प्रमोद शिंदे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत मोरोची पानस्कर वस्ती विद्यार्थ्यांचा अकबर शेख सर यांच्यामुळे शंभर टक्के सहभाग


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल गेली तीन वर्ष विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे 33 कोटी वृक्ष लागवड  झाडे लावा झाडे जगवा उपक्रम 2019 मध्ये प्रभावीपणे राबवला व महाराष्ट्रात दीड लाखापेक्षा जास्त वृक्ष लागवड पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल च्या माध्यमातून करण्यात आली. यामध्ये मोरोची पानस्कर वस्तीने शंभर टक्के सहभाग नोंदवला होता तसेच माळशिरस तालुक्यातील जि प शाळा. कारंडे, पिरळे, फोंडशिरस, कळंबोली, उंबरे दहिगाव,मार्कडवाडी,पळसमंडळ,एक्शिव शिवपुरी, धर्मपुरी, हायस्कूलमध्ये दहिगाव स्कूल दहेगाव, बा. ज .दाते प्रशाला, चंद्रकांत घुगरदरे रत्नत्रय इंग्लिश मीडियम मांडवे ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची, रामदास हायस्कूल इंदापूर, राधिका हायस्कूल इंदापूर, तसेच ठाणे,कल्याण,वाशिम,हिंगोली, सातारा कोल्हापूर,पुणे उस्मानाबाद,लातूर, बीड. सांगली ,जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. तसेच या वर्षी कोरणा प्रादुर्भावामुळे शाळेमध्ये उपक्रम घेता आला नाही म्हणून ऑनलाइन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल याहीवर्षी दिनांक 20/9/2020/ ते 5/9/2020 झाडे लावा झाडे जगवा स्वच्छता व जनशक्ती अभियानांतर्गत ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत याहीवर्षी पानस्कर वस्ती चे शिक्षक अकबर शेख सर यांनी स्वतः सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश फी भरून रजिस्ट्रेशन केले आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत शंभर टक्के सहभाग नोंदवला गेला आहे म्हणून  परिसरात  अकबर शेख सर  यांचे  आदर्श शिक्षक म्हणून कौतुक होत आहे. तसेच पंचक्रोशीतील अनेक शाळेतील शिक्षकांनी स्वतः पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन केले आहे.

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत मोरोची पानस्कर वस्ती विद्यार्थ्यांचा अकबर शेख सर यांच्यामुळे शंभर टक्के सहभाग*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत मोरोची पानस्कर वस्ती विद्यार्थ्यांचा अकबर शेख सर यांच्यामुळे शंभर टक्के सहभाग*
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल गेली तीन वर्ष विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे 33 कोटी वृक्ष लागवड  झाडे लावा झाडे जगवा उपक्रम 2019 मध्ये प्रभावीपणे राबवला व महाराष्ट्रात दीड लाखापेक्षा जास्त वृक्ष लागवड पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल च्या माध्यमातून करण्यात आली. यामध्ये मोरोची पानस्कर वस्तीने शंभर टक्के सहभाग नोंदवला होता तसेच माळशिरस तालुक्यातील जि प शाळा.कारंडे, पिरळे, फोंडशिरस, उंबरे दहिगाव,मार्कडवाडी,पळसमंडळ,एक्शिव शिवपुरी, धर्मपुरी, कळंबोली, हायस्कूलमध्ये दहिगाव स्कूल दहेगाव, बा.ज .दाते प्रशाला, चंद्रकांत घुगरदरे प्रशाला, ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोराची, रत्नत्रय इंग्लिश मीडियम मांडवे, इंदापूर येथील सर्व जिल्हा परिषद शाळा, निमसाखर येथील एन ई एम ए हायस्कूल, नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर, राधिका हायस्कूल इंदापूर, तसेच ठाणे,कल्याण,वाशिम,हिंगोली,सातारा कोल्हापूर,पुणे उस्मानाबाद,लातूर, बीड. सांगली ,जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. तसेच या वर्षी कोरणा प्रादुर्भावामुळे शाळेमध्ये उपक्रम घेता आला नाही म्हणून ऑनलाइन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल याहीवर्षी दिनांक 20/9/2020/ ते 5/9/2020 झाडे लावा झाडे जगवा स्वच्छता व जनशक्ती अभियानांतर्गत ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत याहीवर्षी पानस्कर वस्ती चे शिक्षक अकबर शेख सर यांनी स्वतः सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश फी भरून रजिस्ट्रेशन केले आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत शंभर टक्के सहभाग नोंदवला गेला आहे म्हणून  परिसरात  अकबर शेख सर  यांचे  आदर्श शिक्षक म्हणून कौतुक होत आहे. तसेच पंचक्रोशीतील अनेक शाळेतील शिक्षकांनी स्वतः पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन केले आहे.

