प्रमोद शिंदे

होलार समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस पाठीशी घालणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी फलटन यांच्याकडून तपास काढून घ्या…..निवृत्ती रोकडे

जिल्हाधिकारी सातारा यांना एन.डी.एम.जे संघटनेचे निवेदन सादर

मुख्यमंत्र्यांच्या बांद्रा येथील मातोश्री निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सातारा प्रतिनिधी
राज्यात बौद्ध,मातंग,होलार व अनुसूचित जाती-जमातींच्यावर अन्याय अत्याचार वाढले असून शासनाची दलित विरोधी भूमिका व प्रशासनाची कचखाऊ अनास्था दिसून येत आहे.मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते मंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात येत आहेत परंतु दलित हत्या व दलित आदिवासींच्यावर सातत्याने वाढत असणारा अन्याय अत्याचार याबाबत मात्र भ्र शब्द काढायला तयार नाहीत मौजे उपळवे ता.फलटण जी.सातारा येथील अनुसूचित जातीच्या होलार समाजातील अक्षदा देविदास अहिवळे या अल्पवयीन मुलीची बेपत्ता झाल्याबाबत फलटन ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये लक्ष्मी देविदास अहिवळे यांनी दिनांक 5/10/2020 रोजी दाखल होती
दिनांक 8/10/2020 रोजी उपळवे गावापासून लांब 5 किलोमीटर अंतरावर विहिरीत मृतदेह सापडला दिनांक 11/10/2020 रोजी मयत मुलीच्या शेजारी राहणारा आंबदास किसन कवीतके या नाराधमास आरोपीस अटक करून भा.द.वि.305,506,अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1)r, 3(2)5 ही कलमे लावून मे.विशेष न्यायालयात अहवाल पाठवला आहे.
सध्या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण हे करीत आहेत.
मयत मुलीची आई लक्ष्मी देविदास अहिवळे या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करताना माझ्या मुलीची हत्या झाली आहे.असे सांगत असताना सुद्धा पोलिसांनी जाणून बुजून आत्महत्येची कलमे लावली आहेत.असा आरोप पीडित कुटुंबास भेटायला जाणाऱ्या संस्था संघटनांना व विविध पक्षांच्या नेत्यांना आणि प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले.
तात्काळ फिर्यादी लक्ष्मी देविदास अहिवळे मयताची थोरली बहीण यांचा फेर जबाब,पुरवणी जबाब,घेण्यात यावा.
निव्वळ आरोपीच्या व त्याच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून हत्येचा गुन्हा दाखल न करता आत्महत्यानुसार गुन्हा दाखल करणे हे न्यायोचित वाटत नाही.
उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्याकडून तपास काढून घेऊन इतर कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तपास देण्यात यावा.
मा.पोलीस अधीक्षक ना.ह.सं. कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबाचे म्हणणे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून अहवाल विशेष पोलिस महानिरीक्षक ना.ह.सं यांच्याकडे पाठवावा.
मा.अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय यांच्या 9/9/2020 च्या परिपत्रकानुसार आरोपी व इतर साक्षीदार लाय डिटेक्टर, पॉलिग्राफ,ब्रेन मॅपिंग,नार्को Analysis चिकित्सा करून गुन्ह्यातील सत्य परिस्थिती बाहेर काढावी.
परिस्थितीजन्य पुरावे योग्य पध्दतीने घेऊन तपासणीसाठी पाठवावे.
मे.विशेष न्यायालयात दोषारोपत्र पाठवण्यापूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक ना.ह.सं कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांच्याकडे तपासणीसाठी पाठवावे त्यांनी सांगितलेल्या त्रुटींची पूर्तता करूनच दोषारोपपत्र मे.विशेष न्यायालयात पाठवावे.
संवेदनशील खटले चालवण्याचा अनुभव असलेल्या वरिष्ठ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी
सदरचा विषय व निवेदन मा.जिल्हाधिकारी महोदयांच्या अंतर्गत होणाऱ्या आगामी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या मासिक बैठकीत ठेवून जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करावी.
अन्यथा नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस च्या वतीने मुख्यमंत्री महोदयांच्या मातोश्री या निवासस्थाना समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याची माहिती सातारा जिल्हाध्यक्ष निवृत्ती तात्या रोकडे यांनी दिली आहे.वरील मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सातारा व साहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी सातारा यांना नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस यांच्या वतीने देण्यात आले आहे निवेदनावर एन.डी.एम.जे राज्य सचिव वैभव तानाजी गिते,जिल्हाध्यक्ष निवृत्ती तात्या रोकडे,विधी सल्लागार ऍड. हौसेराव धुमाळ ऍड.दयानंद माने यांच्या सह्या आहेत.

