प्रमोद शिंदे

नांद्रुक-पिंपरी-मोरोची हा रस्ता लवकर दुरुस्त करा अन्यथा आंदोलनाचा इशारा… माजी सरपंच राणे,सर

नांद्रुक-पिंपरी-मोरोची हा रस्ता लवकर दुरुस्त करा अन्यथा आंदोलनाचा इशारा…
माजी सरपंच राणे,सर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क- पिंपरी ता माळशिरस येथील अत्यन्त महत्वाचा व सातारा-सोलापूर-पुणे या तिन्ही जिल्ह्यास जोडणारा रस्त्या अत्यन्त खराब झाला असून त्या वर मोठ मोठे खड्डे पडले असून त्यावरील पुलही खचुन गेले आहेत

सदर रस्त्यावरून वाहतूक करणे अतिशय अवघड जात असून प्रवाशांना अतिशय बिकट परीस्तीतीचा सामना करावा लागत आहे

मागील दोन,तिन वर्षांपासून सदर रस्था दुरीस्थीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांचे कडे केलेली आहे

अद्यापही दुरुस्ती झाली नाही नजीकच्या काळात पिंपरी च्या ग्राम दैवताची जत्रा भरणार असून सदर रस्त्यावर असणारी काटेरी झुडपे त्वरित काढून घ्यावीत व रस्था डांबरीकरण करावा अन्यथा समस्थ ग्रामस्थ व तरूणांना बरोबर घेऊन सातारा जिल्ह्यास जाणारी वाहतूक बंद करण्यात येईल असा इशारा बांधकाम विभाग अकलूज यांना माजी सरपंच राणे सर यांनी दिला आहे

नांद्रुक-पिंपरी-मोरोची हा रस्ता लवकर दुरुस्त करा अन्यथा आंदोलनाचा इशारा…
माजी सरपंच राणे,सर

महात्मा फुलेंच्या सत्यशोधक वाड्यात घुमला बळीराजाचा जयघोष!

महात्मा फुलेंच्या सत्यशोधक वाड्यात घुमला बळीराजाचा जयघोष!

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे पुणे-पुण्यात सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या वतीने बळीप्रतिपदेच्या निमित्ताने कृषिसाम्राट बळीराजाची गौरव मिरवणूक गेली 16 वर्ष काढण्यात येत होती. मात्र यंदा कोविड च्या पार्श्वभूमीवर बळी पूजन आणि पानसुपरीचा कार्यक्रम समता भूमीवर महात्मा फुले वाडा येथे दि.16.11.2020 रोजी सकाळी 11 वाजता मोठ्या प्रमाणात कृषी धन वाटप करीत साजरा झाला. सुरवातीला भाज्या आणि धान्य राशीचा प्रतिकात्मक बळीराजा उभारून त्याचे पूजन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या सुरवातीला कष्टकऱ्यांचे नेते डॉ बाबा आढाव आणि शीला आढाव यांच्या हस्ते थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर दरवर्षी प्रमाणे डॉ. बाबा आढाव यांनी सत्यशोधक रघुनाथ ढोक यांना बळीराजा वेशभूषेत असल्याने मोठा हार घालुन स्वागत केले.
यावेळी महात्मा फ़ुले रचित सत्याचा अखंड डॉ.बाबा आढाव चे मागे सर्वांनी गाऊन वातावरण बळीमय केले .याप्रसंगी इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो – सत्य की जय हो! नांगर, कणीस याने सजलेली भव्य रांगोळी शरद गायकवाड यांनी काढलेली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. .या वर्षी कोव्हिडं मुळे महात्मा फुले वाडा ते जिजाऊ लाल महाल मिरवणूक काढता न आल्याने सम्पूर्ण फुले वाड्याला ” इडा पिडा टळो बळीच् राज्य यवो” तसेच महापुरुषांचे नावाचा जय घोष करीत सद्य बळीराजा सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे मागोमाग प्रदक्षिणा घालून फुले वाड्याचे दारात मान्यवरांसह सर्वाना मोट्या प्रमाणात थेट शेतातून आणलेल्या कृषीधनाचे वाटप बळीराजा रघुनाथ ढोक याचे हस्ते करण्यात आले.पानसुपरीचा कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणात कोव्हिडं मुळे आज मिरवणूक काढता आली नाही असे सत्यशोधिका प्रा प्रतिमा परदेशी यांनी खंत व्यक्त करीत यावर्षी बळीराजा गौरवशाली इतिहासाला सलाम म्हणून भव्य रांगोळी आणि आकाश कंदील स्पर्धा आयोजित केल्याचे सांगून त्याला महाराष्ट्र भरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे म्हंटले व त्याचा बक्षीस समारंभ 28 नोव्हेंबर 2020 रोजी असल्याचे सांगितले. यावेळी ऍड सुभाष वारे, ऍड मोहन वाडेकर, प्राची दुधाने, राखी रासकर , बाबासाहेब जाधव या सर्वांनी मनोगत व्यक्त करत बळीराजाच्या इतिहासाला उजाळा दिला. या प्रसंगी अंकल सोनवणे, नाना निवांगुणे, प्रमोद वाघदरीकर, महेश बनकर ,आशा ढोक यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रियांका म्हेत्रे, व्ही जे वळवी, राजेंद्र शेलार, प्रतिक परदेशी, श्रद्धा तोडकर , आकाश-क्षितिज ढोक यांनी विशेष परिश्रम घेतले
कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन सत्यशोधक रोहिदास तोडकर यांनी मानले.

