माळशिरस तालुका

तू है सुंदर फुल इस संसार का हॅपी बर्थडे टू यू च्या जल्लोषात जि प पिरळे शाळेच्या विद्यार्थ्याकडून आमदार राम सातपुते यांना शुभेच्छा


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटर्क प्रमोद शिंदे-

माळशिरस तालुक्याचे विधानसभा सदस्य आमदार राम सातपुते यांचा जि प शाळा पिरळे येथे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी जि प शाळा पिरळे  येथील विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या सागर मे लहर उठे तेरे नाम की तुझे मुबारक खुशिया आत्मज्ञान की तुझको है आनंद मे मिल जाना.तू है सुंदर फुल संसार का. हॅपी बर्थडे टू यू.. च्या जल्लोषात विद्यार्थ्यांनी गीत गाऊन आमदार राम सातपुते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पत्रकार प्रमोद शिंदे, नरवीर उमाजी नाईक क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष अजित शिरतोडे ,पप्पू बुधावले ,सुदाम बुधवले, आनंद लवटे, बाजीराव दडस, प्रल्हाद नरोळे, विश्वास बनकर,पांडुरंग दडस,करीम मुलानी. तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रमोद शिंदे म्हणाले की आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात अनेक विकास कामे केली आहेत. विविध योजना राबवल्या आहेत.गोरगरीब लोकांना आरोग्यासाठी मदत केली आहे तसेच ते गरजू रुग्णांसाठी आरोग्य दूत बनले आहेत.आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक व पप्पू बुधावले मित्रपरिवार यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक शंकर शिंगाडे सर, सूत्रसंचालन संजय ढवळे सर यांनी केला, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुलानी सर खरात सर, निगडे सर, मुल्ला मॅडम, शेंडगे मॅडम, नामदेव मॅडम, यांनी परिश्रम घेतले.या प्रसंगी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निखिल वागळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा नातेपुते पत्रकारांच्या वतीने निषेध प्रतिनिधी

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुणे येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नातेपुते येथील पत्रकारांच्या वतीने
निषेध व्यक्त करण्यात आला. निषेधाचे निवेदन नातेपुते पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांना देण्यात आले. निवेदन गृहमंत्री , मुख्यमंत्री यांना देण्यात आले. निवेदनात असे म्हटले आहे की 9 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात यावी.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. दिवसेदिवस पत्रकारांवर हल्ले वाढत चालले आहेत. आशा पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या हल्ले खोरांवर कायदेशीर कारवाई करून तात्काळ अटक करण्यात यावी.
सदर निवेदन देताना ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बाविस्कर, अभिमन्यू आठवले, प्रमोद शिंदे,सुळ ,मेटकरी,संग्राम खिलारे.उपस्थित होते.

फोंडशिरस आरोग्य केंद्रात गरोदर मातांसाठी डोहाळ जेवण व आरोग्य शिबिर संपन्न

* फोंडशिरस आरोग्य केंद्रात गरोदर मातांसाठी डोहाळ जेवण व आरोग्य शिबिर संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-

-महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून योग्य सप्ताह निमित्त प्राथमिक आरोग्य फोंडशिरस येथे गरोदर मातांसाठी डोहाळ जेवण व आरोग्य शिबिर घेण्यात आले.शिबिराचे उद्घाटन मा.वैद्यकीय अधिकारी एम.पी.मोरे, तालुका आरोग्य अधिकारी,डॉ.रामचंद्र मोहिते, शिवसेना शिंदे गट तालुका अध्यक्ष राजकुमार हिवरकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी राजकुमार हिवरकर बोलताना म्हणाली की तुमच्या घरी मुलगा जन्माला आला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असला पाहिजे आणि मुलगी जन्माला आली तर ती झाशीच्या राणीसारखी झाली पाहिजे आणि हे सर्व घडविण्याचे सामर्थ्य त्या मुला मुलींच्या कर्तबगार आईच्या हातात असते.त्यामुळे आईचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे. डॉक्टर एम पी मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रामचंद्र मोहिते मोहिते,डॉ.सुचित्रा कुरळे, आरोग्य सहाय्यक विजया चव्हाण, यांनी आरोग्यविषयक मातांना मार्गदर्शन केले.यावेळी  गरोदर मातांसाठी डोहाळे जेवण त्याचबरोबर गरोदर माता तपासणी, रक्तगट, बीपी,शुगर अशा विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा.जि प सदस्य भानुदास पाटील,      सरपंच पोपटराव बोराटे, दहिगाव गावच्या सरपंच सोनम  खिलारे, पत्रकार प्रशांत खरात, मा.पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील, भाजपचे मनोज जाधव, तेजस गोरे,  सुनील बनकर, प्रमोद चिकणे विजय सरवदे, विजय ढेकळे, आकाश खिलारे, सनी बरडकर, दत्ता बोडरे, मेजर दादा केंगार आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी   प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडशिरस येथील सर्व आरोग्य सेवक सेविका कर्मचारी आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी सर यांनी केलं.