प्रगतीचा निधी वळवला जात असल्याने हिवाळी अधिवेशनात बजेटचा कायदा करा माजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एन.डी.एम.जे संघटनेची जोरदार मागणी

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देताना राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, विकास दादा धइंजे, वैभवजी गीते,

प्रगतीचा निधी वळवला जात असल्याने हिवाळी अधिवेशनात बजेटचा कायदा

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एन.डी.एम.जे संघटनेची जोरदार मागणी

मागण्या मारती कार्यवाही करण्याची सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे आश्वासन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – मागीगल काही दिवसात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा अखर्चित निधी इतरत्र वळवला जात असल्याने महाविकास आघाडीच्या सरकार विरोधात मागासवर्गीय जनतेमध्ये प्रचंड चीड व आक्रोश असल्याचे जाणवत असतानाच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे सोलापूर दौऱ्यावर येताच त्यांना पुरोगामी संघटनांच्या रोषास व रोगास सामोरे जावे लागले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा बौद्ध, दलित आदिवासिंच्या प्रगतीचा निधी सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामीण विकास विभाग या विभागाकडे वळवला असल्याचे लोकप्रिय नेते वैभव गिते यांनी धनंजय मुंडे यांना पुराव्यानिशी दाखवुन दिले.
आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते,माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास (दादा) धाइंजे यांचे नेतृत्वाखाली नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव लोकप्रिय नेते वैभव गिते, राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे,संभाजी साळे यांच्या शिष्टमंडळाने धनंजय मुंडे यांची माळीनगर शासकीय विश्रामगृह येथे रात्री 11 वाजता भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले.
निवेदनातील प्रमुख मागण्या
1)बौद्ध अनुसूचित जाती,जमातींच्या हक्काचा निधी इतर विभागांकडे वळवू नये अखर्चित ठेवू नये म्हणून येत्या हिवाळी अधिवेशनात बजेटचा कायदा मंजूर करावा
2)अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत खून,बलात्कार,जाळपोळ,सामुदायिक हल्ला झालेल्या पीडितांना अनुदान देण्यासाठी 72 कोटी रुपये तरतूद वितरित करावी
3)मिनी ट्रॅक्टरच्या योजनेसाठी 62 कोटी रुपये तरतूद वितरित करावी
4)दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत बदल करून बागायती एकरी जमिनीसाठी 20 लाख रुपये तर जिरायतीसाठी 15 लाख रुपये तरतूद करावी.
5)मुख्यमंत्री महोदयांच्या अंतर्गत राज्यस्तरीय उच्चाधिकार व दक्षता नियंत्रण समितीची स्थापना करावी.
6)बौद्ध,अनुसूचित जातीच्या नागरिकांनी मुद्रा योजनेअंतर्गत घेतलेले कर्ज माफ करण्यात यावे.
7)महाराष्ट्रातील जातीय अत्याचारात खून झालेल्या कुटुंबांचे शासकीय नोकरी,जमीन,पेंशन देऊन पुनर्वसन करावे.यासाठी आकस्मिकता योजना लागू करावी.
8)खर्डा जि.अहमदनगर येथील नितीन आगे खून खटल्यातील फिर्यादी राजू आगे यांना खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत पोलीस संरक्षण द्यावे.
9)शिर्डी जि.अहमदनगर सागर शेजवळ हत्या प्रकरणी आरोपींचा पॅरोल रद्द करावा.इत्यादी मागण्यांसाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे)संघटना आक्रमक होती.सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंडे यांनी त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी धनंजय मुंडे यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते चांदापुरी साखर कारखाना चेअरमन उत्तमराव जानकर
यावेळी आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे, उपस्थित होते एन.डी.एम.जे राज्य सचिव वैभव गिते यांनी निवेदन दिले, यावेळी पंचायत समिती सदस्य अजय, राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे,अभिमान जक्ताप,शिवसेनेचे नेते बाबासाहेब बंडगर,पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब सोनवणे,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष भगवान भोसले, तालुका उपाध्यक्ष संभाजी साळे उपस्थित होते.

