प्रमोद शिंदे

मौजे जलालदाभा येथिल गैरकारभाराची चौकशी करा,नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चा आंदोलनाचा इशारा

नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चा आंदोलनाचा इशारा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –मौजे जलालदाभा ता.औढा नागनाथ जि.हिंगोली या गावामध्ये विविद्ध विकास कामाच्या नावाखाली लाखो रुपये निधिचा आपहार केला असुन मागिल पाच वर्षात ग्रामपंचायतिने एकही काम अंदाजपत्रका प्रमाने केले नसल्याचा आरोप नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस या सामाजिक संघटनेच्या वतिने करन्यात आला आहे, त्याच बरोबर दलित वस्ती मध्ये दलित वस्ती सुधार योजने तुन पानी फिल्टर बसवन्याचे काम सुरू असुन सदर काम मुख्य दलित वस्ती मध्ये न करता इत्तर वस्तीमध्ये करने सुरू आहे सदर पानी फिल्टर मुख्य वस्तित न बसवल्यामुळे सदर योजने चा लाभ सर्व नागरिकांना होनार नाही म्हनुन तात्काळ सदर च्या पानी फिल्टर चे काम तात्काळ बंद करून सदर चे पानी फिल्टर मुख्य वस्तित बसवन्यात यावे व मागिल पाच वर्षात चौदावा वित्त आयोग, रोजगार हामी योजना, दलित वस्ती सुधार योजना, व इत्तर योजनेतुन ग्रामपंचायतीने केलेल्या एकुन सर्व भ्रष्टाचारीत कामांची एकही काम न वगळता एकुन सर्व चौकसी करून भ्रष्टाचार करनारे ग्रामसेवक, सरपंच, प्रशासक, विस्तार अधिकारी, अभियंता यांच्या वर प्रशासकिय कार्यवाही करून गुन्हे नोंद करून त्यांची खातेअंतर्गत चोकशी करून निधीचा पुनर भरना करन्याची कार्यवाही करावी आशी मागनी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस या सामाजिक संघटनेच्या वतिने गटविकास आधिकारी पंचायत समिती कार्यालय औंढा नागनाथ यांच्याकडे निवेदनाद्वारे करन्यात आली आहे, कार्यवाही न झाल्यास दिनांक 19/10/2020 रोजी पंचायत समिती कार्यालय औंढा नागनाथ समोर बोंबा बोंब आंदोलन करन्याचा इशारा देखिल यावेळी निवेदनाद्वारे देन्यात आला आहे सदरिल निवेदनावर नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके, जिल्हाध्यक्ष मोहन मदन दिपके, जिल्हानिरिक्षक अ.हाफिज अ. हादी, प्रसिद्धी प्रमुख उग्रसेन भिवसन नवले, युवाजिल्हाध्यक्ष पवनकुमार चंद्रभान ठोके, साहेबराव विजय कुमार काशिदे, राज टापरे, संतोष युवराज काशिदे, कचरू बळिराम चव्हान, सचिन सुधाकर काशिदे, राजेश सुभाष काशिदे, धम्मदिप कुर्हे, पंजाब सुभाष काशिदे, सिद्धार्थ इंगळे, अजय भिमराव काशिदे, अशोक गोविंदा सोळंके, देवराव कोंडबाराव काशिदे, गजानन दत्तराव पवार, गनपत मधुकर काशिदे, आनिल सोपान खिल्लारे इत्त्यादी पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत

शिखर शिंगणापूर येथे दफनभूमी (कब्रस्तान) प्रश्न पाहण्यासाठी मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती चा पुढाकार

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –शिंगणापूर येथे मुस्लिम दफणभुमी (कब्रस्थान) अतिक्रमण झालेले कळताच तेथे मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती ने सर्व प्रथम भेट देऊन त्याची पाहनी केली व तेथील असणारे प्रश्न मार्गी लावला त्यावेळि शिंगणापूर येथील ग्रामस्थ, मुस्लिम समाज शिंगणापूर व मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्या चे संस्थापक अध्यक्ष अमीर शेख, मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्या चे मिडिया प्रमुख सलमान शेख व माळशिरस तालुका अध्यक्ष सलिम मुलाणी आदि उपस्थित होते..

मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती दफनभूमीची पाहणी करताना

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल च्या संपर्कामुळे युवकाचे हरवलेली कागदपत्रे त्याला मिळाली 24 तासात.


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल च्या संपर्कामुळे युवकाचे हरवलेली कागदपत्रे त्याला मिळाली 24 तासात.

दिनांक 26 सप्टेंबर रोजी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल चे प्रतिनिधी राजहंस बोकेफोडे यास जेजुरी येथील विकास कुंभार या युवकाचे कागदपत्रांसह वॉलेट पुणे येथील वाकड या ठिकाणी सापडले होते त्या पॉकेट मध्ये पॅन कार्ड आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स यासारखे महत्त्वाची कागदपत्रे होती. राजहंस बोकेफोडे याने वॉलेट सापडल्यानंतर लगेच पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल च्या ऑफिसला संपर्क साधला व याची माहिती दिली यावर पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे संपादक प्रमोद शिंदे यांनी महाराष्ट्रभर पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे नेटवर्क असल्याकारणाने आपल्या फेसबुक पेजवर या वॉलेट सापडले आहे या संदर्भात पोस्ट टाकली होती यावर अजित महाराज यांनी जेजुरी येथील ग्रुप वर ती पोस्ट शेअर केली व तेथील राऊत नावाच्या युवकाचा फोन दिलेल्या वरील नंबर वर सकाळी सात वाजता आला व त्याने माहिती सांगितली की मी ह्या व्यक्तीला ओळखतो ते माझ्या शेजारी राहतात तेव्हा त्यांनी विकास बाळासाहेब कुंभार यांना याची माहिती देऊन संपादक प्रमोद शिंदे यांचा नंबर दिला यावर विकास कुंभार यांचा फोन पुरोगामी महाराष्ट्र यांच्या ऑफिसला आल्यानंतर वॉलेट त्यांचेच आहे ही खात्री करून त्यांना आमचे प्रतिनिधी राजहंस बोकेफोडे यांचा नंबर दिला व राजहंसने मित्राच्या सहाय्याने सुखरूपपणे हरवलेले वॉलेट विकास कुंभार यांच्या स्वाधीन केले वॉलेट्स मिळाल्यामुळे विकास बाळासाहेब कुंभार या युवकाचा आनंद गगनात मावेना व त्याने पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चे आभार व्यक्त केले.

वॉलेट स्वीकारताना विकास कुंभार

ग्रामपंचायत पिंपळदरीचा गैरकारभार अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा एन डी एम जे तालुकाध्यक्ष राजरत्न भगत यांचा आरोप..

एन डि एम जे संघटना आक्रमक

पंचायत समिती कार्यालय औंढा नागनाथ समोर करनार बोंबाबोंब आंदोलन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मोहन दिपके (हिंगोली)