उपळवे होलार समाजातील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणात कुटुंबास तीन महिने पुरेल एवढे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

उपळवे होलार समाजातील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणात कुटुंबास तीन महिने पुरेल एवढे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सहाय्यक आयुक्त उउपळवे होलार समाजातील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणात कुटुंबास तीन महिने पुरेल एवढे जीवनावश्यक वस्तूंचे वाटपबाळे व आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास धाइंजे यांच्या हस्ते वाटप

एन.डी.एम.जे संघटनेचा पाठपुरावा आणि यश हे समीकरण पुन्हा एकदा सिद्ध

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कर सातारा प्रतिनिधी –

            फलटण तालुक्यात उपळवे गावात 3 ऑक्टोबर रोजी मुलगी बेपत्ता झाल्याने आई वडिलांनी फलटण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती.8 ऑक्टोबर रोजी संबंधित मुलीचा मृतदेह गावाजवळील एका विहिरीत सापडला.मृतदेहाची अवस्था संशयास्पद होती,त्या मुलीच्या कमरेला दगड बांधले होते,तरीही स्थानिक पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा गुन्हा दाखल केला.कारण संशयित आरोपी हा सवर्ण समाजातील तर पीडित मुलगी ही अनुसूचित जातीतील हिंदू होलार समाजातील आहे.उपळवे ता.फलटण या गावात होलार समाजाचे एकच घर आहे.इथेही जातीचे राजकारण करण्यात आले.

पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे भा.द.वि 305 हे कलम लावलेले आहे.मुलगी होलार समाजातील असल्याने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नियम 1995 संशोधित अधिनीयम 2015 मधील कलम 3 (1)r, व 3 (2)v नुसार कलमे लावली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीकारी फलटण हे करीत आहेत.
पीडित कुटुंबाने केलेल्या आरोपांवरून पोलिसांचे तपासाचे कामकाज संशयास्पद वाटत आहे.
त्यामुळे या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक सामाजिक संघटना व पक्ष पुढे आले आहेत, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गीते यांनी ही गंभीर बाब सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा केली असता दोन तासात समाजकल्याण अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले.वैभव गिते यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक (ग्रामीन)सातारा यांच्याकडे आरोपीची लाय डिटेक्टिव्ह चाचणी, नार्को टेस्ट, पॉलिग्राम चाचणी या प्रकारच्या चाचण्या आधुनिक पद्धतीने करून ही आत्माहत्या न्हवे तर हत्या आहे याचे पुरावे गोळा करावे या मुख्य मागणी सह पीडित कुटुंबाचे सामाजिक आर्थिक पुनर्वसन करून गुणवत्तेच्या आधारे परिस्थिती जन्य पुरावे गोळा करून दोषारोपपत्र मे.विशेष न्यायालयात दाखल करण्यापूर्वी पोलीस अधीक्षक कोल्हापूर परीक्षेत्र नागरी हक्क संरक्षण यांच्याकडे पाठवून त्यांनी सांगितलेल्या त्रुटींची पूर्तता करूनच दोषारोपपत्र मे.विशेष न्यायालयात दाखल करावे.उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण हे जर तपासात कसुरी करीत असल्यास त्यांच्याकडून तपास काढून सातारा जिल्ह्यातील इतर कर्तव्यदक्ष डी.वाय.एस.पी यांच्याकडे देण्यात यावा.अशा
मागण्या केल्या.
ऍड.सुजित नीकाळजे यांनी पीडित कुटुंबास कायदेशीर सल्ला देत सर्वतोपरी कायदेशीर मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
एन.डी.एम.जे संघटनेने दिलेल्या निवेदनाची दखल घेत
सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी श्री उबाळे यांनी अहिवळे कुटुंबास तीन महिन्यांच्या जीवनावश्यक वस्तू मंजूर करण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे पाठवला जिल्हाधिकारी यांनी तात्काळ मंजुरी दिली यामध्ये गहू 108 किलो तांदूळ 27 किलो मुग डाळ 10 किलो तूर डाळ 10 किलो पोहे सहा किलो रवा 6 किलो शेंगदाणे 4 किलो गोडेतेल 18 किलो मीठ पाच किलो तिखट 9 किलो व इतर जीवनावश्यक वस्तू आज फलटण मुलांचे वसतिगृह येथे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी श्री उबाळे,आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे,ऍड.सुजित निकाळजे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव तानाजी गिते,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड,समाजकल्याण निरीक्षक श्री आढाव,दलित पँथर चे अध्यक्ष मंगेश आवळे,पीडित कुटुंबास सर्वतोपरी कायदेशीर मदत करणारे ऍड.सुजित निकाळजे,नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे,उपळवे गावचे प्रतिष्ठित व्यावसायिक बापूराव जक्ताप,रोहित साळे यांच्या उपस्थितीत अहिवळे कुटुंबास तीन महिने पुरेल एवढे अन्न-धान्य व जीवनावश्यक वस्तू पुरवल्या लोकप्रिय नेते वैभव गिते यांनी प्रास्ताविक करीत शासनाचे व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी श्री उबाळे साहेब व निरीक्षक हेळकर साहेब यांचे आभार मानले.
.फलटण वसतिगृह अधिक्षक श्री कांबळे यांनी चोख व्यवस्था केली होती.

महाराष्ट्र सेना चित्रपट आघाडीच्या मराठवाडा महिला उपाध्यक्ष पदि अभिनेत्री कांचन शिरभे ची नियुक्ती


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क जालनायेथील प्रसिद्ध सिनेअभिनेत्री कांचन शिरभे यांची महाराष्ट्र सेना चित्रपट आघाडीच्या महिला मराठवाडा उपाध्यक्ष पदि नियुक्ती करण्यात आली.
कांचन शिरभे यांना नियुक्तीचे पत्र संस्थापक अध्यक्ष लोकनेते राजुभाई साबळे यांच्या हास्ते व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अँड.अविनाश थिट्टे,प्रदेश महासचिव प्रदिप इंगोले,चित्रपट आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा चित्रपट दिग्दर्शक गोरख भारसाखळे, नृत्य विभागाचे प्रदेश अध्यक्ष टि.श्यामसुंदर, प्रदेश कार्याध्यक्ष राहूल गाडेकर यांच्या प्रमुख उपस्थीत देण्यात आले.
या वेळी संस्थापक अध्यक्ष लोकनेते राजूभाई साबळे यांनी आपल्या भाषनात सांगीतले की, सध्या महाराष्ट्रातला कलाकार सुरक्षीत नाही तसेच कलाकारांना कोणीही वाली नाही,कलाकारांचा फक्त वापर करणे चालू आहे, हे कोठेतरी थांबले पाहिजे म्हणून चित्रपट आघाडीच्या माध्यमातून सिने कलाकारांना संघटीत करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणार आसल्याचे ते बोलत होते.
या कार्यक्रमास मराठवाडा अध्यक्ष महेंद्र भारसाखळे, मराठवाडा उपाध्यक्ष नितीन पगारे, जिल्हाध्यक्ष सुरेश कांबळे,जालना जिल्हाध्यक्ष गौतम शेळके,महिला जिल्हा प्रमुख कल्पना जमधडे,शहर अध्यक्ष गणेश साळवे,महिला जिल्हा सचिव पुनम चाटसे, शहर अध्यक्ष भगवान सुर्यवंशी,महिला शहर अध्यक्ष योगीता वाघ,गणेश भालेकर यांच्या सह अदि पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
या वेळी अभिनेत्री कांचन शिरभे यांना नियुक्ती बद्दल व वाढदिवसा निमीत्त शुभेच्छांचा वर्षाव केला.