मेरे येथे पोलीस पाटील यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क( प्रमोद शिंदे )मेरे तालुका माळशिरस  येथे वाढत्या कोरोना  प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस  आरोग्य संख्येमध्ये वाढ होत आहे  व  त्या रुग्णांना रक्त साठ्यांचा तुटवडा भासत असल्याने शासन वेळोवेळी नागरिकांना रक्तदान शिबिर करण्याचे आव्हान करत आहे याच आवाहनाला प्रतिसाद देत मेरे गावचे पोलीस पाटील शहाजी गेजगे व ग्रामस्थांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शहात्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान घेण्यासाठी  सोलापूर येथील अक्षय ब्लड बँक यांनी सहकार्य केले. हे शिबिर प्रशासनाच्या सर्व  नियमांचे पालन करून  पार पडले, शिबिरास मेरे गावातील लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला  शिबिराचे आयोजन पोलीस-पाटील शहाजी गेजगे यांनी केले. यावेळी,अक्षय ब्लड बँकेचे  डॉ.मोरे  माळशिरस येथील डॉ.वाघमोडे  तसेच येळीव गावचे पोलीस पाटील  राजकुमार वाघमोडे  गावातील, युवक कार्यकर्ते  व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेरे येथे पोलीस पाटील शहाजी गेजगे  यांच्या पुढाकाराने  रक्तदान शिबिराचे आयोजन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस येथे ओबीसी मोर्चा च्या वतीने कोरोना पुरस्कार व वृक्षारोपण संपन्न

कार्यक्रमाचे उद्घाटन करताना आमदार राम सातपुते व भाजपा जिल्हा नेते धैर्यशील भैया मोहिते पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर तसेच पदाधिकारी
  • पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीनाथ विद्यालय माळशिरस व ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कोवीड सन्मान-पुरस्कार वृक्षारोपण,आधी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माळशिरस विधानसभा आमदार राम सातपुते यांच्या करण्यात  आले. तसेच  या कार्यक्रमस प्रमुख उपस्थिती सोलापूर जिल्ह्याचे भाजपा नेते धैर्यशील भैया मोहिते-पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर ,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, संजय देशमुख,नगरसेवक अशोक देशमुख, संचालक महादेव माने, गौरव गांधी,आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच माळशिरस तालुक्यात कोरोना काळामध्ये पोलिस- पाटील,आशा वर्कर,पत्रकार यांनी  उल्लेखनीय काम केल्याबद्दल  त्यांचाही  सन्मान ओबीसी मोर्चा वतीने करण्यात आला. या कार्यक्रमात धैर्यशील भैया मोहिते-पाटील व बाळासाहेब सरगर यांनी मार्गदर्शन केले.
भाजपा जिल्ह्याचे नेते धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांचा सत्कार करताना जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर
पुरस्कार देताना आमदार राम सातपुते धैर्यशील भैया मोहिते पाटील बाळासाहेब सरगर आप्पासाहेब देशमुख व मान्यवर

कांदा निर्यातीवरील बंदी तात्काळ थांबवावी- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

कांदा निर्यातीवरील बंदी  तात्काळ थांबवावी- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस  

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)कांद्याच्या वाढत्या दरामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणण्याचा निर्णय घेतल्यामुळे अजून पावसाळी कांदा शेतकऱ्यांचा  बाजारात आलेला नाही तोवरच कांदा निर्यातीवर बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून सध्या कांद्याला मिळणारा चांगला दर थांबला आहे. केंद्र शासनाने भारतात कांद्याचे दर वाढत असल्याने तसेच भविष्यात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे.परंतु या कांदा निर्यात बंदी मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.यावर विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीकांदा निर्यात बंदीच्या पार्श्वभूमीवर त्या निर्णयास विरोध करून केंद्रीय व्यापार वाणिज्य मंत्री श्री पियुष गोयल यांना तात्काळ संपर्क साधत व पत्रव्यवहार करून कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी  दिनांक 15 सप्टेंबर रोजी पत्राद्वारे केली आहे. या पत्रातील मागणीमुळे कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