श्रीपूर येथील नियोजित बुद्ध विहार परिसरात विकासदादाधाईंजे यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त श्रीपूर येथील नियोजित बुद्ध विहार येथे बोधी वृक्षारोपण करताना विकास दादा धाईंजे व श्रीपूर येथील चळवळीतील कार्यकर्ते


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

धम्मचक्रपरिवर्तन दिनाचे औचित्य साधुन श्रीपूर येथील जगदिशनगर  येथील नियोजित बौध्द विहाराच्या जागेत आंबेडकरी चळवळीचे नेते  विकास दादाधाईंजे यांच्या हस्ते बोधीवृक्षाचे वृक्षारोपण  करण्यात आले. या नियोजित  जागेत श्रीपूर येथील  कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रशस्त असे नागपूर दीक्षाभूमी किंवा चैत्यभूमी प्रतिकृती सारखे बुद्ध विहार बांधण्यात येणार आहे यासंदर्भात समिती अध्यक्ष व सदस्य यांच्यावतीने सांगण्यात आले.यावेळी आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा विकास दादा धाईंजे, पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल चे संपादक प्रमोद शिंदे, कार्यकारी संपादक प्रशांत खरात, मा.रतनसिंह(आप्पा) रजपुत,संदिप घाडगे वंचित बहुजन आघाडी संघटक,सागरदादा उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बौध्दविहार समिती अध्यक्ष -कल्याण लांडगे,उपाध्यक्ष -बाळासाहेब भोसले, सचिव- तेजस बाबर, खजिनदार-नवनाथ ताकतोडे ,नागेश चंदनशिवे,बालाजी ताकतोडे,कुमार ताकतोडे,गणेश चांदणे,नागेश साळुंखे गोविंद सावंत ,राहुल बाबर यांनी परिश्रम घेतले. 

उपळवे ता.फलटण दलित मुलीच्या हत्या प्रकरणात फलटण पोलिसांचा संशयास्पद तपास – अहिवळे कुटुंबाचा आरोप

उपळवे ता.फलटण दलित मुलीच्या हत्या प्रकरणात फलटण पोलिसांचा संशयास्पद तपास – अहिवळे कुटुंबाचा आरोप

_घटनास्थळी एन.डी.एम.जे टीमसह समाजकल्याण अधिकाऱ्यांची भेट

आरोपींची आधुनिक पद्धतीने नार्को,पॉलिग्राम लाय डिटेक्ट चाचण्या केल्यास सत्य पुढे येईल………….वैभव गिते**

उपळवे ता.फलटण दलित मुलीच्या हत्या प्रकरणात फलटण पोलिसांचा संशयास्पद तपास – अहिवळे कुटुंबाचा आरोप

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी – ता. १७

            देशभरात नवरात्रीच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचे पूजन केले जात असताना फलटण तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी राक्षसवृत्तीच्या माणसांच्या कचाट्यात सापडली आहे.  3 ऑक्टोबर रोजी ही मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आई वडिलांनी मोठी अपेक्षा बाळगून फलटण पोलीस स्टेशन गाठले, पण पोलिसांनी त्यांची तक्रार घेण्याऐवजी उलट, 'तुमच्याच मुलींमध्ये काहीतरी दोष असेल' असं सांगितलं.बेपत्ता मुलीचा तपास करायचा तर दूरच पण स्थानिक पोलिसांनी त्यांची तक्रार सुद्धा त्वरित घेतली नाही.