मौजे पिंपळदरी ता. औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली या गावामध्ये ठक्करबाप्पा आदिवासी विकास योजनेच्या कामा मधुन पाच लाख रूपयांच्या निधी मधुन सिमेंट रोड चे काम करन्यात आले सदरचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करन्यात आले असुन सदरचे काम हे ईस्टिमेंट नुसार करन्यात आलेले नाही सदर काम हे एका रात्रीत उरकुन जुन्या रोड वर एक इंचाचा थर देऊन निक्रष्ट दर्जाचे करन्यात करून लाखो रुपयांचा अपहार करन्यात आला आहे, त्याच बरोबर दलित वस्तीमध्ये ईलेक्ट्रेशनचे काम अत्यंत निकृष्ट करून त्यामध्ये देखिल लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करन्यात आला आहे एका महिन्यात सर्व पथदिवे बंद पडल्याने मागिल सहामहिन्यापासुन दलित वस्ती अंधारात आहे, त्याच बरोबर दलित वस्तिमध्ये पानिपुरवठा विद्युत पंप बंद असल्याने सहामहिन्यापासुन दलित वस्तिला होनारा पानिपुरवठा बंद आहे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातिल शौच्छालयावर लाखो रूपये खर्च करून देखिल सदरिल शौच्छालय वापरात नसल्याने रुग्णांना व गरोदर स्त्रिया यांना याचा नहकच त्रास सहन करावा लागत आहे.म्हनुन यासंदर्भात नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस या सामाजिक संघटना आक्रमक झाली असुन वरिल सर्व बाबींवर तात्काळ कार्यवाही करून भ्रष्टाचार करणारे ग्रामसेवक, सरपंच,प्रशासक, व अभियंता यांच्यावर गुन्हे नोंद करून निधिचा पुनरभर्ना करन्याची कार्यवाही करन्यात यावी गावामध्ये सर्व सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात आन्यथा दिनांक 19/10/2020 रोजी पंचायत समिती कार्यालय औंढा नागनाथ समोर बोंबाबोंब आंदोलन करन्यात येईल असा इशारा नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चे औंढा नागनाथ चे तालुकाध्यक्ष राजरत्न आगस्ती भगत यांनी निवेदनाद्वारे मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली, जिल्हाधिकारी हिंगोली व गटविकास अधिकारी पंचायत समिती औंढा नागनाथ यांना दिला आहे, सदरिल निवेदनावर नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टिस चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष जगदिप वसंतराव दिपके, जिल्हाध्यक्ष मोहन मदन दिपके, प्रसिद्धी प्रमुख उग्रसेन भिवसेन नवले, युवा जिल्हाध्यक्ष पवनकुमार चंद्रभान ठोके,. ता. उपाध्यक्ष भीमराव इंगोले. मनोज भगत. तुकाराम खिल्लारे. जितेश पांढरे. महेंद्र भगत. अभयराज भगत

लाखो रुपये बजेटच्या रस्त्याची दुरावस्था
प्राथमिक आरोग्य केंद्रातील शौचालयाची अवस्था
यासंदर्भात रिपोर्टिंग करताना पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे हिंगोली प्रतिनिधी मोहन दिपके

भ्रष्टाचाराची पोल खोल करताना एन डी एम जे टीम

लाचखोर अधिकाऱ्यांच्या वंशावळ संपत्तीची चौकशी करून कायदशीर अटक करावी.:- पँथर डॉ राजन माकनिकर


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई दि (प्रतिनिधी) एम आय डी सी उप अभियंता व सहायक अभियंता यांनी लाच घेतल्याच्या अनंत तक्रारी करूनही वरिष्ठांकडून कसलीच दखल घेतलि जात नसून लवकरच “त्या” लाचखोर अधिकाऱ्यांची वंशावळ संपत्तीची चौकशी नाही केल्यास तीव्र पडसाद उमटतील असा इशारा पँथर डॉ माकणीकर यांनी दिला आहे.
एम आय डी सी अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीकडून लाखो रुपयांची लाच घेतली व त्या रकमेच्या व्याजापोटी व वेळेत काम न झाल्याने आजाराने ग्रास्थ होऊन कर्जबाजारी अवस्थेत त्या इसमाने आत्महत्या केली असल्याचे वारंवार तक्रारी अर्ज देऊनही वरिष्ठ अधिकार्या मार्फत कसलीच कारवाई न झाल्याने कुटुंब हतबल होऊन न्यायांच्या प्रतीक्षेत आहे.
एम आय डी सी कार्यालयातील उपअभियंता व सहायक अभियंता या दोघांच्या संगनमताने लाखो रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणाची व्हिडीओ चित्रफीत आपल्याकडे असून शेकडो अर्जं करूनही प्रशासन त्या अधिकाऱ्यांना का वाचवत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लाच घेणाऱ्या दोन अधिकार्यापैकी इ अधिकारी सेवा निवृत्त झाले असून त्यांचे पेन्शन थांबवून दोन्ही अधिकाऱ्यांच्या वंशावळ संपत्तीची चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात यावी अश्या आशयाचे निवेदन डॉ राजन माकणीकर यांनी एमआयडीसी प्रशासनाला दिले आहे.
योग्य ती कारवाही नाही झाल्यास आंदोलन उभारणार असा इशाराही त्यांनी दिला आहे.

