविध राज्यातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ.आंबेडकरांना अपेक्षित क्रांती प्रतिक्रांती आणि देशातील परिस्थिती 20 मार्च महाड सत्याग्रहाच्या निमित्ताने… लेखक डॉ. कुमार लोंढे

लेखक डॉ. कुमार लोंढे
संपादक जनविद्रोही
मो.9881643650

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-वही कौम तरक्की करती है जिस कौम में क़ुरबानी देने और लेने की जज्स्बा और क्षमता होती है|………………….
बाबा साहेब डॉ भीम राव अम्बेडकर

 
युरेशियन ब्राह्मणांनी देशावर आक्रमण करून भारतातील मानवतावादी व बुद्धाच्या भारताला विषमतावादी,कर्मकांड आणि धार्मिकतेच्या उन्मादाने क्रांती व प्रतिक्रांतीच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे.

देशाला आज क्रांतीची गरज आहे परंतु भारत प्रति क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे महागाई, बेरोजगारी ,भ्रष्टाचार ,जातीयता, दलित अत्याचार, राष्ट्रीयीकृत बँकांचे होणारे खाजगीकरण, शैक्षणिक क्षेत्रातील अवास्तव व बेजबाबदार असे धोरण,आरोग्य क्षेत्राला काळिमा फासणारे कलुषित निर्णय,अर्थसंकल्पात केलेली आरोग्य, शिक्षण ,रोजगार व मूलभूत सुविधा यावरती केलेली अल्पशी तरतूद ,शेतकरी धोरण, कारखानदार व परराष्ट्र धोरण या सर्व बाबतीमध्ये भारत आज प्रतिकार क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

 केंद्रात मोदी सरकार आहे म्हणजेच भाजपा पुरस्कृत सरकार आहे राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांचं त्रिकूट सरकार आहे तसं  पाहायला गेलं तर भाजपा केंद्रामध्ये सत्ता आरूढ आहे आणि देशांमध्ये आरएसएसचा जो धर्म आणि हिंदू राष्ट्र याचा जो धर्माचा उन्माद चालू आहे व इतर जातींना अल्पसंख्यांकांना बहुजनांना ओबीसींना त्यांचे हक्क-अधिकार यापासून धावणारे धोरण भाजप राजरोसपणे राबवत आहे हे सर्व काँग्रेसची देणआहे आपल्याला आठवत असेल आरएसएस चा जन्म काही आज झालेलं नाहीये स्वातंत्र्याच्या पूर्वी सुद्धा हेगडेवार गोळवलकर यांची RSS होती व आज ही आहे एवढ्या दिवसांमध्ये देश विघातक कारवाया शस्त्रास्त्र व नागपूर येथे अगदी राजरोसपणे शस्त्रपूजन होत असताना आमचे देशाचे पंतप्रधान राष्ट्रपती किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही सरकारने त्यांना अटकाव केला नाही.पाठी मागील वेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतली शस्त्र पूजनाच्या संदर्भामध्ये ती खरंच कौतुकास्पद व संविधानिक आहे. 
आज क्रांती करायची तर कशी करायची? कोणाच्या विरोधात करायची? आणि का करायची? हे जर आम्हाला समजत नसेल तर त्या क्रांतीला काही महत्त्व नाही.  खरच देश क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे परंतु आम्ही सर्व आमच्या भावना आकांक्षा इच्छा व मूलभूत स्वातंत्र्याला अधिकार,घटनादत्त अधिकार गाठोडे मध्ये बांधून उशा खाली घेऊन झोपलो आहे अशी असणारी परिस्थिती आहे. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी पुकारलेला जगातील एकमेव असा सत्याग्रह आहे जो माणसाला माणूसपण देणारा माणसांच्या हक्का करता, अधिकारा करता, आणि वर्णव्यवस्था वादि प्रतिक्रांतीला आव्हान देऊन क्रांती करणारा आहे.  म्हणून 20 मार्च हा भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासातील मानवाच्या मूलभूत आणि संविधानिक आधारित अधिकाराचा हा विजय आहे. बांधवांनो आज 20 मार्च आपण ही क्रांती आणि प्रतिक्रांती दोन शब्दातील महत्त्व समजून आपण क्रांती करणं गरजेच आहे का शांत बसणं गरजेचं आहे हे आपण आत्मसात करणं हेच खरं आजच्या दिवशी महत्त्वाच आहे.
भारतामध्ये गांधीवाद आंबेडकर वाद आणि मनुवाद तीन वाद आहेत.  देशाला जर पुढे न्यायचे असेल तर केवळ आणि केवळ आंबेडकर वाद तारू शकतो परंतु याही पुढे जाऊन आंबेडकर वाद आणि गांधीवाद हातात हात घालून काम करू लागले तर या देशातील मनुवाद मुळासकट उखडून फेकण्याची ताकद आंबेडकरी जनतेमध्ये आहे.फक्त काँग्रेस ने प्रतिगामी की पुरोगामी हे एकदाचे ठरवावे व मनुवादाची झालर व वर्णव्यवस्थेची कवच कुंडले फेकून sc,st,obc व minorities समूहाच्या क्रांतीच्या आशा पल्लवित कराव्यात अन्यथा भाजपा व काँग्रेस एकमेकाहून वेगळी असेल असे म्हणता येणार नाही.देशात नवपर्याय शोधून देशात क्रांतीचा तिसरा पर्याय उभा करणे अशक्य प्राय असे नाही.शेतकरी ,कष्टकरी, अस्पृश्य व बहुजन बांधवांना आंबेडकरवाद हाच सक्षम व संविधानिक समतावादी क्रांतीचा विचार ठरू शकतो.हे क्रांतीदिनी अधोरेखित होताना दिसत आहे