https://www.shakkyalegal.com/

https://www.shakkyalegal.com/

कोरोना संदर्भात नागरिकांनी गाफील न राहता सतर्क रहावे- सामाजिक कार्यकर्ते वैभव शहा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)- covid-19 कोरोना संदर्भात नातेपुते व परिसरातील लोकांनी गाफील न राहता सतर्क राहावे असे आव्हान रत्नत्रय इंग्लिश मीडियम व ज्युनियर कॉलेज संचालक, महावीर इलेक्ट्रिक चे मालक, सामाजिक कार्यकर्ते वैभव शहा यांनी केले आहे.कारण नातेपुते आणि परिसरात कोरणा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत आहे नातेपुते ही मोठी बाजारपेठ असल्यामुळे नातेपुते आणि परिसरात लोकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते एकमेकांचा संपर्कही मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव पसरण्यासाठी वेळ लागणार नाही. तसेच नातेपुते आणि परिसरात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे तसेच मृत्यूची संख्या ही वाढत आहे.त्यामुळे नातेपुते बाजारपेठेत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांनी फिजिकल डिस्टंसिंग, मास्क, सँनीटायझर वापर हा नियमित करावा नाही तर येणारा काळ हा अतिशय भयंकर असेल. प्रत्येक घरांमध्ये कोविंड रुग्ण सापडू शकतो. सध्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन बेड शिल्लक नाही ऑक्सीजन बेड मिळत नसल्याने रुग्ण दगावण्याची संख्याही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनीच काळजी स्वतः घ्यायला हवी तसेच नातेपुते येथे शासकीय ऑक्सीजन बेड सह कोविड सेंटर लवकरात लवकर उभारण्यात यावे अशी मागणीदेखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते वैभव शहा नातेपुते

साखर संचालका सोबत लवकरात लवकर बैठक लावून संबंधित शेतकर्याच्या खात्यावर्तत उसाचे बिल जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन करू -धर्मराज पुजारी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापुर –साखर संचालका सोबत लवकरात लवकर बैठक लावून संबंधित शेतकर्याच्या खात्यावर्ती उसाचे बिल जमा करा अन्यथा या वेळी रस्त्यावर उतरू.जनहित शेतकरी संघटना दक्षिण सोलापूर उपाध्यक्ष धर्मराज पुजारी यानी दिली आहे.
2019 मधील गळीत हंगामातील गळीत जालेल्या उसाची 27 डिसेंबर नंतर गाळप जालेल्या ऊस धारक शेतकरी लोकांची बिले गोकुळ साखर कारखाना थकवली आहे. यामुळे महारास्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या उपस्तीत 7 सप्टेंबरला बेमुदत अंदोलन करण्यात आले होते.
पण जिल्हाधिकारी साहेब साहेबांच्या मद्यस्तीने 14 तारखेला साखर कारखाना संचालका बैठक लावण्यात येणार मंटल्यावर ही अंदोलन मागे घेण्यात आली होती.
14 तारखेला जिल्हाधिकारी साहेबांच कोरोना आढावा मुळे मुख्यमंत्री साहेबा बरोबर वीडियो कॉन्फरन्स होते माणून ही बैठक रद्द झाली करण्यात आली आहे.
पन सरकारी कामत अडथळा नको म्हणून जनहित शेतकरी संघटना गप्प आहे .
जिल्हाधिकारी साहेबनी शेतकर्याची परस्थिती लक्षात घेवून लवकरात लवकर बैठक लावुन संबंधित शेतकरयाच्या खात्यावर 2600 रुपयने त्वरित बिल जमा व्हावे अन्यथा जनहित शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन कारणार आहे.प्रसंगी साखर आयुक्तांच्या कार्यालयात घुसून जाब विचारु

जनहित शेतकरी संघटनेचे नेते धर्मराज पुजारी

पालक मंत्री दत्ता मामा भरणे यांना लाडका भाचा सुरज वनसाळे यांचे सोशल मीडियाद्वारे पत्र