नातेपुते बसस्थानकाची दुरावस्था, सुलभ शौचालय बंद असल्याने महिला प्रवाशांची गैरसोय

नातेपुते बसस्थानकाची दुरावस्था

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते( प्रमोद शिंदे) नातेपुते तालुका माळशिरस येथील बसस्थानकाचे अत्यंत दुरावस्था झाली आहे नातेपुते हे ठिकाण मध्यवर्ती बाजारपेठ असल्याकारणाने येथे नेहमीच वर्दळ असते तसेच शिखर शिंगणापूर-पंढरपूर ला जाण्याचा प्रमुख मार्ग असल्याने येथे भाविकांची नेहमी वर्दळ असते. तसेच नातेपुते हे ठिकाण सोलापूर,सातारा,सांगली,पुणे या जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख मार्ग आहे. व पालखी प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे येथे बरेच लोक ये-जा करतात परंतु या लोकांचे नातेपुते येथे आल्यानंतर कसल्याही प्रकारची सोय होत नाही. कारण या ठिकाणी बस स्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या बस बसस्थानकात प्रवाशांना व्यवस्थित बसायला बाकडे नाहीत बसस्थानकाच्या आवारात घाणीचे साम्राज्य आहे.तसेच बसस्थानकाच्या उजव्या बाजूस बी.ओ.टी तत्त्वावर सुलभ शौचालय बांधले आहे. त्याचीही अवस्था अत्यंत वाईट आहे.सध्या कोरणा प्रादुर्भावामुळे नातेपुते बसस्थानकातील शौचालय बंद असल्याने येणारे प्रवासी यांचे गैरसोय होत आहे. विशेषता महिलांची शौचालयासाठी गैरसोय होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सुलभ शौचालय बंद असल्याने प्रवासी वाटेल तिथे लघुशंकेसाठी बसतात त्यामुळे बसस्थानकाच्या आवारात घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झालेआहे.यामुळे रोगराई वाढत आहे.व प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या सर्व गोष्टींचे एसटी महामंडळ महामंडळाने व प्रशासनाने तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे. अन्यथा सामाजिक संघटनांना यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.

नातेपुते येथील बंद अवस्थेतील सुलभ स्वच्छालय
घाणीचे साम्राज्य असलेले शौचालय

तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबीयांना थेट मदत करण्याचा संकल्प डोळस यांचा संकल्प

संकल्प डोळस यांचा पूरग्रस्तांना मदत करण्याचा संकल्प

  
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे)

मौजे पिलीव ता.माळशिरस या ठिकाणी परवा झालेल्या आतिवृष्टी मुळे स्थानिक नागरिक व्यापारी वर्गाचे  मोठ्याप्रमणावर नुकसान झाले. त्यामुळे माजी आमदार कै.हनुमंतराव डोळस यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश सरचिटणीस संकल्प डोळस यांनी पूरग्रस्तांना नुसती भेट नव्हे तर मदत करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. त्यांनी मौजे पिलीव या ठिकाणी जाऊन नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली.ज्या नागरिकांच्या घराची पडझड झाली त्या नागरिकांना जिवनावश्यक वस्तू अन्न धान्य कीट चे वाटप केले तसे.मौजे कोळेगाव ता. माळशिरस या ठिकाणी सुद्धा झालेल्या मुसळधार  पावसामुळे  स्थानिक नागरिकांच्या घराची पडझड झाली घरामध्ये पाणी शिरल्यामुळे  मोठ्याप्रमणावर नुकसान झाले. येथील पूरग्रस्तांना सुद्धा त्यांनी जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.मौजे मळवली, ता. माळशिरस येथे सुद्धा पावसामुळे तेथील ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पुर आला त्यामुळे ओढ्यालगत राहणार्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्याप्रमणावर नुकसान झाले सर्व संसारउपयोगी साहित्य तसेच मोठ्याप्रमणावर घराची पडझड झाली  पाळीव प्राणी वाहून गेले तेथेही संकल्प डोळस यांनी भेट दिली सर्व झालेल्या नुकसाणीची पाहणी केली लवकरात लवकर पंचनामे करून झालेल्या नुकसाणीची शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले.तसेच पुरामध्ये ज्या नागरिकांच्या घराची पडझड झाली त्या नागरिकांना अन्नधान्य, जीवनावश्यक किट उपलब्ध करून दिले परिसरातील  102  पूरग्रस्त  कुटुंबांना  जीवनावश्यक वस्तू दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर इंगळे देशमुख, राेहित (दादा) पवार विचार  मंचच् प्रदेश सचिव  मच्छिंद्रजी ठवरे, माजी तालुका युवक अध्यक्ष वैभव (बाबा )जाधव, विनायक भगत व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

