नातेपुते येथे मुंबई गारमेंट्स भव्य कापड दुकानाचे उद्घाटन

नातेपुते येथे मुंबई गारमेंट्स भव्य कापड दुकानाचे उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदेनातेपुते तालुका माळशिरस येथे दसऱ्याच्या निमित्ताने मुंबई गारमेंट्स या भव्य कापड दुकानाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे कापड दुकान नातेपुते येथील दहिगाव रोड वर असून दोन मजली भव्य दुकान आहे.या दुकानांमध्ये लहान मुलांच्या कपड्यांसह मुली,महिला व पुरुषांचे सर्व प्रकारच्या असंख्य कपड्यांच्या व्हरायटीज उपलब्ध आहेत.या भव्य गारमेंट च्या उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय मनोज सोनवलकर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,रंजीत काळे,उद्योजक राजकुमार पांढरे, मा उपसरपंच अतुल पाटील,मा.ग्रामपंचायत सदस्य सिकंदर मुलानी, रासपचे बशीर काझी,रियाज काझी व नातेपुते परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.आलेल्या मान्यवरांचे सुलतान सय्यद,बाबूलाल सय्यद,शब्बीर सय्यद,यांनी स्वागत केले.

You may have missed