👇 याचा एक मात्र उपाय

शूद्र ( obc ), अतिशूद्र ( sc/st )
जाति तोड़ो समाज जोड़ो…!

बहुजन समाज बनाओ
अल्पसंख्याक को मिलाओ…!!

अपनी ताकत दिखाओ
मनुवाद से मुक्ति पाओ…!!!

धन, धरती और साधन बांटो
बाद में आरक्षण बांटो
…!

जिसकी जितनी संख्या भारी
उतनी उसकी हिस्सेदारी…!!

डॉ.आंबेडकरांना अपेक्षित क्रांती प्रतिक्रांती आणि देशातील परिस्थिती 20 मार्च महाड सत्याग्रहाच्या निमित्ताने… लेखक डॉक्टर कुमार लोंढे

kumarlondhe

drkumarlondhe

शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन करणार रासप माळशिरस तालुका

वीज बोर्ड नातेपुते अधिकारी यांना निवेदन देताना रासप पदाधीकारी व तालुकाध्यक्ष माऊली सरकार , कार्यकर्ते
अधिकार्‍याची चर्चा करताना रासप नेते नितीन दादा धायगुडे सचिन सूळ, बशीर भाई काजी, शाहिद भाई मुलांनी व पदाधिकारी

 

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास राष्ट्रीय समाज पक्ष माळशिरस तालुका व नातेपुते शहराच्या वतीने  आंदोलन करणार असल्याचे वीज बोर्ड नातेपुते यांना निवेदन देऊन इशारा  देण्यात आला. यासंदर्भात कार्यकारी उप अभियंता यांना रासप पदाधिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.नातेपुते व परिसर शेतकऱ्यांचे विज पंप कनेक्शन मोठ्या प्रमाणात तोडण्यात आले आहेत.यावर राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक होऊन त्यांनी शेतकऱ्यांसाठी वीज बोर्डाकडे धाव घेतली आहे.पदाधिकारी बोलताना म्हणाले की शेतकरीच्या हाता तोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्याचे काम हे सरकार करीत आहे, शेतात उभी असलेली पीके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत,उभ्या पीकावर नागर फिरवण्याचे काम सरकार कडून केले जात आहे  मागील 4,5 दिवसा पासून विज कनेक्शन तोडण्याचे पाप हे सरकार करत आहेत अशा प्रकारचा सरकारचा निषेध करत टीका ही पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आली .त्या संदर्भात  राष्ट्रीय समाज पक्ष माळशिरस तालुका व नातेपुते शहरच्या वतीने निवेदन देण्यात आले.लवकरात लवकर तोडलेली वीज कनेक्शन जोडावेत अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माळशिरस तालुका अध्यक्ष माऊली सरक यांनी दिला या वेळी रासपचे नितीन दादा धायगुडे, बशीर काझी ,शाहिद मुलाणी,रणजित सूळ,माऊली सरक, कविता माने, रियाज आतार,अण्णासाहेब पांढरे, सहदेव गोफणे, अमरजीत जानकर,बाबा बोडरे, वलेकर सर,बापूराव जानकर,नामदेव टकले, मेटकरी,सागर राऊत,चंद्रकांत काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

१७ वर्षांन पासून फरारी आरोपीस गुन्हे शाखा- १, काशिमिरा कडून अटक

१७ वर्षांन पासून फरारी आरोपीस गुन्हे शाखा- १, काशिमिरा कडून अटक

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वसई

मा. पोलीस आयुक्त वसई विरार,मिराभाईदर सदानंद दाते (भपोसे) यांनी दिलेल्या फरारी आरोपींच्या शोध मोहिमे अंतर्गत एका १७ वर्षांन पूर्वी धाडसी दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपीस गुन्हेशाखा १ ने नुकतीच अटक केली आहे.

