माळशिरस तालुका

उंबरे पागे ग्रामसभा शांततेत पार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क धनाजी शिव पालक पंढरपूरदिनांक 1/11/ 2021 रोजी उंबरे पागे तालुका पंढरपूर येथे ग्रामसभेचे आयोजन केले होते यासाठी ग्रामसभेचे अध्यक्ष कांताबाई शिंदे सरपंच होत्या ग्रामसेवक पांढरे यांनी लोकांचे स्वागत करून ग्रामसभेला सुरुवात केली असता नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी शिव पालक यांनी ग्रामसभा तहकूब करावी अशी सूचना मांडली कारण ग्रामसभेमध्ये अवघ्या पंचवीस लोक उपस्थित होते जोपर्यंत शंभर लोक उपस्थित असतील तर ग्रामसभा घ्या तोपर्यंत ग्रामसभा घेऊ नये असा ग्रामसभेमध्ये शिव पालक यांनी सूचना मांडली त्यानंतर काही वेळ ग्रामसभेचे कामकाज थांबले बराच वेळाने लोक जमा झाल्यानंतर ग्रामसेवकाने मागील आराखडा वाचून दाखवला पांदन रस्त्याचे कामे काँक्रिटीकरण डांबरीकरण सभामंडपाचे काम हाय मस्त दिवा कनेक्शन शासन निर्णय असे सर्व विषय ग्रामसेवक पांढरे यांनी वाचून दाखवले पुढे covid-19 च्या काळामधील लोकांचे पाणीपट्टी घरपट्टी ग्रामपंचायतीने वसुलीसाठी तगाटा लावू नये व गावामध्ये चिकनगुनिया सारख्या आजाराने लोक त्रस्त आहेत गावामध्ये ज्या ठिकाणी सांड पाणी साठले आहे आशा ठिकाणी कीटकनाशक फवारून जेणेकरून डास मरतील असे औषध धुरळणी करावी असे अनेक जनतेचे प्रश्न धनाजी शिव पालक यांनी लावून धरले त्याचबरोबर प्रहारचे तालुकाध्यक्ष नानासो इंगळे यांनी ग्रामसेवक माहिती अधिकारांमध्ये माहिती देत नसल्याबाबत खंत व्यक्त केली ग्रामपंचायतीची विकास कामे सर्व मेंबरांना वाटून द्या आणि आम्हाला पण द्या अशी अजब मागणी बापू मोहिते यांनी केली तसेच बाळासाहेब उर्फ केरु कसबे व माऊली लक्ष्मण गायकवाड उमेश गायकवाड यांनी आपल्या समस्या ग्रामसभेमध्ये मांडल्या परंतु ग्रामसभेला आरोग्य विभाग पशुसंवर्धन विभाग तलाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक वायरमेन असे शासकअधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते परंतु ग्रामसभे मधील प्रमुख मागणी लावून धरल्यामुळे तात्काळ उंबरे गावचे सरपंच कांताबाई शिंदे व ग्रामसेवक पांढरे यांनी अवघ्या काही तासांमध्ये संपूर्ण गावामध्ये कीटकनाशक धुरळणी करून घेण्यात आली आम्हाला ग्रामसभा माहीत नव्हती असे म्हणणाऱ्यांची संख्या खूप मोठी असल्याने ग्रामसभा दवंडी देऊन घेण्यात यावी असा सूर जनतेतून उमटू लागला

नातेपुते येथे उद्या होणार मोहिते कलेक्शनचे उद्घाटन विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)नातेपुते दहिगाव रोड येथे उद्या दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता दिवाळी आगमनानिमित्त भव्य मोहिते कलेक्शनचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते होणार आहे.उद्घाटनास नातेपुते व परिसरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित असणार आहेत.यामध्ये माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते, सोलापूर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख,उत्पन्न बाजार समिती मामासाहेब पांढरे, माजी उपसरपंच अतुल पाटील,माऊली पाटील, रणधीर पाटील, दयानंद काळे, मानसिंग मोहिते ,सुरेश मोहिते,शिवाजी पिसाळ,सदाशिव ननावरे,वालचंद काळे, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास निखील मोहिते, प्रशांत मोहिते यांनी प्रियजनांना जाहीर निमंत्रण दिले आहे. या दिवाळीच्या खरेदीसाठी मोहिते कलेक्शन ला आवश्य भेट द्या

साई सेवा दल संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न*


नातेपुते प्रतिनिधी( प्रमोद शिंदे )