सुमारे पाच ते सहा दिवसांनी म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी संबंधित मुलीचा मृतदेह गावाजवळील एका विहिरीत सापडला. मृतदेहाची अवस्था संशयास्पद होती,त्या मुलीच्या कमरेला दगड बांधले होते, तरीही स्थानिक पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा शिक्का ठोकला,आणि हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. कारण, संशयित आरोपी हा सवर्ण समाजातील तर पीडित मुलगी ही अनुसूचित जातीतील हिंदू होलार समाजातील आहे.उपाळवे ता.फलटण या गावात होलार समाजाचे एकच घर आहे. म्हणजे युपीच्या हाथरस ची पुनवृत्ती इथेही झाली, इथेही जातीचे राजकारण करण्यात आले.
पीडित कुटुंबाने वारंवार विनंती करूनही एफआयआर ची कॉपी आणि पोस्टमॉर्टम ची कॉपी दिली नाही. शिवाय पीडित कुटुंबानी वारंवार सांगून सुद्धा संशयित आरोपीवर हत्ये ची कलमे लावली नाहीत.पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे 305 हे कलम लावलेले आहेत.मुलगी होलार समाजातील असल्याने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नियम 1995 संशोधित अधिनीयम 2015 मधील कलम 3 (1)r, व 3 (2)v नुसार कलमे लावली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीकारी फलटण हे करीत आहेत.पोलीस तपासाला खुप विलंब लावत आहेत
या सर्व हालचालीवरून पोलिसांचे तपासाचे कामकाज संथ व संशयास्पद वाटत आहे.
पीडित कुटुंबाने सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात अनेक गंभीर आरोप केले आहेत.यामध्ये हत्या करणारा व्यक्ती एकटा नसून त्याचे सोबती पण या हत्येत सामील आहेत,
त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करावा. पण पीडित कुटुंब मागासवर्गीय असल्याने पोलिसांकडून तपासात कसूर होत आहे,त्यामुळे या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक सामाजिक संघटना पुढे आल्या आहेत, आज नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गीते यांनी ही गंभीर बाब सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा केली असता दोन तासात समाजकल्याण अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले.वैभव गिते यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक (ग्रामीन)सातारा यांच्याकडे आरोपीची लाय डिटेक्टिव्ह चाचणी, नार्को टेस्ट, पॉलिग्राम चाचणी या प्रकारच्या चाचण्या आधुनिक पद्धतीने करून ही आत्माहत्या न्हवे तर हत्या आहे याचे पुरावे गोळा करावे या मुख्य मागणी सह पीडित कुटुंबाचे सामाजिक आर्थिक पुनर्वसन करून गुणवत्तेच्या आधारे परिस्थिती जन्य पुरावे गोळा करून दोषारोपपत्र मे.विशेष न्यायालयात दाखल करण्यापूर्वी पोलीस अधीक्षक कोल्हापूर परीक्षेत्र नागरी हक्क संरक्षण यांच्याकडे पाठवून त्यांनी सांगितलेल्या त्रुटींची पूर्तता करूनच दोषारोपपत्र मे.विशेष न्यायालयात दाखल करावे.उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण हे जर तपासात कसुरी करीत असल्यास त्यांच्याकडून तपास काढून सातारा जिल्ह्यातील इतर कर्तव्यदक्ष डी.वाय.एस.पी यांच्याकडे देण्यात यावा.अशा
मागण्या केल्या.
ऍड.सुजित नीकाळजे यांनी पीडित कुटुंबास कायदेशीर सल्ला देत सर्वतोपरी कायदेशीर मदत करण्याचे आश्वासन दिले.
सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी यांनी पीडित कुटुंबांच्या मागण्या व संस्था संघटनेच्या मागण्या जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.
यावेळी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे जेष्ठ नेते व जिल्हाध्यक्ष निवृत्ती तात्या रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव वैभव गिते,ऍड.सुजित निकाळजे,सातारा जिल्हा उपाध्यक्ष सचिन मोरे,फलटण तालुका अध्यक्ष सागर आढाव,ऑल इंडिया पँथर सेनेचे इंदापूर ता.अध्यक्ष निलेश खरात,वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड,केंद्रीय पत्रकार संघटनेची टीम घटनास्थळी उपस्थित होती. या संदर्भात माहिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे यांनी दिली

