प्रमोद शिंदे

बेकायदा पाणी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सहायक आयुक्तांचा आडता हात. भाजपच्या अशोक शेळके यांचा गंभीर आरोप


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –नालासोपारा, बुधवार दिनांक २८ ऑक्टोबर, २०२० :- वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती – ब चे सहायक आयुक्त पंकज भुसे यांच्याकडून अनधिकृतपणे पाणी विक्री करणाऱ्या बोगस कंपन्यांवर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या अशोक शेळके यांनी केला आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना आरोग्यास अपायकारक आणि अशुद्ध पाणी विक्री करणाऱ्या बोगस प्लांट चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून बेकायदेशीपणे चालविण्यात येत असलेले गोरखधंदे सीलबंद करण्याचे आदेश राज्य शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त गंगाधरन देवराजन यांनी कठोर कारवाईचा बडगा उचलला. आतापर्यंत अनेक ठिकाणी कारवाई सुरु झाली काही ठिकाणी गुन्हे दाखल होऊन बोगस प्लांट सील करण्यात आले. मात्र प्रभाग समिती – बी चे सहाय्यक आयुक्त पंकज भुसे यांच्याकडून कारवाई करण्यास हेतुपुरस्सर दिरंगाई होत असल्याची बाब अशोक शेळके यांनी समोर आणली आहे.
प्रभाग समिती – ब मध्ये एकूण ६० बोगस प्लांट आढळून आले. दिनांक १२ ऑक्टोबर रोजी ३ प्लांट वर तर दिनांक १३ ऑक्टोबर रोजी १५ बोगस प्लांट असे ६० पैकी केवळ १८ बेकायदा प्लांट सील करण्यात आले. उर्वरित ४२ प्लांट वरील कारवाई चे पुढे काय झाले असा सवाल अशोक शेळके यांनी केला आहे. १३ तारखेनंतर आज ऑक्टोबर महिना संपत आला असताना पुढे एकही बेकायदा प्लांट वर कारवाही का झाली नाही, सदरची कारवाई न करण्यामागे सहाय्यक आयुक्तांचा नेमका हेतू काय आहे असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतात.
याप्रकरणी आयुक्त महोदयांनी व्यक्तिशः लक्ष घालावे अन्यथा कारवाईस होत असलेल्या दिरंगाईबद्दल राज्य शासनाकडे पुन्हा तक्रार करावी लागेल असा इशारा अशोक शेळके यांनी दिला आहे.

भुजबळ साहेब यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार च्या युवकमित्र परिवारास 73 महापुरुषांचे ग्रंथ भेट