दिनांक ५ फेब्रुवारी २००४ रोजी रात्री भारती ज्वेलर्स शांती नगर, मिरारोड पूर्व या दुकानाच्या वॉचमनला चाकू व रिव्हाल्वरचा धाक दाखवून शटरचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २९ लाख ६३ हजाराचा मुद्देमाल लुटून चोरट्याने पोबारा केला होता. या बाबत मिरा रोड पोलीस ठाणे येथे भादंवि कलम ३९२, ४१२ व शस्त्र कायदा ३/२५ नुसार गुन्हा नोंद क्रमांक ४५/२००४ द्वारे नोंद करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीचां शोध गुन्हेशाखा- १ चे पोलीस करीत होते.

या प्रकरणातील मुख्य आरोपी भुशीसिंग ऊर्फ दिपकसिंग टाक (३६) हा असून तो भिवंडी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांनी प्राप्त केली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून टाक यास अटक केली आहे. सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याचा विरुद्ध दरोडा, जबरीचोरी, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त एस. जयकुमार, पोलीस उपायुक्त(गुन्हे) डॉ. महेश पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक.अविराज कुराडे, विलास कुंटे, पोउपनि. हितेद्र विचारे, सपोउपनि.राजू तांबे, पोहवा.किशोर वंडिले, पो ना.सचिन सावंत, पोशि.राजेश श्रीवास्तव, सुशील पवार, या गुन्हे प्रगटीकरण शाखा-१ यांनी केली आहे.

नातेपुते येथे विना मास्क फिरणारास होणार ५०० रुपयांचा दंड

नातेपुते येथे विना मास्क फिरणारास होणार ५०० रुपयांचा दंड
प्रमोद शिंदे- नातेपुते –
नातेपुते आणि परिसरात विना मास्क फिरनारास पाचशे रुपयाचा दंड केला जाणार असल्याचा एक मताने ठराव करण्यात आला आहे. ही कार्यवाही बुधवार दिनांक 17 मार्च रोजी पासून सुरू करण्यात येणार असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.या संदर्भात व्यापारी व नागरिक यांची कोरोना प्रतिबंध उपाय योजना करण्यासाठी नातेपुते पोलीस स्टेशन येथे तातडीची बैठक घेण्यात आली होती. ही बैठक कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोनवलकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत शासनाचे सर्व नियमांचे पालन करण्यासंदर्भात व्यापारी बंधूंना सूचना दिल्या गेले आहेत.सूचना व नियमांचे पालन न करणाऱ्या व्यापारी व ग्राहक यांचेवर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे यावर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून शासनास सहकार्य करण्याची भूमिका व्यापारी बंधूंकडून व्यक्त करण्यात आली आहे. या बैठकीत कोरोना रोखण्यासाठी उपाय योजना म्हणून डॉक्टर एम.पी.मोरे,रिपाईचे ज्येष्ठ नेते एन.के.साळवे,सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर,लतीफभाई नदाफ,उपसरपंच अतुल पाटील,आप्पासाहेब भांड, नरेंद्र गांधी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.यावेळी संदीप दादा ठोंबरे,डॉ.नरेंद्र कवितके,ज्येष्ठ पत्रकार सुनील दादा राऊत, श्रीकांत बाविस्कर,आनंद कुमार लोंढे,विलास भोसले,प्रमोद शिंदे,आनंद जाधव,सुनील गजाकस,प्रशांत खरात,भगत महाराज त्याच प्रमाणे नातेपुते येथील व्यापारी असोसिएशनचे नरेंद्रभाई गांधी,बाहुबलीसेठ शंकेश्वरा व मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.तसेच कोरोना च्या नावाखाली साठेबाजी करुन चढ्या दराने माल विक्री करून ग्राहकांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले आहे.

You may have missed