महाराष्ट्र सेना चित्रपट आघाडीच्या मराठवाडा महिला उपाध्यक्ष पदि अभिनेत्री कांचन शिरभे ची नियुक्ती

रयत शिक्षण संस्था सातारा संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधी पवार साहेबांच्या हस्ते देणगी

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –कोरोना या जागतिक महामारीने ओढवलेल्या महाराष्ट्र शासनाच्या  तिजोरीवर बोजा पडला आहे  तसेच आर्थिक संकट संकटाचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या मदतीच्या आवाहनानुसार रयत शिक्षण संस्था सातारा, या संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणगी म्हणून देण्याचा निर्णय घेतला. 
सर्व कर्मचाऱ्यांच्या एक दिवसीय वेतनाची जमा रक्कम रुपये २,७५,९२,८२१/- (रुपये दोन कोटी पंचाहत्तर लाख, ब्याण्णव हजार आठशे एकवीस) इतकी रक्कम चा धनादेश संस्थेचा अध्यक्ष या नात्याने माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केली. यामुळे जनसामान्य माणसांमध्ये पवार साहेबांच्या कर्तृत्वाचे कौतुक होत आहे.

रयत शिक्षण संस्था सातारा संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधी पवार साहेबांच्या हस्ते देणगी देण्यात आले धनादेश स्वीकारताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
होलसेल व योग्य दरात कपडे मिळण्याचे एकमेव ठिकाण आर्यन सिलेक्शन नातेपुते एक वेळ अवश्य भेट द्या

लग्नाच्या भांड्यासाठी विश्वसनीय ठिकाण महेश भांडी केंद्र अँड स्टील फर्निचर, होलसेल व योग्य दरात भांडी, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळणारे ठिकाण महेश भांडी केंद्र नातेपुते