वकील संघटनेच्या वतीने जागर संविधानाचा ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क


26 जानेवारी भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त माळशिरस तालुका वकील संघटनेच्या वतीने ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.दिनांक 6 डिसेंबर 2023 ते 20 जानेवारी 2024 या दरम्यान माळशिरस वकिल बांधवांनी यांच्यावतीने  आयोजित केलेला जागर संविधानाचा राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 2023 या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी अकलूज येथिल लक्ष्मी बालाजी हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सदर वक्तृत्व स्पर्धा ही ऑनलाइन घेण्यात आली, यामध्ये अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता, महाराष्ट्रातील अमरावती, धाराशिव, अहमदनगर, सातारा, सोलापूर, पुणे, रायगड , सिंधुदुर्ग , मुंबई भागातील स्पर्धक सहभागी झाले होते.सदर स्पर्धेमध्ये क्रमांक पटकविलेल्या स्पर्धकांना  मा. , निवृत जिल्हा न्यायाधीश तथा डायरेक्टर ऑफ प्रोसेक्युशन सोपानराव निकम तसेच सरकारी वकील महेश कोळेकर, आक्काताई बडरे,  संपादक पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल,प्रमोद शिंदे, शंकर बागडे, हेड, स्मायल एफ एम अकलूज, आणि ॲड. नागनाथ शिंदे, अध्यक्ष, माळशिरस वकिल संघटना यांचे हस्ते देण्यात आले. सदर स्पर्धेची रूपरेषा आणि संकल्पना प्रास्ताविकेच्या माध्यमातून ॲड. सुमित सावंत यांनी मांडली. स्पर्धेत प्रथम क्रमांक सुचित्रा कांबळे, गोरेगाव, मुबई, यांना मिळाला असून 11,111/- रुपये, द्वितीय क्रमांक प्रगती गेंड, भांबुर्डी, माळशिरस यांना 7,777/- रुपये, , तृतीय क्रमांक ॲड. अल्ताफ आतार, अकलूज यांना रक्कम रुपये 5,555/- , सर्वांना प्रमाणपत्र  सन्मानचिन्ह  देण्यात आले .तसेच दोन उतेजनार्थ पारितोषिक हर्षद पुडेगे, सोलापूर आणि आदित्य विलांकर, डोंबिवली, मुम्बई यांना प्रत्येकी रक्कम रुपये 3000,  देण्यात आले आहेत.सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. स्पर्धेचे निरीक्षक म्हणून प्रा.देविदास गेजगे यांनी काम पाहिले.या कार्यक्रमास परसरतील वकिल , विविध  क्षेत्रातील समजिक, राजकीय पक्षांतील  कार्यकर्ते  मोठ्या संख्येने  उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ॲड. रजनी गाडे, ॲड. सुनिता सातपुते, ॲड. वैशाली कांबळे, ॲड. धनंजय बाबर, ॲड. भारत गोरवे, ॲड. सुमित सावंत, ॲड. वैभव धाईंजे, ॲड. अजिंक्य नवगिरे, ॲड. सुयश सावंत, ॲड.नितीन भोसले, ॲड. धर्याशिल भोसले, ॲड. मनोज धाईंजे यांनी प्रयत्न केले.

