पाच डिसेंबरला होणाऱ्या मुख्यमंत्री शपथविधीला एन डी एम जे कडून विरोध-वैभव गीते.
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
5 डिसेंबर रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री तथा तर मंत्र्यांच्या शपथविधीला एन डी एम जे संघटनेच्या वतीने विरोध करत आहोत असे मत एन डी एम जे चे राज्याचे सचिव वैभव गीते यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.पाच डिसेंबर रोजी महायुती सरकारचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांचे शपथविधी होणार आहे. परंतु या शपथविधीला एन डी एम जे या सामाजिक संघटने कडून विरोध केला जात आहे.याचे कारण आशिकी सहा डिसेंबर रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे.त्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भारतभरातून चैत्यभूमी दादर येथे लाखोच्या संख्येने भीम अनुयायी येत असतात.ते भीम अनुयायी दिनांक 4 डिसेंबर पासूनच मुंबई मध्ये मोठ्या संख्येने दाखल होण्यास सुरुवात होते.व शिवाजी पार्क,चैत्यभूमी दादर परिसर, मुंबईतील मोकळ्या मैदानावर विसाव्यासाठी थांबतात.त्यामुळे आंबेडकर अनुयायी यांची अडचण होऊ नये.6 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला म्हणजे 5 डिसेंबरला शपत विधी असल्याने या कार्यक्रमाला सुद्धा महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व लोक मुंबईत उपस्थित राहतील.त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.कायदा सुव्यवस्था अबाधित आखण्याचा मोठा प्रश्न मुंबई पोलिसांच्या पुढे उभा राहणार आहे.त्यातून काही अडचण निर्माण होऊ नये, कोणत्याही प्रकारचा पथविधी व 6 डिसेंबरच्या कार्यक्रमाला काल बोट लागू नये याची दक्षता राज्यशासनासह मुंबई पोलीस यांनी घेण्याची आवश्यकता आहे.त्यामुळे एनडीएमजी च्या वतीने 5 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या शपथविधीला विरोध करण्यात येत आहे.तो कार्यक्रम तीन तारखेपूर्वी वा 6 तारखेच्या नंतर घेण्यात यावा.जरी प्रशासनाने कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला.तरी 6 डिसेंबरच्या कार्यक्रमाला काल बोट लागणार नाही किंवा अनुचित प्रकार घडणार नाही ची खबरदारी व संपूर्ण जबाबदारी घेऊन कार्यक्रम पार पाडावा.अशा प्रकारचे आव्हान शासन व मुंबई पोलीस प्रशासनास व वैभव गीते यांनी केली आहे.