शाळा बंद असली तरी शिक्षण मिळेल घरोघरी’ ने वाचू लागली पाहिलीची मुले

शाळा बंद असली तरी शिक्षण मिळेल घरोघरी’ ने वाचू लागली पाहिलीची मुले

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क दहिवडीकोरोना या महामारीमुळे सध्या सर्व शाळा बंद आहेत . त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले . यावर उपाय म्हणून शासनाने ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे ठरवले . त्यानुसार अनेक शिक्षकांनी सुरुवातही केली . परंतु लहान वयातील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना मात्र ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा येत होत्या विशेष करून पहिली चा नवख्या विद्याथ्यांची फारच अडचण येत होती . यावर उपाय म्हणून जि.प. प्राथ.शाळा वडगांव येथील उपक्रमशील शिक्षक श्री.संजय खरात यांनी एक आगळावेगळा उपक्रम शाळा बंद असली तरी शिक्षण मिळेल घरोघरी या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षणाची गंगा पोहोचवली. यात प्रत्येक विद्यार्थी केंद्रभूत मानून स्वतः तयार केलेल्या वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्यासह इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांच्या घरी जवळपास 1200 भेटी दिल्या . त्यासाठी त्यांनी विद्यार्थीनिहाय व घटकनिहाय स्वतः नियोजन करून प्रत्येक घटकासाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती केली. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र शैक्षणिक साहित्य संच दिला. विविध शैक्षणिक शैक्षणिक साहित्याद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे पालकांच्या सहकार्यातून कृतीयुक्त शिक्षणाचा सराव दिला. त्यामुळे अक्षर ओळख ते उतारा वाचन पर्यंतचे सर्व टप्पे विद्यार्थ्यांनी पार केले आहेत.कोरोना काळात पाहिलीतली मुले कशी शिकणार हा प्रश्न भेडसावल्याने हा उपक्रम राबविला असल्याचे खरात गुरुजी यांनी सांगितले. जून2020 महिल्यापासून राबविलेल्या या उपक्रमामुळे पहिलीतील नवखी व प्रथमच शाळेत दाखन झालेली मुले अक्षर वाचन, शब्दवाचन,वाक्य तसेच उतारा वाचन , गणितील संख्या ओळख , गणिती क्रिया याबरोबरच भाषिक व गणिती खेळातही पारंगत झाले. आहेत . खरात गुरुजींच्या या उपक्रमाबद्दल पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे .
आपल्या या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी सौ.सोनालो विभुते केंद्रप्रमुख श्री नारायण आवळे शाळा व्यवस्थापन समिति सहकारी शिक्षक श्री मोटे सर व राऊत मॅडम तसेच पालकांचे मुलाचे सहकार्य मिळाल्याचे खरात सरांनी आवर्जून सांगितले .
गटशिक्षणाधिकारी विभुते मॅडम यांनी घरी येवून माझ्या मुलीच्या अभ्यासातील प्रगती पाहून शाबासकी दिली. मुलीशी गप्पागोष्टी करून तिला मार्गदर्शन केले. सौ. निलम ओंबासे
खरात सर आम्हाला घरी येवून शिकवतात त्यांनी आम्हाला लिहायला वाचायला साहित्य दिले आहे. आम्ही चांगला अभ्यास केल्यावर सर आम्हाला शाबासकी देतात. बक्षीस देतात. त्यामुळे आम्हाला वाचन करायला आवडू लागले आहे…………….. रिद्धी व सिद्धी नागरगोजे…. इयत्ता पहिली
कोरोना काळात शाळा बंद असताना शाळेचे मुख्याध्यापक खरात सर यांनी घरी येवून मुलांना साहित्याचा वापर करून त्यांचा अभ्यास घेतला. त्यामुळे सुरुवातीला मुळाक्षरेही न येणारी माझी मुलगी गोष्टीची पुस्तकेही वाचू लागली आहे. माझी मुलगी संख्या वाचते व बेरीज वजाबाकीही करते. श्री. अविनाश नागरगोजे
….. पालक

अकलूज उपजिल्हा रुग्णालयात पालकमंत्री भरणे मामा यांच्या प्रयत्नातून महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू – अजय सकट


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे
जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या प्रयत्नातून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोलापूर जिल्ह्यात 3 ठिकाणी महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केल्या आहेत त्याचप्रमाणे माळशिरस तालुक्यातील अकलूज उपजिल्हा रुग्णालयात ही योजना सुरू केली असल्याची माहिती पंचायत समितीचे सदस्य अजय सकट यांनी दिली
माळशिरस तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज व नातेपुते येथे महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू करण्याबाबत पंचायत समितीचे सदस्य अजय सकट व रणजितसिह जाधव यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (मामा)यांची भेट घेऊन मागणी केली होती व त्यासाठी ते सतत पाठपुरावा करीत होते तसेच अजय सकट हे गेल्या दोन वर्षांपासून आरोग्य विभागाच्या अडचणी सोडवत आहेत तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू करावी म्हणून ते सतत प्रयत्नशील होते तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख व आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता कोव्हीड परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अनेक आरोग्य विभागाचे प्रश्न मार्गी लावले आहेत असाच चांगला निर्णय ही योजना राज्यभर शासकीय रुग्णालयात राबवून सर्वसामान्य लोकांना आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या असून या योजनेत गरीब व गरजू रुग्णांना फायदा होणार असल्याचे अजय सकट यांनी सांगितले

पालकमंत्री दत्ता मामा भरणे
पंचायत समिती सदस्य अजय सकट

अंगणवाडी सेविकांना एकशे तेहत्तीस कोटी बावीस लाख रुपये मंजूर

लोकप्रिय नेते वैभवजी गिते साहेबांच्या पाठपुराव्याला यश

महिला व बालविकास विभागाच्या दिनांक 5 नोव्हेंबर 2020 च्या शासननिर्णयाद्वारे मान्यता