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
प्रिय दत्तामामा भरणे
सविनय जयभीम
पुन्हा काही दिवसांसाठी वाढत्या कोरोनाचे कारण देत आपल्या प्रशासनाने तालुका लाॅकडाऊन केला.
मामा,
या लाडक्या भाच्याची विनंती आहे की,
१) काही महिलांना(तालुक्यातील आपल्या काही बहीनींना) शेतात कामाला जावे लागते. कारण नवरा कामाला जाताना पोलीस कार्यवाही ला सामोरे जावे लागते.प्रसंगी मारही खावा लागतो किंवा आर्थिक झळही सोसावी लागते. लहान लहान मुले, लग्नाला आलेली मुलगी,अचानक उद्भवणारा दवाखाना ,शेती महामंडळाच्या पडक्या घरांची डागडुजी यासाठी फक्त २०० रुपये मध्ये रोजंदारीवर कामाला जावे लागते आहे. तुमच्या लाॅकडाऊन चे त्यांना घेणे देणे नाही. कधीतरी मरायचेच आहे असे महिलांचे म्हणणे आहे. कृपया त्यांची दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३३ वाजता शेळगाव येथे गाडी अडवून पोलीसांनी पावती केली आहे मोठा भाऊ म्हणून आपण त्यांना पैसे परत करा.(उद्या पुन्हा पावती होणार आहे! वालचंदनगरला तसा दम मिळाला आहे.)
२) कोरोना वाढण्यास गोरगरीब, सामान्य कार्यकर्ते, गवंडी, मजुर, यांचा काहीच संबंध नाही. सुशिक्षित बेरोजगार यांचाही संबंध नाही त्यांची लग्न मोडत आहेत. कुठे काम नाही, त्यामुळे व्यसनाधीनता वाढत आहे….वय वाढत आहे.त्यांचा आत्महत्या करण्याचा विचार आहे. त्यांना कोरोनाने मेल्यामुळे काही फरक पडणार नाही असे बेरोजगार मुलांचे म्हणने आहे. कृपया काम बघा, जमत नसेल तर मुलगी बघा. त्यांचे काही महिन्यांपासून आलेले नैराश्य जाईल.
काही गोष्टी अपवाद असतात. योग्य कामात आम्ही कधीच हस्तक्षेप केला नाही.काही बाबींमध्ये आम्ही दुर्लक्ष करतोच ना?…… तसेच आपल्या कार्यकर्ते यांनी गावागावात अडीचशे रुपयाचे दिलेले कीट दोन महिन्यापूर्वीच दोन दिवसात संपले. शासनाने दिलेले पाचशे रुपये कुठे गेले ते आता सांगणार नाही. पावसाने चांगलेच झोडपले आहे किरकोळ आजारांनी व त्याला आलेल्या खर्चांनी सामान्य माणूस खचून गेला आहे. त्यामुळेच राबराब राबणाऱ्या महिलांना १ रुपया महत्त्वाचा आहे.मामा आपले,शासनाचे, पोलीस यंत्रणेचे काम खुप चांगले चालले आहे. निश्चितच आपल्या प्रयत्नांना यश येवून कोरोना आटोक्यात येईल आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. तसेच मामा, काही खाजगी डाॅक्टरांनी औषधे चोरली ते खरे आहे का ? त्यांच्यावर गुन्हे दाखल केलीत का ?
असो, निश्चित या भाच्याला आपण नाखुश करणार नाही.तसेच कोरोनापासुन तब्ब्येतीची काळजी घ्या. पोलिस बांधवांना या आजारापासून तब्बेत जपण्यास सांगा. अन् तेवढे पैसे द्या. त्या सर्व १८ महिलांना आपल्या घरी फाडलेल्या पावतीचे पैसे नेण्यास पाठवु का ?
कळावे

आपला लाडका भाचा
सुरज वनसाळे
लाडका भाचा सुरज वनसाळे अध्यक्ष मी आंबेडकरवादी सामाजिक संघटना

संरक्षित वनक्षेत्र जाहीर करून राज्यशासनाने आरेमधील आदिवासी कुटुंबांचे घर आणि शेतीचे अधिकार हिसकावू नयेत यासाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आरेतील आदिवासींच्या पाठीशी

    
संरक्षित वनक्षेत्र जाहीर करून राज्यशासनाने आरेमधील आदिवासी कुटुंबांचे घर आणि शेतीचे अधिकार हिसकावू नयेत यासाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आरेतील आदिवासींच्या पाठीशी

आरे तील आदिवासींचे हक्क वाचविण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार – सुमित वजाळे

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क मुंबई( प्रमोद शिंदे) दि. 14 – आरेच्या जंगलाबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. आरेतील ६०० एकर जमीन आता वनासाठी राखीव ठेवत संरक्षित वनक्षेत्र जाहिर केले आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या ट्विटर हँडलवरून या निर्णयाबाबत माहिती दिली आहे.अरे ला संरक्षित वनक्षेत्र जाहीर करून त्यातील आदिवासी कुटुंबांचे शेती आणि निवासाचे पिढीजात अधिकार राज्यशासनाने हिसकावून घेऊ नयेत यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या झोपडपट्टी महासंघाने अभ्यास दौरा करुन राज्य शासनाला निवेदन द्यावे त्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे झोपडपट्टी महासंघाचे मुंबई अध्यक्ष सुमित वजाळे यांनी दिली आहे.