पूरग्रस्तांच्या अडचणी समजून घेताना संकल्प डोळस

मळोली येथील पूरग्रस्तांना तात्काळ शासकीय मदत द्या अन्यथा तीव्र आंदोलन करून- आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाईंजे

पूरग्रस्त क्षेत्राची पाहणी करताना आंबेडकरी चळवळीचे ते विकास दादा

मळोली येथी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-

शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी ढगफुटीमुळे ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर येऊन मळोली येथील दलित वस्ती पूर्णपणे पाण्यामध्ये वाहून गेली आहे. त्यामध्ये घरे वाहून गेली आहेत, घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू, धान्य,कपडे,मौल्यवान वस्तू,महत्त्वाची कागदपत्रे सुद्धा वाहून गेली आहेत. मळवली येथील पूरग्रस्तांना आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा धाईंजे यांनी भेट दिली व तेथील विदारक परिस्थिती पाहता त्यांनी शासनास आव्हान केले की लवकरात लवकर मळवली येथील पूरग्रस्तांना त्यांचे योग्य पंचनामे करून पूरग्रस्तांचे नवीन ठिकाणी गावठाणात पुनर्वसन करून,घरे बांधून तसेच पुरामध्ये वाहून गेलेली कागदपत्रे रेशनकार्ड, विविध प्रकारचे  दाखले यासाठी मळवली विशेष कॅम्प घ्यावा व त्यांना जागेवरती दाखले देण्यात यावे. तसेच शासकीय मदत सुद्धा तात्काळ द्यावी अन्यथा महाराष्ट्रासह माळशिरस तालुक्यात तीव्र आंदोलन छेडू असे आवाहन विकास दादा धाईंजे यांनी केले आहे. याप्रसंगी महाराष्ट्र न्यूज चैनल चे संपादक प्रमोद शिंदे कार्यकारी संपादक प्रशांत खरात सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गायकवाड व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्ष यांच्याही घराचे पुरामुळे नुकसान झाले आहे त्याची पाहणी करताना विकास दादा त्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले
किराणा उद्योजकाचे झालेले नुकसान पाहताना विकास दादा

उपमुख्यमंत्री अजित दादांकडून पुणे मेट्रो ची पाहणी

मेट्रो केबिन मधून मेट्रोच्या कामाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
  •  पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)
  • आज दिनांक 18 सप्टेंबर रोजी, पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यादरम्यान मेट्रो चालकाच्या केबिनमधून पाहणी करत कामकाजाचा आढावा घेतला. सिव्हील कोर्ट, नळस्टॉप, लकडी पूल व स्वारगेट येथील मेट्रोच्या स्टेशनला भेट दिली व कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच आधुनिक पध्दतीनं बोगदा खोदकाम करणाऱ्या टनेल बोअर (टी. बी. एम.) मशिनचे अजितदादांच्या  हस्ते मेट्रोच्या कामासाठी लोकार्पण करण्यात आले. याशिवाय तिकीट व्यवस्थापनाची माहिती घेतली. या पाहणीदरम्यान पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील संत तुकाराम नगर स्टेशन ते पिंपरी (खराळवाडी) असा मेट्रोतून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रवास केला. यावेळी त्यांनी मेट्रो अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या. मेट्रोच्या कामासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. निधी कमी पडू दिला जाणार नाही. असेही आश्वासन अजितदादांनी दिले.