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्कपुणे-फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन तर्फे महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा नागरी व संरक्षण मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चे अध्यक्ष मा.नामदार छगन भुजबळसाहेब यांच्या 73 व्या(निर्भय दिन व वाचन दिन) वाढदिवसानिमित भारतीय संविधान , शेकऱ्याचा आसूड , सम्राट बळीराजा,गौतम बुद्ध,जिजाऊ मांसाहेब , छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,छत्रपती शाहु महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे ते काकासाहेब गाडगीळ,बहुजनांचे कैवारी छगन भुजबळ व इतर महापुरुषांचे जीवनावरील तसेच सामाजिक ,स्त्री, पुरुष समानता विषयाचे 15000रुपयांचे एकूण 73 ग्रंथ नंदुरबार च्या युवकमित्र परिवारास ग्रामीण व दुर्गम भागात वाचन चळवळ गाव तेथे ग्रंथालय मोहीम यशस्वी राबविण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण महाजन ,जिल्हा परिषद, बांधकाम विभाग,पुणे चे कर्मचारी यांना विजयादशमी दिनी म्हणजे दि.25 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 2 वाजता बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र, राजयोग प्लाझा , धायरी ,पुणे येथे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते भेट देण्यात आले.
या प्रसंगी सुरवातीला थोरसमाजसुधारक महात्मा फुले व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास सत्यशोधिका आशा व सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर प्रवीण महाजन यांचे हस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले.यावेळी प्रवीण महाजन म्हणाले की ग्रामीण व दुर्गम भागात समाजपरिवर्तनासाठी प्रत्येक गावी ग्रंथालय असणे जरुरीचे आहे म्हणून आमचे संस्थेच्या माध्यमातून वाचनीय ग्रंथ, पुस्तके गोळा करून गावोगावी मोफत वाचनालय चालू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. याबाबतीत पुणेकर मंडळीनी खूप मदत केली असून कृतिशील ग्रंथ मित्र व ग्रंथपाल प्रसाद भडसावळे यांनी मोठी मदत केल्याचे आवर्जून सांगितले आणि आता सत्यशोधक मित्र रघुनाथ ढोक यांनी आजच्या दसरादिनी भुजबळ साहेबांनचे वाढदिवसानिमित्त महत्त्वपूर्ण 73 ग्रंथ भेट देऊन आमचे संस्थेच्या कार्याची दखल घेतली त्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी रघुनाथ ढोक म्हणाले की भुजबळ साहेब यांचे 71 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने हरियाणा, कुरुक्षेत्र येथील सावित्री जोतिबा ग्रंथालयास 71 ग्रंथ व महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे 3 पुटी अर्धं पुतळे तिकडे जाऊन 2 वर्षांपूर्वी 10 नोव्हेंबर 2018 रोजी भेट दिले होते आणि आज वाचन चळवळी साठी 73 ग्रंथ भेट दिले. पुढे ढोक असे ही म्हणाले की नुकतेच एप्रिल ,मे,जून महिन्यात देशात व परदेशात कोरोना चा धुमाकूळ चालला असताना या महापुरुषांचे ग्रंथानेच भारतीयांचे मनोबल वाढविले हे देखील विसरून चालणार नाही. ग्रामीण व दुर्गम भागातील मुलांचे व समाजाचे चांगल्या वाचनाने ज्ञान ,मनोधर्य , शिक्षणाची आवड कायम निर्माण व्हावी म्हणून युवकमित्र परिवारास ग्रंथ भेट देऊन गावोगावी वाचन संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य करावे असे आवाहन देखील यावेळी केले.
कार्यक्रमाचे शेवटी महात्मा फुले रचित सत्याचा अखंड आशा ढोक यांनी म्हंटला तर ग्रंथ भेटीचे नियोजन आकाश ढोक व आभारप्रदर्शन क्षितिज ढोक यांनी मानले तर मोलाचे सहकार्य राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे लाभले.

माळशिरस येथे लहुजी शक्ती सेनेची आढावा बैठक संपन्न

माळशिरस येथे लहुजी शक्ती सेनेची आढावा बैठक संपन्न

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – माळशिरस येथे श्री संत सावता माळी मंगल कार्यालय माळशिरस येथे लहुजी शक्ती सेनेची आढावा बैठक संस्थापक अध्यक्ष मा श्री विष्णू भाऊ कसबे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली या बैठकीमध्ये मातंग समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली त्याच बरोबर साहित्यरत्न लोकशाहीर डाॅ आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे 1 नोव्हेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत महाराष्ट्रातील सर्व आमदार,खासदार असतील यांच्या घरावर मोर्चे,आंदोलने लाक्षणिक उपोषणे, करण्यात येतील असे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे यांनी बोलताना सांगितले या कार्यक्रमासाठी उपस्थित लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे,उस्मानाबाद पंचायत समिती माजी सभापती शिवाजी भाऊ गायकवाड,सोलापूर जिल्हा अध्यक्ष महादेव भाऊ तुपसौंदर,सोलापूर जिल्हा कोर कमिटी अध्यक्ष बाळासाहेब सपताळे,सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष सागर भाऊ लोखंडे, युवा नेते सतीश भाऊ सपकाळ सचिव जयवंत भाऊ सपकाळ,इंदापूर तालुका अध्यक्ष दत्ता भाऊ जगताप, तालुका कार्याध्यक्ष राहुल भाऊ रणदिवे ता. अध्यक्ष नंदुभाऊ लांडगे ता. उपाध्यक्ष अजितभाऊ खुडे तसेच सोलापूर जिल्हा पश्चिम भागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर जिल्ह्यातून आलेले सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी माळशिरस तालुक्या सह इतर तालुक्यातील कार्यकर्त्यांची वेगवेगळ्या पदावर ती नियुक्ती प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या हस्ते व संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली.

मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती उपाध्यक्षपदी शाहिद भाई मुलांणी तर प्रवक्ते पदी बशीरभाई काझी यांची निवड

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क (प्रमोद शिंदे)अल्पावधीतच सर्वत्र मुस्लिमांच्या हक्कासाठी व आरक्षणासाठी झगडणारी उदयास येणारी संघटना आहे अल्पावधीतच या संघटनेचे महाराष्ट्रभर कार्यकर्ते व पदाधिकारी निर्माण झाले आहेत तसेच नातेपुते विभागातून शाहिद भाई मुलानी यांची कोर कमिटी उपाध्यक्षपदी तर बशीर भाई काझी यांची प्रदेश प्रवक्ते पदी मुस्लिम आरक्षण  संघर्ष समितीचे अध्यक्ष रशीद  भाई शेख  यांच्यावतीने नुकतीच निवड करण्यात आली आहे. याबाबत मीडिया प्रमुख सलमान शेख यांनी माहिती दिली. तसेच शाहीद भाई व बशीर भाई यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने रासप सरचिटणीस नितीन दादा धायगुडे व तालुकाध्यक्ष माऊली सरक यांच्या उपस्थितीत दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनेल चे संपादक प्रमोद शिंदे,बाबा बोडरे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती उपाध्यक्षपदी शाहिद भाई मुलांणी तर प्रवक्ते पदी बशीरभाई काझी यांची निवड झाल्याबद्दल रासपच्या वतीने सत्कार करण्यात आला

केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांना बँड व्यावसायिकांसाठी आर पी आयचे ‌निवेदन

केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांना बँड व्यावसायिकांसाठी आर पी आयचे ‌निवेदन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्ककोरोना संसर्गा मुळे आपल्या देशा मध्ये २२ मार्च २०२० पासुन ला
लाकडाऊन करण्यात आले आहे.

त्यामुळे बँड वादक व वाजंत्री व्यवसाय करणाऱ्या लोकांनचे व्यवसाय गेली ७ महिने झाले बंद आहेत आज त्याच्या वर उपास मारीची वेळ आली आहे तसेच रोजगार नसल्या मुळे‌ त्यांचे हाल‌‌‌ होत आहेत. सध्या नवरात्र तसेच इतर कार्यक्रम‌ होत आहेत़ इतर गोष्टी ना शासनाने परवानगी दिली असताना जास्त करून होलार व डोंबारी समाजातील बॅन्ड व्यावसायिक माळशिरस तालुक्यात आहेत या बँड व्यावसायिकांन वर मात्र अन्याय होत नाही ना अशी भावना बँड व्यावसायिकांची झाली आहे.

तरी बँड वादन व्यावसाय सुरु करण्यात यावा अशी मागणी आज केंन्द्रीय सामायिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांच्या कडे आर पी आय शाखा मांडवे यांच्या वतीने करण्यात आली.

यावेळी माळशिरस  तालुक्यातील  आर पी आय चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

होलार समाजातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस पाठीशी घालणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी फलटन यांच्याकडून तपास काढून घ्या…..निवृत्ती रोकडे

