वाहतुक कौडीमुळे पालखी मार्गाचे म्हात्रे कंपनीचे काम बंद करण्याची राजकुमार हिवरकर पाटील यांची मागणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते ( प्रतिनिधी ) बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत याच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुकाप्रमुख

राजकुमार हिवरकर – पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री डॉ . तानाजी सावंत यांचेकडे निवेदन देऊन पालखी मार्गाचे म्हात्रे कंपनीचे काम बंद करण्याची मागणी केली.

सोलापूर जिल्हा सरहद ते खुडूस असे पालखी महामार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे . त्यातच साखर कारखाने सुरु झाल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे . यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून , सदरचे जे . एम . म्हात्रे कंपनीचे काम ऊस गाळप हंगाम संपेपर्यंत बंद करावे. माळशिरस तालुक्यात पाच व आजू बाजूच्या तालुका मध्ये दहा साखर कारखाने आहेत . वरील कारखान्यामुळे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे . तसेच सदाशिवनगर येथील श्री. शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना चालू झाला आहे . त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे . मुंबई , पुणे या ठिकाणावरून पंढरपूर कडे येणारे भाविक तसेच माळशिरस कोर्ट , तहसिल ऑफिस , पंचायत समिती , अकलूज मधील दवाखाने या ठिकाणी सतत जावे यावे लागते . बऱ्याच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिप्लेक्टर व रेडीयम दिसत नाही . त्यामुळे साखर कारखाने बंद होई पर्यंत जे . एम . म्हात्रे आणि कंपनीची अवजड वाहतूक बंद करावी व काम थांबवावे अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचेकडे निवेदन देऊन केली आहे .

You may have missed