पिरळे येथे सुभेदार शहीद अरुण पालेकर स्मारकाचे उद्घाटन

पिरळे येथे सुभेदार शहीद अरुण पालेकर स्मारकाचे उद्घाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

पिरळे ता. माळशिरस येथे ग्रामपंचायत पिरळे यांच्या वतीने
मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील पहिले शहीद सुभेदार अरुण लक्ष्मण पालेकर यांच्या स्मरणार्थ स्मारकाचे उद्घाटन सुभेदार अरुण पालेकर यांच्या वीर पत्नी सुस्मिता अरुण पालेकर ,मुलं व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम सरपंच रेश्मा सुनील दडस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देऊन करण्यात आली.व स्मारकाच्या ठिकाणी
मान्यवरांच्या हस्ते शिलालेखाचे अनावरण करण्यात आले. तसेच जि प शाळा पिरळे विद्यार्थ्यांनी संचलन करून मानवंदना दिली. प्रसंगी वीर पत्नी सुस्मिता पालेकर म्हणाल्या की माझ्या गावात हा कार्यक्रम घेतला त्यामुळे मला गावाविषयी अभिमान वाटतो.
तसेच त्यांनी अरुण पालेकर यांच्या नावाने इयत्ता दहावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जाहीर करून त्यांच्या नावाने 101 झाड लावण्याचा संकल्प केला. सुभेदार अरुण पालेकर हे ८ ऑक्टोबर 2009 रोजी जम्मू कश्मीर पुंज येथे देश सेवा करताना बॉम्ब हल्ल्यात शहीद झाले त्यांना खात्याअंतर्गत विविध प्रकारचे सात पुरस्कार मिळाले आहेत. याप्रसंगी माजी सरपंच संदीप नरोळे,पुरोगामी महाराष्ट्राचे प्रमोद शिंदे,पोलीस पाटील औदुंबर बुधावले,ब्रिलियंट संस्थेचे सचिव शिंदे सर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच माझी वसुंधराअभियानांतर्गत एक झाड लेकीचे वृक्ष लागवड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ब्रिलियंट संस्थेच्या वतीने बक्षीस देण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत व जि प शाळा पिरळे यांच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत वगरे सूत्रसंचालन शिक्षक हनुमंत फुले यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शहीद सुभेदार अरुण पालेकर यांची कन्या कविता पालेकर मुलगा अनिकेत पालेकर, सुनील दडस मुख्याध्यापक शंकर शिंगाडे उपसरपंच अमोल शिंदे, शिवाजी लवटे,महादेव शिंदे,उमेश खिलारे,कृषी सेवक अमित गोरे,भाऊसाहेब भिसे आदी मान्यवर होते.कार्यक्रमाचे आभार संजय ढवळे यांनी व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जि प शाळा पिरळे शिक्षक स्टाफ व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