जिल्हाधिकारी सातारा यांना एन.डी.एम.जे संघटनेचे निवेदन सादर

मुख्यमंत्र्यांच्या बांद्रा येथील मातोश्री निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सातारा प्रतिनिधी
राज्यात बौद्ध,मातंग,होलार व अनुसूचित जाती-जमातींच्यावर अन्याय अत्याचार वाढले असून शासनाची दलित विरोधी भूमिका व प्रशासनाची कचखाऊ अनास्था दिसून येत आहे.मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते मंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात येत आहेत परंतु दलित हत्या व दलित आदिवासींच्यावर सातत्याने वाढत असणारा अन्याय अत्याचार याबाबत मात्र भ्र शब्द काढायला तयार नाहीत मौजे उपळवे ता.फलटण जी.सातारा येथील अनुसूचित जातीच्या होलार समाजातील अक्षदा देविदास अहिवळे या अल्पवयीन मुलीची बेपत्ता झाल्याबाबत फलटन ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये लक्ष्मी देविदास अहिवळे यांनी दिनांक 5/10/2020 रोजी दाखल होती
दिनांक 8/10/2020 रोजी उपळवे गावापासून लांब 5 किलोमीटर अंतरावर विहिरीत मृतदेह सापडला दिनांक 11/10/2020 रोजी मयत मुलीच्या शेजारी राहणारा आंबदास किसन कवीतके या नाराधमास आरोपीस अटक करून भा.द.वि.305,506,अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1)r, 3(2)5 ही कलमे लावून मे.विशेष न्यायालयात अहवाल पाठवला आहे.
सध्या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण हे करीत आहेत.
मयत मुलीची आई लक्ष्मी देविदास अहिवळे या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करताना माझ्या मुलीची हत्या झाली आहे.असे सांगत असताना सुद्धा पोलिसांनी जाणून बुजून आत्महत्येची कलमे लावली आहेत.असा आरोप पीडित कुटुंबास भेटायला जाणाऱ्या संस्था संघटनांना व विविध पक्षांच्या नेत्यांना आणि प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले.
तात्काळ फिर्यादी लक्ष्मी देविदास अहिवळे मयताची थोरली बहीण यांचा फेर जबाब,पुरवणी जबाब,घेण्यात यावा.
निव्वळ आरोपीच्या व त्याच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून हत्येचा गुन्हा दाखल न करता आत्महत्यानुसार गुन्हा दाखल करणे हे न्यायोचित वाटत नाही.
उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्याकडून तपास काढून घेऊन इतर कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तपास देण्यात यावा.
मा.पोलीस अधीक्षक ना.ह.सं. कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबाचे म्हणणे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून अहवाल विशेष पोलिस महानिरीक्षक ना.ह.सं यांच्याकडे पाठवावा.
मा.अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय यांच्या 9/9/2020 च्या परिपत्रकानुसार आरोपी व इतर साक्षीदार लाय डिटेक्टर, पॉलिग्राफ,ब्रेन मॅपिंग,नार्को Analysis चिकित्सा करून गुन्ह्यातील सत्य परिस्थिती बाहेर काढावी.
परिस्थितीजन्य पुरावे योग्य पध्दतीने घेऊन तपासणीसाठी पाठवावे.
मे.विशेष न्यायालयात दोषारोपत्र पाठवण्यापूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक ना.ह.सं कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांच्याकडे तपासणीसाठी पाठवावे त्यांनी सांगितलेल्या त्रुटींची पूर्तता करूनच दोषारोपपत्र मे.विशेष न्यायालयात पाठवावे.
संवेदनशील खटले चालवण्याचा अनुभव असलेल्या वरिष्ठ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी
सदरचा विषय व निवेदन मा.जिल्हाधिकारी महोदयांच्या अंतर्गत होणाऱ्या आगामी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या मासिक बैठकीत ठेवून जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करावी.
अन्यथा नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस च्या वतीने मुख्यमंत्री महोदयांच्या मातोश्री या निवासस्थाना समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याची माहिती सातारा जिल्हाध्यक्ष निवृत्ती तात्या रोकडे यांनी दिली आहे.वरील मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सातारा व साहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी सातारा यांना नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस यांच्या वतीने देण्यात आले आहे निवेदनावर एन.डी.एम.जे राज्य सचिव वैभव तानाजी गिते,जिल्हाध्यक्ष निवृत्ती तात्या रोकडे,विधी सल्लागार ऍड. हौसेराव धुमाळ ऍड.दयानंद माने यांच्या सह्या आहेत.

प्रगतीचा निधी वळवला जात असल्याने हिवाळी अधिवेशनात बजेटचा कायदा करा माजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एन.डी.एम.जे संघटनेची जोरदार मागणी

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देताना राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, विकास दादा धइंजे, वैभवजी गीते,

प्रगतीचा निधी वळवला जात असल्याने हिवाळी अधिवेशनात बजेटचा कायदा

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एन.डी.एम.जे संघटनेची जोरदार मागणी

मागण्या मारती कार्यवाही करण्याची सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे आश्वासन