निराधार पेन्शनधारकांवर महाविकास आघाडी सरकारने आनली उपासमारीची वेळ – वैभव गिते ( राज्य सचिव एन.डी एम जे)


जाचक अटी रद्द कराव्यात अन्यथा आंदोलन करणार एन.डी.एम.जे राज्यसचिव वैभव गीते
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर जिल्ह्यातील निराधार पेन्शन धारकांना 21000 हजार रुपये उत्पन्नाची घातलेली अट रद्द करून अनुदान वितरित करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उध्ववजी ठाकरे,सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे,जिल्हाधिकारी सोलापूर मिलिंद शंभरकर यांचेकडे राष्ट्रीय दलीत न्याय हक्क आंदोलन सघटणेचे राज्यसजिव वैभव गिते यांनी संघटणेच्या वतीने केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 20 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णय परिशिष्ट 6 मधील मुद्दा क्रमांक 6 मध्ये विशेष सहाय्य योजने अंतर्गत लाभ घेत असलेल्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजनांमधील सर्व सन 2019/20 या वर्षातील सर्व लाभार्थ्यांचे उत्पन्न दाखले सादर करण्याबाबत संदर्भीय शासन निर्णयात नमूद केले आहे या शासन निर्णयानुसार मा. तहसीलदार माळशिरस यांनी सर्व मंडळ अधिकारी यांना विशेष सहाय्य योजने अंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले जमा करण्यासाठी अवगत करणे बाबत दिनांक 29/6/2020 रोजीच्या पत्रानुसार कळविले आहे. सध्या कोविड -19 या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे जवळपास सर्वच शासकीय प्रशासकीय कार्यालयात कामकाज अतिशय संत व कमी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर चालू आहे. अशा प्रसंगी सोलापुर जिल्हा व माळशिरस तालुक्यासह महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांना 21 हजार रुपये उत्पन्नाचा दाखला मागणी म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. त्यांच्यामुळे सर्व जनमानसांचे रोजगार बुडाले आहेत. हाताला काम नाही अशा परिस्थितीत विशेष योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थ्यांना 21000 रुपयांच्या आतील उत्पन्नाचा दाखला मागणी म्हणजे हा सर्वसामान्य जनतेच्या आधारावर महाविकास आघाडी सरकारने एक प्रकारे अन्यायच केला आहे. गाव कामगार तलाठी तहसीलदार हे मंडळ अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर उत्पन्नाचे दाखले देता येतील असे सांगत आहेत. कोविड विषाणुच्या काळात अशा भयंकर परिस्थितीला सामोरे जात असताना वृद्ध, अपंग, विधवा निराधारांना 21000 रुपयांचा उत्पनांचा दाखला काढणे जवळ-जवळ अशक्य होणार आहे म्हणुन सरकारने सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या दिनांक 20 ऑगस्ट 2019 चा शासन निर्णयातील 21000 रुपये उत्पन्नाच्या दाखल्याची अट तात्काळ रद्द करावी किंवा सर्व निराधारांना कोणत्याही प्रकारची चौकशी न करता सरसकट 21000 रुपयांचे उत्पन्नाचे दाखले तलाठी व मंडळ अधिकारी यांना देण्याचे आदेश द्यावेत.
अन्यथा राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन व समविचारी संघटना माळशिरस तहसील कार्यालयावर निराधारांना सोबत घेऊन मोर्चा काढून आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर माळशिरस चे माजी सरपंच विकास दादा धाइंजे,नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टिस संघटणेचे राज्यसचिव वैभव तानाजी गिते,राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे,सोलापूर जिल्हाध्यक्ष पंकज काटे,जिल्हा सरचिटणीस धनाजी शिवपालक,तसेच उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत यांचेसह सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेतजी गीते राज्य सचिव नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टिस

You may have missed