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –कोरोना कोविड 19 या विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आंगणवाडी सेविका/मदतनीस/मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन अदा करण्यासाठी निधी वितरित केला नसल्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांच्याकडे शासनाकडून निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती केली होती.आंगणवाडीत शिकणारी मुले ही गरीब व बहुजन वर्गातील असतात शिवाय त्यांच्यासाठी कार्यरत असलेल्या सेविकांना,मदतनीसांना खूपच तुटपुंज्या मानधनावर नाईलाजाने काम करावे लागते ही गंभीर बाब लक्षात घेऊन
लोकप्रिय नेते वैभवजी गिते यांनी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके,राज्य समन्वयक रमाताई अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाइंजे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला.अखेर महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने दिनांक 5 नोव्हेंबर 2020 रोजी च्या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला 13322.00 लक्ष (एकशे तेत्तीस कोटी बावीस लाख रुपये इतका निधी वितरीत करण्याबाबत मान्यता दिली आहे
सदरच्या शासन निर्णयात आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना,नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते. केंद्र शासनाकडून विहित कालावधी निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन आधार करणे शक्य व्हावे, याकरिता अपर मुख्य सचिव (वित्त)यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य प्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागात अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्याआधारे हा शासननिर्णय काढण्यात आला आहे.त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.लोकप्रिय नेते वैभव गिते यांनी शासनाचे आभार मानले आहेत.

*आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य शाखा शिवपुरी येथे संपर्क कार्यालयाचे उदघाटन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे –आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक  क्रांती संघटना शाखा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन  शिवपुरी येथे करण्यात आले तसेच संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.लखनभाऊ चव्हाण यांचा अभिष्टचिंतन सोहळा व ऑफिस चे उदघाटन एकशिव चे जेष्ठ नेते श्री.शहाजीदादा धायगुडे व संजयभाऊ चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले व माळशिरास पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री.किशोरभैय्या सूळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजयभाऊ चव्हाण,शाहुजीनाना मदने,जिल्हा अध्यक्ष उमाजी बोडरे,इंदापूर तालुका अध्यक्ष सत्यजित उर्फ लालाभाऊ चव्हाण,नातेपुतेचे युवा उधोजक रवी बोडरे,मा.उपसरपंच गुणवंत आबा पाटील व सुरेश जाधव ग्रा.पंचायत सदस्य अय्याज मुलाणी,दशरथ जाधव,इंदापूर कार्याध्यक्ष विजय चव्हाण,सभापती सुग्रीव मोठे,सोमनाथ थोरात,शंकर अवघडे,गणेश नामदास, गणपत रुपणवर,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीकेश वरूडे,राहुल सरगर,महेश कांबळे,वाहिद मुलाणी,सुमित चँकेश्वरा,किरण खरात,प्रतीक वरूडे,विठ्ठल कुचेकर,आसिफ मुलाणी,कुलदीप खांडेकर,अनिस मुलाणी,लखन वाघमारे,समीर माने,चैत्यन खताळ, प्रतीक जाणकार,निखिल जानकर, उदय गावडे,तुषार जानकर,व कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकेश वरूडे यांनी केले व संघटनेच्या माध्यमातून व शहाजीदादा धायगुडे यांच्या विचारातून आम्ही फक्त जनसामान्य लोकांच्या अडी अडचनी सोडवण्यासाठी गरजवंताची सेवा करण्याचे काम व सामाजिक कार्य या संघटनेच्या वतीने करीत आहोत. यापुढे कोणत्याही गरीब गरजूनसाठी आम्ही व माझा सर्व मित्र परिवार आपल्या सेवेत कायम असणार आहे कधी हि कोणत्याही अडचणी साठी आवश्य भेटा तांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न  करणारच असे  लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था माळशिरस तालुका व संघटनेचे उपाध्यक्ष श्रीकेश वरूडे यांनी सांगितले.

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य शाखा शिवपुरी येथे संपर्क कार्यालयाचे उदघाटन

You may have missed