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क – मागीगल काही दिवसात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा अखर्चित निधी इतरत्र वळवला जात असल्याने महाविकास आघाडीच्या सरकार विरोधात मागासवर्गीय जनतेमध्ये प्रचंड चीड व आक्रोश असल्याचे जाणवत असतानाच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे सोलापूर दौऱ्यावर येताच त्यांना पुरोगामी संघटनांच्या रोषास व रोगास सामोरे जावे लागले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा बौद्ध, दलित आदिवासिंच्या प्रगतीचा निधी सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामीण विकास विभाग या विभागाकडे वळवला असल्याचे लोकप्रिय नेते वैभव गिते यांनी धनंजय मुंडे यांना पुराव्यानिशी दाखवुन दिले.
आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते,माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास (दादा) धाइंजे यांचे नेतृत्वाखाली नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव लोकप्रिय नेते वैभव गिते, राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे,संभाजी साळे यांच्या शिष्टमंडळाने धनंजय मुंडे यांची माळीनगर शासकीय विश्रामगृह येथे रात्री 11 वाजता भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले.
निवेदनातील प्रमुख मागण्या
1)बौद्ध अनुसूचित जाती,जमातींच्या हक्काचा निधी इतर विभागांकडे वळवू नये अखर्चित ठेवू नये म्हणून येत्या हिवाळी अधिवेशनात बजेटचा कायदा मंजूर करावा
2)अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत खून,बलात्कार,जाळपोळ,सामुदायिक हल्ला झालेल्या पीडितांना अनुदान देण्यासाठी 72 कोटी रुपये तरतूद वितरित करावी
3)मिनी ट्रॅक्टरच्या योजनेसाठी 62 कोटी रुपये तरतूद वितरित करावी
4)दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत बदल करून बागायती एकरी जमिनीसाठी 20 लाख रुपये तर जिरायतीसाठी 15 लाख रुपये तरतूद करावी.
5)मुख्यमंत्री महोदयांच्या अंतर्गत राज्यस्तरीय उच्चाधिकार व दक्षता नियंत्रण समितीची स्थापना करावी.
6)बौद्ध,अनुसूचित जातीच्या नागरिकांनी मुद्रा योजनेअंतर्गत घेतलेले कर्ज माफ करण्यात यावे.
7)महाराष्ट्रातील जातीय अत्याचारात खून झालेल्या कुटुंबांचे शासकीय नोकरी,जमीन,पेंशन देऊन पुनर्वसन करावे.यासाठी आकस्मिकता योजना लागू करावी.
8)खर्डा जि.अहमदनगर येथील नितीन आगे खून खटल्यातील फिर्यादी राजू आगे यांना खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत पोलीस संरक्षण द्यावे.
9)शिर्डी जि.अहमदनगर सागर शेजवळ हत्या प्रकरणी आरोपींचा पॅरोल रद्द करावा.इत्यादी मागण्यांसाठी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे)संघटना आक्रमक होती.सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंडे यांनी त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी धनंजय मुंडे यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते चांदापुरी साखर कारखाना चेअरमन उत्तमराव जानकर
यावेळी आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे, उपस्थित होते एन.डी.एम.जे राज्य सचिव वैभव गिते यांनी निवेदन दिले, यावेळी पंचायत समिती सदस्य अजय, राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे,अभिमान जक्ताप,शिवसेनेचे नेते बाबासाहेब बंडगर,पश्चिम महाराष्ट्र सचिव बाबासाहेब सोनवणे,सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष भगवान भोसले, तालुका उपाध्यक्ष संभाजी साळे उपस्थित होते.

श्रीपूर येथील नियोजित बुद्ध विहार परिसरात विकासदादाधाईंजे यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त श्रीपूर येथील नियोजित बुद्ध विहार येथे बोधी वृक्षारोपण करताना विकास दादा धाईंजे व श्रीपूर येथील चळवळीतील कार्यकर्ते


पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

धम्मचक्रपरिवर्तन दिनाचे औचित्य साधुन श्रीपूर येथील जगदिशनगर  येथील नियोजित बौध्द विहाराच्या जागेत आंबेडकरी चळवळीचे नेते  विकास दादाधाईंजे यांच्या हस्ते बोधीवृक्षाचे वृक्षारोपण  करण्यात आले. या नियोजित  जागेत श्रीपूर येथील  कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रशस्त असे नागपूर दीक्षाभूमी किंवा चैत्यभूमी प्रतिकृती सारखे बुद्ध विहार बांधण्यात येणार आहे यासंदर्भात समिती अध्यक्ष व सदस्य यांच्यावतीने सांगण्यात आले.यावेळी आंबेडकरी चळवळीचे नेते विकास दादा विकास दादा धाईंजे, पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चैनल चे संपादक प्रमोद शिंदे, कार्यकारी संपादक प्रशांत खरात, मा.रतनसिंह(आप्पा) रजपुत,संदिप घाडगे वंचित बहुजन आघाडी संघटक,सागरदादा उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बौध्दविहार समिती अध्यक्ष -कल्याण लांडगे,उपाध्यक्ष -बाळासाहेब भोसले, सचिव- तेजस बाबर, खजिनदार-नवनाथ ताकतोडे ,नागेश चंदनशिवे,बालाजी ताकतोडे,कुमार ताकतोडे,गणेश चांदणे,नागेश साळुंखे गोविंद सावंत ,राहुल बाबर यांनी परिश्रम घेतले. 