सन्मती प्रिमियर लीग भव्य टेनिस बाॅल क्रिकेट🏏 स्पर्धा चे आयोजन

श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था आयोजित

SPL-2023*

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

सन्मती प्रिमियर लीग भव्य टेनिस🎾 बाॅल क्रिकेट🏏 स्पर्धा चे आयोजन
मंगळवार दि. २५/४/२०२३ रोजी रत्नत्रय इंग्लिश स्कूल, सदाशिवनगर येथे करण्यात आले. सकाळी ८ वाजता उद्घाटन अकलूज येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. सतीश दोशी, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी चे संस्थापक श्री अनंतलाल दोशी, श्री प्रमोद दोशी, श्री प्रदीप झाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत खालील संघांनी सहभाग नोंदवला
न्यु चंद्रप्रभू क्रिकेट क्लब, नातेपुते
फलटण सुपर किंग्स, फलटण
नमोकार क्रिकेट क्लब, टेंभुर्णी
सोलापूर वारियर्स, सोलापूर
आदिनाथ टायटल्स, वैराग
अकलुज टायटल्स, अकलुज
राझिंग स्टार, नातेपुते
सन्मती चॅलेंजर, सदाशिवनगर
सोलापूर एलआयसी फायटर, सोलापूर
पार्श्वनाथ क्रिकेट चॅम्पियन, नातेपुते
अरिहंत वॉरिअर्स, पंढरपुर
कुंथुनाथ वारिअर्स, वेळापूर
या पैकी सेमीफायनल मॅच
सोलापूर एलआयसी फायटर, सोलापूर
नमोकार क्रिकेट क्लब, टेंभुर्णी
न्यु चंद्रप्रभू क्रिकेट क्लब, नातेपुते
यांचे त होऊन फायनल सोलापूर संघ v टेंभुर्णी क्रिकेट मॅच झाली. नंबर एक चे पारितोषिक सोलापूर एलआयसी फायटर, सोलापूर यांना मिळाले
नंबर दोन चे पारितोषिक नमोकार क्रिकेट क्लब, टेंभुर्णी
तसेच उत्तेजनार्थ तिसरे पारितोषिक व उत्कृष्ट संघ ट्रॉफी न्यु चंद्रप्रभू क्रिकेट क्लब, नातेपुते यांना मिळाली.
पंच, अॅकरींग, स्कोअर म्हणून आनंद कुलकर्णी सर, राहुल देशमाने, उमेश पिसे, अनिल शिंदे, समीर आदत, महावीर शहा (पापरी)
संयोजक विरकुमार दोशी, अभिजीत दोभाडा, महावीर दोशी, केतन दोशी

माळशिरस तालुक्याला कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी द्या- राजकुमार हिवरकर

माळशिरस तालुक्याला कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी द्या- राजकुमार हिवरकर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)

माळशिरस तालुक्याला कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी द्या अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बाळासाहेबांची  शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील निवेदनाद्वारे केली आहे. माळशिरस तालुक्याचा उपविभागीय अधिकारी यांचा तात्पुरता चार्ज इतर विभागातील अधिकाऱ्यांकडे दिला जातो. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील प्रशासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण झाल्याचे दिसून येते. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे दाखले शेतकऱ्यांच्या शेतीच्या केसेस व इतर अन्य प्रशासकीय बाबी वेळेवर होत नसल्याने लोकांचे गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्काळ माळशिरस तालुक्यात कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी द्यावा अशी मागणी राजकुमार हिवरकर यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी आरोग्यमंत्र्याचं काम जाणून घ्यावं मगच बोलावं- राजकुमार हिवरकर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नातेपुते (प्रतिनिधी)-काल सामना मधून संजय राऊत यांनी आरोग्य मंत्री दाखवा यावर आणि एक लाख रुपये मिळवा अशी प्रतिक्रिया दिल्याच्या नंतर माळशिरस तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिले की वास्तविक पाहता संजय राऊत साहेब पण  ईडीच्याच्या कोठडीत गेले होते. त्यादरम्यान आरोग्य मंत्री सावंत साहेब यांनी त्यादरम्यान आरोग्य खात्याचा पदभार स्वीकारला आरोग्य मंत्री झाल्यापासून तानाजीराव सावंत साहेब यांनी नवरात्र उत्सवाच्या दरम्यान सुरक्षित माता सुरक्षित घर हे अभियान राबवलं या अभियानाची दखल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा घेतली आणि या अभियानातून महाराष्ट्र अठरा वर्षावरील मातांची तपासणी करणारा हा सगळ्यात प्रथम क्रमांकाचे राज्य बनला आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात बऱ्याच सरकारी दवाखान्यांना भेटी देऊन गोरगरिबाच्या हक्काचं मिळणारा औषध उपचार तो व्यवस्थित दिला जातो का तिथे स्वच्छता ठेवली जाते का याची पाहणी करणारे आरोग्य मंत्री हे देशात पहिले आरोग्य मंत्री ठरलेले आहेत म्हणून माझी आदरणीय महाभारतातील संजय राऊत यांना विनंती आहे की आपण आता कोठडीतून बाहेर आलेला आहात त्यामुळे काही बोलण्याच्या अगोदर आपल्या संसद बुद्धीचा वापर करा सभोवताली घटनाचा अभ्यास करा माहिती घ्या कोणावरही आरोप करण्या अगोदर माहिती घ्यावी आणि नंतर आपलं मत सामना हा बाळासाहेबांच्या विचाराचे दैनिक आहे याची दखल देशभरात घेतली जाते आपण जर चुकीचं बोलून छापणार असाल तर सामना विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही ते आपण लक्षात घ्याव त्यांनी एबीपी माझा च्या कट्ट्यावर मुलाखतीत सांगितलं की मी शांत झालो आहे एकांतात राहिल्यामुळे माझी बोलण्याची विचार करण्याची क्षमता कमी झालेली आहे माझी जेलमध्ये लावलेल्या अतिप्रतर लाईट मुळे नजर सुद्धा कमी झाली आहे असं स्वतः संजय राऊत साहेबांनी राजीव खांडीकरांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होतं ते त्यांनी लक्षात घ्या म्हणून वाचनात नसलं तरी सोशल मीडियाचा वापर करून आरोग्यमंत्र्यांचं काम जाणून घ्यावं नंतर टीका करावी महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी देशाला महा शिबिराच्या माध्यमातून कुठला मैदान परंडा येथे आयोजित केलेल्या शिबिरामधून महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला हे आशेचा किरण दाखवला दोन लाख 87 हजार 653 एवढ्या रुग्णांची तपासणी स्वतः तानाजीराव सावंत यांनी थांबून करून घेतली आहे हे जर संजय राऊत डोळस तुळसपणे नाकारत असतील तर महाभारतातील संजय आणि हे हा संजय यामध्ये खूप मोठा फरक कलियुगात दिसत आहे कारण याच संजय मुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा जन्म झाला की त्यांनी विसरून चालणार नाही आणि म्हणून माझी एक शिवसैनिक म्हणून विनंती आहे संजय राऊत साहेबांनी चुकीचे बोलण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेसमोर जे दिसणार आहे ते मांडव आहे विरोधक असलं तरी चालेल पण एखाद्या समोरच्याने चांगले केलेले कामाची प्रशंसा करणे हा महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आहे आणि यापासून संजय राऊतइ डीच्या कोठडीत गेल्यापासून बरेच दूर गेलेले आहेत अशाप्रकारे त्यांनी यांच्या प्रतिक्रियेवर मत व्यक्त यावेळी.शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील पोपट शिंदे सोशल मीडिया प्रमुख जावेद मुलांनी गटप्रमुख राजू मुलांनी आधी शिवसैनिक पत्रकार परिषदेत उपस्थित होते

