पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या कार्यालयात संविधान दिन साजरा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या कार्यालयात संविधान दिन साजरा
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)- पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या कार्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला तसेच पुरोगामी महाराष्ट्र न्यूज च्या वतीने कोरोना काळात उल्लेखनीय काम केल्याबद्दल ए.पी.आय मनोज सोनवलकर साहेब व पोलीस नाईक शिवकुमार मदभावी यांना संपादक प्रमोद शिंदे यांच्या हस्ते कोरणा योद्धा पुरस्कार व वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी जेष्ठ पत्रकार संपादक श्रीकांत बाविस्कर,प्रमोद शिंदे, प्रशांत खरात, विजय अडसूळ उपस्थित होते. तसेच ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रकलेचे अनावरण ए.पी.आय मनोज सोनवलकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ए.पी.आय मनोज सोनवलकर यांनी विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे व हस्तकलेचे कौतुक केले. व पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.