उपळवे ता.फलटण दलित मुलीच्या हत्या प्रकरणात फलटण पोलिसांचा संशयास्पद तपास – अहिवळे कुटुंबाचा आरोप

उपळवे ता.फलटण दलित मुलीच्या हत्या प्रकरणात फलटण पोलिसांचा संशयास्पद तपास – अहिवळे कुटुंबाचा आरोप

_घटनास्थळी एन.डी.एम.जे टीमसह समाजकल्याण अधिकाऱ्यांची भेट

आरोपींची आधुनिक पद्धतीने नार्को,पॉलिग्राम लाय डिटेक्ट चाचण्या केल्यास सत्य पुढे येईल………….वैभव गिते**

उपळवे ता.फलटण दलित मुलीच्या हत्या प्रकरणात फलटण पोलिसांचा संशयास्पद तपास – अहिवळे कुटुंबाचा आरोप

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी – ता. १७

            देशभरात नवरात्रीच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचे पूजन केले जात असताना फलटण तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी राक्षसवृत्तीच्या माणसांच्या कचाट्यात सापडली आहे.  3 ऑक्टोबर रोजी ही मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आई वडिलांनी मोठी अपेक्षा बाळगून फलटण पोलीस स्टेशन गाठले, पण पोलिसांनी त्यांची तक्रार घेण्याऐवजी उलट, 'तुमच्याच मुलींमध्ये काहीतरी दोष असेल' असं सांगितलं.बेपत्ता मुलीचा तपास करायचा तर दूरच पण स्थानिक पोलिसांनी त्यांची तक्रार सुद्धा त्वरित घेतली नाही.

सुमारे पाच ते सहा दिवसांनी म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी संबंधित मुलीचा मृतदेह गावाजवळील एका विहिरीत सापडला. मृतदेहाची अवस्था संशयास्पद होती,त्या मुलीच्या कमरेला दगड बांधले होते, तरीही स्थानिक पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा शिक्का ठोकला,आणि हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. कारण, संशयित आरोपी हा सवर्ण समाजातील तर पीडित मुलगी ही अनुसूचित जातीतील हिंदू होलार समाजातील आहे.उपाळवे ता.फलटण या गावात होलार समाजाचे एकच घर आहे. म्हणजे युपीच्या हाथरस ची पुनवृत्ती इथेही झाली, इथेही जातीचे राजकारण करण्यात आले.
पीडित कुटुंबाने वारंवार विनंती करूनही एफआयआर ची कॉपी आणि पोस्टमॉर्टम ची कॉपी दिली नाही. शिवाय पीडित कुटुंबानी वारंवार सांगून सुद्धा संशयित आरोपीवर हत्ये ची कलमे लावली नाहीत.पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे 305 हे कलम लावलेले आहेत.मुलगी होलार समाजातील असल्याने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नियम 1995 संशोधित अधिनीयम 2015 मधील कलम 3 (1)r, व 3 (2)v नुसार कलमे लावली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीकारी फलटण हे करीत आहेत.पोलीस तपासाला खुप विलंब लावत आहेत
या सर्व हालचालीवरून पोलिसांचे तपासाचे कामकाज संथ व संशयास्पद वाटत आहे.
पीडित कुटुंबाने सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात अनेक गंभीर आरोप केले आहेत.यामध्ये हत्या करणारा व्यक्ती एकटा नसून त्याचे सोबती पण या हत्येत सामील आहेत,
त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करावा. पण पीडित कुटुंब मागासवर्गीय असल्याने पोलिसांकडून तपासात कसूर होत आहे,त्यामुळे या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक सामाजिक संघटना पुढे आल्या आहेत, आज नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गीते यांनी ही गंभीर बाब सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी यांच्याशी फोनवरून चर्चा केली असता दोन तासात समाजकल्याण अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले.वैभव गिते यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक (ग्रामीन)सातारा यांच्याकडे आरोपीची लाय डिटेक्टिव्ह चाचणी, नार्को टेस्ट, पॉलिग्राम चाचणी या प्रकारच्या चाचण्या आधुनिक पद्धतीने करून ही आत्माहत्या न्हवे तर हत्या आहे याचे पुरावे गोळा करावे या मुख्य मागणी सह पीडित कुटुंबाचे सामाजिक आर्थिक पुनर्वसन करून गुणवत्तेच्या आधारे परिस्थिती जन्य पुरावे गोळा करून दोषारोपपत्र मे.विशेष न्यायालयात दाखल करण्यापूर्वी पोलीस अधीक्षक कोल्हापूर परीक्षेत्र नागरी हक्क संरक्षण यांच्याकडे पाठवून त्यांनी सांगितलेल्या त्रुटींची पूर्तता करूनच दोषारोपपत्र मे.विशेष न्यायालयात दाखल करावे.उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण हे जर तपासात कसुरी करीत असल्यास त्यांच्याकडून तपास काढून सातारा जिल्ह्यातील इतर कर्तव्यदक्ष डी.वाय.एस.पी यांच्याकडे देण्यात यावा.अशा
मागण्या केल्या.
ऍड.सुजित नीकाळजे यांनी पीडित कुटुंबास कायदेशीर सल्ला देत सर्वतोपरी कायदेशीर मदत करण्याचे आश्वासन दिले.
सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी यांनी पीडित कुटुंबांच्या मागण्या व संस्था संघटनेच्या मागण्या जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.
यावेळी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे जेष्ठ नेते व जिल्हाध्यक्ष निवृत्ती तात्या रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव वैभव गिते,ऍड.सुजित निकाळजे,सातारा जिल्हा उपाध्यक्ष सचिन मोरे,फलटण तालुका अध्यक्ष सागर आढाव,ऑल इंडिया पँथर सेनेचे इंदापूर ता.अध्यक्ष निलेश खरात,वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड,केंद्रीय पत्रकार संघटनेची टीम घटनास्थळी उपस्थित होती. या संदर्भात माहिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय झेंडे यांनी दिली