नातेपुते येथे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या आई सेवादल संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार राम सातपुते व मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. साई सेवा दलाच्या वतीने महाराष्ट्रत अनेक उपक्रम राबवले जातात अनेक गरजू व गरीब लोकांना मदत केली जाते.साई सेवा दलाच्या वतीने गरजू व गरीब लोकांना मोफत ॲम्ब्युलन्स सेवा दिली जाते आशा या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थेच्या दुसऱ्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते,कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील शाहिद भाई मुलांनी,अविनाश दोशी बाबा बोडरे डॉक्टर साईनाथ भोसले परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व साई सेवा दलाचे संस्थापक गुरु कर्चे,अध्यक्ष बाबा कांबळे,सचिव सोमनाथ भोसले तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माळेवाडी-बोरगाव मातंग समाजावर झालेल्या अत्याचार संदर्भात वैभव गीते यांचे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयास भेट

माळेवाडी-बोरगाव मातंग समाजावर झालेल्या अत्याचार संदर्भात वैभव गीते यांचे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयास भेट
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई संदेश भालेराव- माळेवाडी बोरगाव येथे मातंग समाजातील व्यक्ती वर सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार न करू दिले बाबत अपर पोलिस महासंचालक (नागरी हक्क संरक्षण) महाराष्ट्र राज्य मुंबई.यांच्या कार्यालयात जाऊन वरिष्ठ अधिकारी यांच्याशी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी चर्चा करून निवेदन दिले.सविस्तर वृत्त असा की,माळशिरस तालुक्यातील बोरगाव-माळेवाडी येथे मातंग समाजातील व्यक्तीच्या अंत्यविधीस स्मशानभूमीत रस्त्याने जाण्यासाठी अडवण्यात आले.त्यामुळे नाईलाजाने ग्रामपंचायतीच्या पुढे जाळावे लागले.याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत.तरीही सादर प्रकरणी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे वैभव गिते व संदेश भालेराव हे तीन दिवसांपासून मंत्रालयात ठाण मांडून बसले आहेत.घटनेचे गंभीर्य वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देऊन मातंग समाजातील साठे या पीडित कुटुंबास न्याय मिळण्याकरिता कायदेशीर,प्रामाणिक व खडतर पाठपुरावा करीत आहेत.

माळेवाडी-बोरगाव मातंग समाजावर झालेल्या अत्याचार संदर्भात वैभव गीते यांचे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयास भेट
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करताना एन डी एम जे राज्य सचिव वैभव गिते

एम ए कस्तुरे हायस्कूल व गोपाळ विद्यालयात 74 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

एम.ए.कस्तुरे हायस्कूल मराठी माध्यम , व गोपाळ प्राथमिक विद्यालय सोलापूर येथे  संयुक्त संयुक्तपणे  15 ऑगस्ट स्वतंत्र दिन  “74” वा वर्धापन  कोवीड-19 च्या सर्व नियमांचे पालन करून उत्साहात संपन्न झाला यावेळी माध्यमिक चे मुख्याध्यापक मा. श्री. सुहास गायकवाड सर व प्राथमिक च्या मुख्याध्यापिका मा. सौ. पुकाळे मॅडम यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व ध्वजारोहन करण्यात आले . यावेळी तंबाखू मुक्ती व पर्यावरण संवर्धन सामूहिक शपथ घेण्यात आली, कोरणा कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्या विना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विश्रांतीनंतर नातेपुते परिसरात पावसाची दमदार एंट्री


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)नातेपुते तालुका माळशिरस येथे सायंकाळी चारच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली असून परिसरातील शेतकरी आनंदी झाला आहे.मध्येच पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती.सध्या कोरोना ने थैमान घातले असून याचा परिणाम शेतीवर व शेतकऱ्यावर झाला असून त्यामध्ये पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.आजच्या या पावसाच्या दमदार एंट्री मुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून शेतकरी पुन्हा एकदा कंबर कसून शेतीच्या कामासाठी लागणार आहे.यामुळे महाराष्ट्र व देशात ला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी दिलासा मिळणार आहे.

विश्रांतीनंतर नातेपुते परिसरात पावसाची दमदार एंट्री

पती मनोज राऊतने पत्नीला ठार करून,पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न

 

पती मनोज राऊतने पत्नीला ठार करून,पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-  फोंडशिरस तालुका माळशिरस येथील संशयित आरोपी नामे मनोज पांडुरंग राऊत राहणार फोंडशिरस व इतर तीन आरोपी यांनी संगनमत करून मयत पत्नी सौ.पल्लवी मनोज राऊत वय 29 हिस मारहाण करून जागीच जीवे ठार केल्याची घटना घडली आहे .