मुसळधार पावसाचे पाणी घरात घुसल्याने नुकसान झालेल्या कुटुंबांना शासनाने सरसकट 50 हजार व जीवितहानी झालेल्यांना 10 लाख रुपये अनुदान द्यावे………वैभव गिते

धार पावसाचे पाणी घरात घुसल्याने नुकसान झालेल्या कुटुंबांना शासनाने सरसकट 50 हजार व जीवितहानी झालेल्यांना 10 लाख रुपये अनुदान द्यावे………वैभव गिते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क राज्यात अतिवृष्टीमुळे नदीकाठावरील गावांमध्ये/घरांमध्ये पावसाचे,नदीचे,ओढ्याचे पाणी घरात व घराच्या भोवती शिरल्याने अनेक कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले आहे.पावसाची तीव्रता एवढी आहे की शेती आहे का नदी हे ओळखणेसुद्धा कठीण झाले आहे.काही पाळीव जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत.तर काहींच्या घरात पाणी घुसल्याने संसारउपयोगी साहित्य,कागदपत्रे नष्ट झाली आहेत.काही ठिकाणी घरे उध्वस्त झाली.काही ठिकाणी अर्धवट पडलेली आहेत.मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्यात पोहत आहेत.तर काहींच्या शेतातील मातीसुद्धा वाहून गेल्याचे दिसत आहे.नेहमीप्रमाणे शासनाचा गलथान कारभार दिसून आला.आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या गावांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना दिली नाही.सतर्कतेचा इशारा दिला नाही.तेथील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले नाही.त्यामुळे ज्याठिकाणी शासनाच्या हलगर्जीपणामुळे जीवितहानी झाली असेल त्या ठिकाणच्या मंडलअधिकारी, व संबंधित कर्मचारी यांना जबाबदार धरून निलंबित करावे.सरसकट पंचनामे करून सर्व कुटुंबांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे अनुदान द्यावे.व जीवित हानी झाली असल्यास प्रत्येक कुटुंबास 10 लाख रुपये द्यावेत.अन्यथा आम्ही नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) या संघटनेच्या वतीने माळशिरस तहसील कार्यालय येथे दिनांक 20/10/2020 रोजी तीव्र आंदोलन करणार आहोत याची नोंद घ्यावी असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे.अशी माहिती नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केले उमेदवा, उत्तम जानकर यांच्या नावाच्या चर्चेने माळशिरस तालुक्यातील राजकारणाला कलाटणी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई: महाविकास आघाडी सरकारने विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत होण्याची शक्यता असून एकूण 12 जागांपैकी चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्यामुळे राष्ट्रवादीकडून या जागांवर कोणाला संधी दिली जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसे यांना यापैकी एका जागेवर संधी मिळेल. तर उर्वरित तीन जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे आणि उत्तमराव जानकर यांनी संधी दिली जाणार असल्याचे समजते. यापैकी आनंद शिंदे आणि राजू शेट्टी यांच्या नावाची अगोदरपासूनच चर्चा होती.काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी भेट घेतली होती. त्यावेळी लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या समझोत्याप्रमाणे, विधानपरिषदेची एक जागा देण्याबाबत ठरले होते. त्याविषयी जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून राजू शेट्टी यांच्या नावाची शिफारस केली जाईल. काशी माहिती सूत्रांकडून सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे माळशिरस तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर यांच्या नावाच्या चर्चेमुळे माळशिरस तालुक्‍यातील राजकीय वातावरणाला कलाटणी मिळणार आहे उत्तम जानकर यांच्या नावाच्या चर्चेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून एक वेगळी चर्चा ऐकायला मिळत आहे. माळशिरस तालुक्यात मोहिते-पाटील गटाला टक्कर देण्यासाठी तसेच माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी भक्कम करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. तालुक्यात जरी भाजप ची ताकत वाढले असली तरी राष्ट्रवादीची सुधा जोरदार तयारी सुरू असून राष्ट्रवादीकडून कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जर उत्तम जानकरांना विधानपरिषद मिळाली तर माळशिरस तालुक्यात तीन आमदार होतील. व या तीन आमदारांमध्ये स्पर्धा लागल्याशिवाय राहणार नाही. विकास कामासाठी कोणता आमदार सरस ठरणार हा येणारा काळच ठरवेल.

माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी
एकनाथ खडसे
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे

जि.प.शाळा पिरळे येथील अमित शिंदे व विजया लवटे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

जि प शाळा पिरळे येथील अमित शिंदे व विजया लवटे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेला विद्यार्थी अमित शिंदे
शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेली विद्यार्थ्यांनी विजया लवटे

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-(प्रमोद शिंदे)महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आली होती या शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये जि प शाळा पिरळे येथील अमित शिंदे व विजया लवटे इयत्ता पाचवी सध्या इयत्ता सहावी हे दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले असून पिरळे ग्रामस्थांच्यावतीने या दोघांचे कौतुक होत आहे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी जब्बार मुलाणी सर यांनी मार्गदर्शन केले असून मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर वर्गशिक्षक खरात सर व इतर शाळेतील मार्गदर्शक शिक्षक यांच्याकडून दोघांचे कौतुक होत आहे.

माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभागातील समस्याबाबत व बी ए एम एस डॉक्टरांची नियुक्ती उपकेंद्रात करणेची पंचायत समिती सदस्यांची मागणी


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क माळशिरस
माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभागातील विविध समस्याबाबत व उपकेंद्रात बी ए एम एस डॉक्टरांची नियुक्ती करणेची माळशिरस पंचायत समितीचे सदस्य अजय सकट व पंचायत समितीचे गटनेते रणजितसिह जाधव यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांची भेट घेऊन मागणी केली आहे
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभागातील खालील समस्यांबाबत व बी ए एम एस डॉक्टरांची नियुक्ती करावी याबाबतचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले दिलेल्या निवदेनात म्हटले आहे की,महाराष्ट्र शासनाकडे बी.ए.एम.एस. डॉक्टराची नियुक्ती प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात करण्याच्या संदर्भात 2017 पासून आमचा सतत पाठपुरावा आहे. त्या अनुषंगाने शासनाने अनेक जिल्ह्यामध्ये बी.ए.एम.एस. डॉक्टरांची नियुक्ती प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये केलेली आहे. सध्या कोरोनाच्या महामारीमुळे ग्रामीण भागामध्ये वैद्यकीय आरोग्य यंत्रणा बर्‍यापैकी काम करत असून याहीपेक्षा उत्तम आरोग्य सेवा कार्यान्वित करण्यासाठी सोलापूर जिल्हा तसेच माळशिरस तालु्नयातील 76 आरोग्य उपकेंद्रामध्ये बी.ए.एम.एस. डॉक्टरांची नियुक्ती तत्काळ करण्यात यावी त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी व सीईओना करावेत जेणेकरुन ते तत्काळ नियुक्ती करतील त्याचप्रमाणे माळशिरस तालुख्यातील नातेपुते,माळशिरस व अकलूज उपजिल्हा रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना चालू करावी,माळशिरस तालुक्रातील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे त्वरीत भरण्यात यावीत तसेच जिल्हा परिषद आरोग्य कर्मचार्‍यांची पदेही त्वरीत भरण्यात यावीत,नातेपुते व माळशिरस या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात पायलट प्रोजेक्ट सुरु करण्यात यावा,निवृत्त वैद्यकिय अधिकाऱ्यांना मानधन तत्वावर ओपीडी करन्यास परवानगी द्यावी,अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालय 50 बेडचे असून शासनाकडून 100 बेडसाठी तांत्रिक मान्यता मिळाली आहे परंतू जागा नसल्याने इमारत उभी नाही परंतू सध्या कोरोना परिस्थिती असल्याने आहे त्या 50 बेडच्या उपरुग्णालयात 100 बेडची आकृतीबध्द (वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी) निर्माण करण्यात यावेत जेणेकरुन त्या पदाचा वापर करीत अकलूज व परिसरात आरोग्य यंत्रणा सक्षमपणे राबविण्यात येईल तसेच या उपजिल्हा रुग्णालयात एम.डी.जनरल फिजीशीयन व मेडीशीयन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात याव्यात या पध्दतीने आरोग्य विभागाच्या अडचणी दूर झाल्यास ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांला त्याचा लाभ होईल व ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या सुटल्या जातील

माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभागातील समस्याबाबत व बी ए एम एस डॉक्टरांची नियुक्ती उपकेंद्रात करणेची पंचायत समिती सदस्यांची मागणी

हाथरस प्रकरणी पिडीत कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी एन डी एम जे च्या वतीने महाराष्ट्र सह भारतभर आंदोलन

हाथरस प्रकरणी  पिडीत कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी एन डी एम जे च्या वतीने महाराष्ट्र सह भारतभर आंदोलन *
*जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकासह दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी*

बीड येथे निवेदन देताना एन डी एम जे कार्यकर्ते
दौंड येथे निवेदन सादर करताना एमडीएम चे कार्यकर्ते
हिंगोली येथे एन.डी.एम.जे कार्यकर्त्यांचे आंदोलन
बुलढाणा येथे एन डी एम जे च्या वतीने आंदोलन
मुंबई येथे एनडीएच्या संघटिका रमाताई अहिरे निवेदन देताना
कल्याण टीम निवेदन देताना
एन डी एम जे उस्मानाबाद च्या वतीने निवेदन देताना कार्यकर्ते

    पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)- उत्तर प्रदेशातील हाथरस येथे  झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी  निपक्षपाती तपास करून खटला जलदगतीने साठ दिवसात निकाली काढून आरोपींना फाशीची शिक्षा देऊन  कुटुंबांना नैसर्गिक न्याय द्यावा या मागण्यासाठी एन.डी.एम.जे या संघटनेच्या वतीने डॉक्टर रमेश नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच डॉक्टर केवल उके यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रासह भारत वर निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले .त्यामध्ये  महाराष्ट्र तमिळनाडू,कर्नाटक,उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली,राजस्थान,ओडिसा,हरियाणा पंजाब,इत्यादी ठिकाणी आंदोलन करण्यात आले.तसेच महाराष्ट्रात सोलापूर हिंगोली,वाशिम,परभणी,पुणे,मुंबई,ठाणे,रायगड, बीड,लातूर,अहमदनगर ,सांगली ,सातारा,औरंगाबाद,बुलढाणा,यवतमाळ,चंद्रपूर,  अमरावती,गोंदिया,अकोला,धुळे, या सर्व जिल्ह्यांसह माळशिरस तालुक्यातील प्रांताधिकारी,तहसीलदार,नातेपुते पोलीस स्टेशन यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना  नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन डी एम जे ) संघटनेच्या वतीने देण्यात आले.यावेळी .  या निवेदनामध्ये पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीच्या मृत शरीराची रातोरात विल्हेवाट लावणाऱ्या व पीडित कुटुंबाला शेवटचा अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार नाकारणाऱ्या हाथरस जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि संबंधित पोलिस कर्मचारी यांच्यावर पुरावा नष्ट करणे तिच्या शेवटच्या अंत्यसंस्काराचा अनादर करणे गैर कायदेशीररित्या बंदी करणे धमकी देणे पाडीत कुटुंबावर हल्ला करणे व इतर गुन्हे याकरिता अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम आणि नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले.  या निवेदनाच्या प्रति माननीय राष्ट्रपती, भारत सरकार ,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग नवी दिल्ली व अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठवण्यात आले आहेत.  या निवेदनावर आंबेडकरी चळवळीचे नेते  विकास दादा धाईजे एनडीएमचे वैभव गीते, प्रमोद शिंदे, संजय झेंडे, दत्ता कांबळे,बाबासाहेब सोनवणे,रणजीत कसबे,सचिन रणदिवे आदींच्या सह्या आहेत.

You may have missed