मुसळधार पावसाचे पाणी घरात घुसल्याने नुकसान झालेल्या कुटुंबांना शासनाने सरसकट 50 हजार व जीवितहानी झालेल्यांना 10 लाख रुपये अनुदान द्यावे………वैभव गिते

धार पावसाचे पाणी घरात घुसल्याने नुकसान झालेल्या कुटुंबांना शासनाने सरसकट 50 हजार व जीवितहानी झालेल्यांना 10 लाख रुपये अनुदान द्यावे………वैभव गिते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क राज्यात अतिवृष्टीमुळे नदीकाठावरील गावांमध्ये/घरांमध्ये पावसाचे,नदीचे,ओढ्याचे पाणी घरात व घराच्या भोवती शिरल्याने अनेक कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले आहे.पावसाची तीव्रता एवढी आहे की शेती आहे का नदी हे ओळखणेसुद्धा कठीण झाले आहे.काही पाळीव जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत.तर काहींच्या घरात पाणी घुसल्याने संसारउपयोगी साहित्य,कागदपत्रे नष्ट झाली आहेत.काही ठिकाणी घरे उध्वस्त झाली.काही ठिकाणी अर्धवट पडलेली आहेत.मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्यात पोहत आहेत.तर काहींच्या शेतातील मातीसुद्धा वाहून गेल्याचे दिसत आहे.नेहमीप्रमाणे शासनाचा गलथान कारभार दिसून आला.आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या गावांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना दिली नाही.सतर्कतेचा इशारा दिला नाही.तेथील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले नाही.त्यामुळे ज्याठिकाणी शासनाच्या हलगर्जीपणामुळे जीवितहानी झाली असेल त्या ठिकाणच्या मंडलअधिकारी, व संबंधित कर्मचारी यांना जबाबदार धरून निलंबित करावे.सरसकट पंचनामे करून सर्व कुटुंबांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे अनुदान द्यावे.व जीवित हानी झाली असल्यास प्रत्येक कुटुंबास 10 लाख रुपये द्यावेत.अन्यथा आम्ही नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे) या संघटनेच्या वतीने माळशिरस तहसील कार्यालय येथे दिनांक 20/10/2020 रोजी तीव्र आंदोलन करणार आहोत याची नोंद घ्यावी असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे.अशी माहिती नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

You may have missed