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी नवनाथ माने पोलीस नाईक यांनी समक्ष हजर राहून जबाब दिला की दिनांक 29/6/2021 रोजी ठाणे अंमलदार एस.डी.राऊत यांनी आकस्मात मयत दाखल केले होते. त्यात खबर देणारे पोलीस पाटील लक्ष्मण भिमराव कुंभार हे पोलीस पाटील म्हणून काम करत आहेत.सुमारे दीड वर्षापासून मनोज राऊत व त्याची मयत पत्नी पल्लवी मनोज राऊत वय वर्ष 28 यांचे घरगुती कारणावरून तक्रार झाल्यानंतर पल्लवी राऊत ही घरातून न सांगता निघून गेली होती.    नंतर ती परत आली. दिनांक 28/6/2021 रोजी रात्री आठच्या सुमारास पल्लवी हिने घरात गळफास घेतल्याचे समजले.त्यावर पोलीस पाटील घटनास्थळी गेलेअसता.त्यांना पल्लवी मयत झाल्याचे व पोलीस ठाण्यात खबर दिली नाही व तिचे अंत्यसंस्कार करण्यासाठी तिला स्मशानभूमीकडे येऊन गेल्याचे समजले.यावर पोलीस कॉन्स्टेबल मसाजी थोरात यांनी पोलीस पाटील यांना चौकशी करण्यास सांगितले तेव्हा पोलीस पाटलांनी मयत स्मशानभूमीकडे नेले आहे.अस सांगितले तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल मसाजी थोरात स्मशानभूमीत दाखल झाले.तेव्हा स्मशानभूमीत पल्लवी मयत झाल्याने तिला स्मशानभूमीत चितेवर ठेवून आग लावण्यात आली होती.त्यावेळी तिथे एक स्त्री व तीन पुरुष होते.पोलिसांना पाहता ते तिथून निघून गेले. चितेवरील आग पोलीस कॉन्स्टेबल मसाजी थोरात व पोलीस पाटील कुंभार यांनी विझवली व नंतर पती मनोज राऊत यांच्याकडे विचारणा केली असता. पोलीस स्टेशनला का कळवले नाही असे विचारल्यानंतर त्याने सांगितले घरामध्ये गळफास घेऊन पत्नी मयत झाले आहे.मयत झाल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल थोरात यांनी मयत पल्लवी हिचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय नातेपुते येथे शवविच्छेदना साठी आणला तिच्या अंगाला जखमा असल्याचे निदर्शनास आले.तसेच पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.तसेच ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी मयताचे झालेले पी.एम रिपोर्ट मध्ये मरणाचे कारण सांगितले.Death due to shock due to bilateral haemothorax with blunt trauma chest with fracture ribs with fracture right forearm bones with head injury या कारणाने मयत झाल्याचे सांगितले यावरून पल्लवी मनोज राऊत वय 29 राहणार फोंडशिरस हिस आरोपी नामे पती मनोज पांडुरंग राऊत, दीर श्रीकांत पांडुरंग राऊत,आई सुरेखा गौतम गवळी, भाऊ विशाल गौतम गवळी दोघे राहणार दसुर यांनी मयत पल्लवी हिस मारहाण व गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याची फिर्याद देण्यात आली आहे. यांचे विरुद्ध भा.द.वि कलम302,201,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून.पोलीस खाक्या दाखवताच आरोपीने कबूली दिल्याबाबत पोलिसांकडून सांगण्यात आले.पुढील तपास सपोनि मनोज सोनवलकर करीत आहे.

कृषी पर्यवेक्षक उदय तुकाराम साळुंखे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना दिले शैक्षणिक साहित्य

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- नातेपुते कृषी मंडळ भागातील कृषी पर्यवेक्षक उदय तुकाराम साळुंखे यांनी स्वतःच्या वाढदिवसाचा खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले आहे. हल्ली वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्ते अधिकारी हार-तुरे केक पार्टी साठी अनाठाई खर्च करत असतात व त्यामध्ये हजार रुपये खर्च करतात परंतु असाच कार्यकर्ते अधिकारी व कर्मचारी यांना पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल आवाहन केले होते की सध्या देशामध्ये कोरणा प्रादुर्भाव ने थैमान घातले आहे गरीब लोकांच्या हाताला काम नाही याचा परिणाम गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असून शैक्षणिक साहित्य देण्यासाठी त्यांची परवड होत आहे तर अशा लोकांना अधिकारी कर्मचारी व कार्यकर्ते यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्च टाळून शैक्षणिक साहित्याचे मदत करावी असे आव्हान संपादक प्रमोद शिंदे यांनी केले होते याच आवाहनाला प्रतिसाद देत कृषी अधिकारी कृषी सहाय्यक संघटना तालुकाध्यक्ष उदय तुकाराम साळुंखे साहेब यांनी त्यांच्या वतीने व संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले या स्तुत्य उपक्रमामुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक उदय तुकाराम साळुंके साहेब. पांढरे साहेब ,सचिन दिडके, पत्रकार सचिन रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

