फोंडशिरस आरोग्य केंद्रात गरोदर मातांसाठी डोहाळ जेवण व आरोग्य शिबिर संपन्न
* फोंडशिरस आरोग्य केंद्रात गरोदर मातांसाठी डोहाळ जेवण व आरोग्य शिबिर संपन्न
पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)-
-महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून योग्य सप्ताह निमित्त प्राथमिक आरोग्य फोंडशिरस येथे गरोदर मातांसाठी डोहाळ जेवण व आरोग्य शिबिर घेण्यात आले.शिबिराचे उद्घाटन मा.वैद्यकीय अधिकारी एम.पी.मोरे, तालुका आरोग्य अधिकारी,डॉ.रामचंद्र मोहिते, शिवसेना शिंदे गट तालुका अध्यक्ष राजकुमार हिवरकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी राजकुमार हिवरकर बोलताना म्हणाली की तुमच्या घरी मुलगा जन्माला आला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असला पाहिजे आणि मुलगी जन्माला आली तर ती झाशीच्या राणीसारखी झाली पाहिजे आणि हे सर्व घडविण्याचे सामर्थ्य त्या मुला मुलींच्या कर्तबगार आईच्या हातात असते.त्यामुळे आईचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे. डॉक्टर एम पी मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रामचंद्र मोहिते मोहिते,डॉ.सुचित्रा कुरळे, आरोग्य सहाय्यक विजया चव्हाण, यांनी आरोग्यविषयक मातांना मार्गदर्शन केले.यावेळी गरोदर मातांसाठी डोहाळे जेवण त्याचबरोबर गरोदर माता तपासणी, रक्तगट, बीपी,शुगर अशा विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा.जि प सदस्य भानुदास पाटील, सरपंच पोपटराव बोराटे, दहिगाव गावच्या सरपंच सोनम खिलारे, पत्रकार प्रशांत खरात, मा.पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील, भाजपचे मनोज जाधव, तेजस गोरे, सुनील बनकर, प्रमोद चिकणे विजय सरवदे, विजय ढेकळे, आकाश खिलारे, सनी बरडकर, दत्ता बोडरे, मेजर दादा केंगार आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडशिरस येथील सर्व आरोग्य सेवक सेविका कर्मचारी आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी सर यांनी केलं.