या पाश्वभूमीवर आरेमधील श्रमिक मुक्ती संघटनेने आयोजित कालच्या बैठकीत मा.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशावरून आरेमधील आदिवासी पाड्यांची पाहणी करण्यासाठी व सध्य स्थिती जाणून घेण्यासाठी अभ्यासगट तयार करण्यात आला आहे.
आरे मधील ज्या जमिनीवर आदिवाशींची घरे आहेत,जी जमीन ते शेतीसाठी कसत आहेत ती जमीन गावठाण म्हणून घोषित करावी.
आरे मधील ६०० एकर जमीन वन घोषीत करण्याबाबत घेतलेला निर्णय हा पर्यावरणासाठी योग्य आहे. मात्र आदिवासींचे हक्क अबाधित राहावेत ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे.
हा निर्णय घेण्याआधी शासनाने आदिवाशींचा विचार करणे आवश्यक आहे.आदिवासींचे हक्क अबाधित राहावेत यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले हे आदिवासींच्या पाठीशी आहेत.
आरे मधील आदिवासी कुटुंबाना बेघर होऊ देणार नाही.अशी भूमिका रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष सुमित वजाळे यांनी काल झालेल्या खांबाचा पाडा आदिवासी गावठाण येथील बैठकीत मांडला.

केंद्रीय राज्यमंत्री मा.रामदासजी आठवले अभ्यासगटाचा अहवाल पाहून या विषयी मुख्यमंत्री यांच्याशी भेटून बैठक घेतील.
खांबाचा पाडा येथे झालेल्या बैठकीत सुमितभाऊ वजाळे, अध्यक्ष रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ, मा.ऍड.क्रांती एल.सी.,इंडिया सेन्टर फॉर हुमन राईट, मा.नलिनीताई भुजड, मुंबई अध्यक्षा श्रमजिवी संघटना, मा.अशोकराव खांडवे, २७ पाडे प्रमुख, मा.रवींद्र दोडीये अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी संघटना, मा.कृष्णा पांगे, अध्यक्ष खांबाचा पाडा, मा.अंकुश भोईर अध्यक्ष श्रमिक मुक्ती संघ, मा.राजू वळवी खांबाचा पाडा प्रमुख, व रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे सरचिटणीस रतन स.अस्वारे, भीमराव कांबळे, संतोष थोरात, गुलाब गुप्ता, गौतम मोरे, विनोद सोनावणे,यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते
.

     

पिरळे येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप


पुरोगामी महाराष्ट्र न्यूूूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)पिरळे तालुका माळशिरस येथे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच लोकांची रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बम आयुर्वेदिक गोळ्यांचे ह्युमॅनिटी बुस्टर होमिओपॅथिक डोस चे पिरळे ग्रामपंचायत च्या वतीने वाटप करण्यात आले.

हा उपक्रम पिरळे ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानदेव शिंदे यांच्या कल्पनेतून तसेच 14 वा वित्त आयोग फंडाच्या व्याजाच्या पैशातून करण्यात आला हा उपक्रम राबवण्यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच आशाताई सेविका यांच्या मदतीने घरोघरी वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सरपंच ज्ञानदेव शिंदे,पत्रकार प्रमोद शिंदे,ग्रामसेवक रमेश जामदाडे,माजी सरपंच शिवाजी लवटे-पाटील महादेव शिंदे, अंगणवाडी सेविका अनिता सूर्यवंशी, लैला आत्तार, मुक्ताबाई चव्हाण, मनीषा कांबळे, मदतनीस आत्तार मॅडम, भोसले मॅडम,नफिसा आत्तार, बुधावले मॅडम,तसेच आशा ताई सेविका सुवर्णा शिंदे, मंदाकिनी माने,पुष्पा पैलवान,इत्यादी उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश खिलारे, अनिल वाघमोडे, नितीन खिलारे यांनी वाटप करण्यासाठी परिश्रम घेतले.

You may have missed