हनुमान विद्यालय शिंदेवाडी येथे संविधान दिन उत्साहात संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

हनुमान विद्यालय शिंदेवाडी ता माळशिरस येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  ऍड.सुमित सावंत,पत्रकार प्रमोद शिंदे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात संविधान रॅली काढून करण्यात आली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,संविधान पुस्तिका व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ऍड सुमित सावंत बोलताना म्हणाले की जगातील सर्वश्रेष्ठ संविधान हे भारताचे संविधान आहे.संविधानाने सर्व भारतीयांना समान अधिकार दिला आहे. संविधानामुळे देशात कायदा सुव्यवस्था व समानता आहे.तसेच या देशात कर्मवीर अण्णांनी बहुजनांच्या मुलांना शिकण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.पत्रकार प्रमोद शिंदे म्हणाले की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.तसेच शासनाने हर घर तिरंगा हा कार्यक्रम राबवला आहे त्याचप्रमाणे शासनाने घर घर संविधान हर घर संविधान हा कार्यक्रम राबवावा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपला अधिकार माहित होईल.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आखाडे सर हे होते.याप्रसंगी मुख्याध्यापिका देठे मॅडम,डॉ मचाले सर्व शिक्षक स्टाफ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेगर सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक आखाडे सर यांनी व्यक्त केले..

नातेपुते पोलीस स्टेशनच्या वतीने 26 नोव्हेंबरला रक्तदान शिबिर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे नातेपुते नातेपुते पोलीस स्टेशन व ज्ञानदीप ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने नातेपुते येथे 26 नोव्हेंबर संविधान दिन तसेच 26 /11 हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस बांधवांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदानाने एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात बहुसंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय प्रवीण संपांगे सर्व कर्मचारी व ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष सीडी ढोबळे हनुमंत माने यांनी केले आहे.