कृषी पर्यवेक्षक उदय तुकाराम साळुंखे साहेब यांनीवाढदिवसाचा खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांना दिले शालेय साहित्य
साळुंके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुरोगामी महाराष्ट्र च्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज ने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल कृषी विभागाच्या वतीने सन्मान
पत्रकार सचिन रणदिवे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना
कृषी अधिकारी पांढरे साहेब यांची पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालय सदिच्छा भेट
कृषी अधिकारी साळुंके साहेब यांचा कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान

कृषी दिनानिमित्त पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने कृषी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सन्मान

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- कृषी दिन व माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच कृषी सप्ताह चे औचित्य साधून पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराच्या वतीने कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक शेतकरी व कोरणा काळात प्रशासनासोबत चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल माळशिरस तालुक्यातील सर्व कृषी सेवक,कृषी पर्यवेक्षक,कृषी अधिकारी व कर्मचारी यांचा कोरणा योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.तसेच सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.तसेच कृषी कार्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमास आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे,पंचायत समिती सभापती शोभा ताई साठे,पंचायत समिती सदस्य ऍड ऍड.हसीना शेख मॅडम,हनुमंत आबा पाटील तसेच तालुका कृषी अधिकारी गजानन ननवरे संपादक प्रमोद शिंदे,कार्यकारी संपादक प्रशांत खरात,पंचायत समिती कृषी अधिकारी चव्हाण साहेब, कृषी मंडलाधिकारी गुलाबसिंह वसावे,तसेच माळशिरस तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक,कृषी सेवक, कृषी पर्यवेक्षक,मंडलधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडलाधिकारी सतीश कचरे, यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी सहाय्यक अमित गोरे,रणजीत नाळे व कर्मचारी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे चे सचिन दुधाळ औदुंबर पवार यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे आयोजन पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चे संचालक ऍड डॉ केवल उके यांच्या मार्गदर्शनाखाली संपादक प्रमोद शिंदे कार्यकारी संपादक,प्रशांत खरात यांनी केले.

कृषी मंडळ कार्यालय नातेपुते यास महाराष्ट्रातील पहिले आय एस ओनामांकन झाल्याबद्दल मंडलाधिकारी सतीश कचरे साहेब यांचा विशेष सत्कार करताना आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाईजे सभापती शोभाताई साठे,पंचायत समिती सदस्य ऍड.हसीना शेख मॅडम,संपादक प्रमोद शिंदे
तालुका कृषी अधिकारी गजानन ननावरे साहेब यांचा विशेष सत्कार करताना संपादक प्रमोद शिंदे
ट्राफिक हवालदार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
पंचायत समिती कृषी अधिकारी चव्हाण साहेब यांचा सन्मान करताना
कृषी साहेब रंजीत नाळे साहेब यांचा सन्मान करतान
तालुका कृषी कार्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण
सभापती शोभाताई साठे यांच्या हस्ते वृक्षारोपण
पंचायत समिती सदस्य हनुमंत आबा पाटील वृक्षारोपण करताना

आमदार संजय गायकवाड यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करा -एनडी एम जे मागणी


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क संदेश भालेराव- रोजी नॅशनल दलित मूव्हमेंट फाॅर जस्टीस महाराष्ट्र राज्य महासचिव मा.अ‍ॅड.डाॅ.केवल उके साहेबांच्या अदेशा नुसार व मा.विजयजी कांबळे ठाणे जिल्हाअध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली
ॲड. प्रविणजी बोदडे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली निषेध वेक्त करून कल्याण तहसीलदार कार्यालयात व सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण यांना दिले निवेदन पत्र
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा चितोड येथे आक्षेपर्ह विधान केल्यामुळे दोन समाज्यामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. तसेच तेथे चिथावाणीखोर भाषण केल्यामुळे समाज्या मध्ये सम्रभ निर्माण झाला आहे.

म्हणून त्याच्यावर अट्रॉसिटी अक्ट नुसार 3(1)RU व 3(1)U व ipc 504,505,506 नुसार गुन्हा दाखल व्हावा.
म्हणून आज साह्यक पोलीस आयुक्त (Acp) कल्याण यांना व तहसीलदार कार्यालयात सुध्दा निवेदन पत्र दिले
उपस्थित पदाधिकारी मा. विजयजी कांबळे ठाणे जिल्हा अध्यक्ष, मा.ॲड.प्रविणजी बोदडे कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष, मा.शशिकांतजी खंडागळे , मुंबई ठाणे प्रदेश सचिव,
मा विनोदजी रोकडे ठाणे जिल्हा सचिव,
मा.संदेशजी भालेराव ठाणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख
मा.प्रकाशजी जाधव उल्हासनगर जिल्हाअध्यक्ष, मा.दादुजी चव्हाण उल्हासनगर उपाध्यक्ष, व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते

You may have missed