प्रमोद शिंदे

रणजीत कागदे यांना पीएच.डी.प्रदान


माळशिरस तालुक्यातील दसूर गावचे रणजीत भारत कागदे यांना संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयात पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली.
दसूर येथील रणजीत कागदे हे मुंबई येथील आंतरराष्ट्रीय कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत आहेत. त्यांनी वेलटेक युनिव्हर्सिटी चेन्नई येथून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम विथ रिस्क लेव्हल इव्हॅल्युएशन इन वायरलेस सेन्सर नेटवर्क युजींग ऑप्टिमायझेशन असिस्टेड डिप लर्निंग मेथडस् या विषयामध्ये पीएच.डी पूर्ण केली. यामध्ये त्यांना प्राध्यापक आणि संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ.एन विजयराज यांनी मार्गदर्शन केले. कागदे यांनी एक आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये शोधनिबंध सादर केला. त्यांचे पाच शोधनिबंध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दसूर, माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण सदाशिवराव माने महाविद्यालय अकलूज, पदवी शिक्षण बी.ई. (संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी), स्वेरी, कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पंढरपूर येथे तर पदव्युत्तर शिक्षण: एम.ई. (संगणक अभियांत्रिकी), सिंहगड इन्स्टिटयूट, पुणे येथे झाले आहे.
कागदे यांच्या या यशाबद्दल दसूर गावासह तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

नितेश माने वाढदिवसानिमित्त261 जणांनी केले रक्तदान

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

नातेपुते येथे नितेश माने यांच्या वाढदिवसानिम्मित संयुक्त प्रतिष्ठान नातेपुते च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. 31 डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा दिवस लोकांचा पार्टी करण्याचा,एन्जॉय करण्याच्या दिवस तरी पण शिना माने यांचा तालुक्यात असलेला दांडगा जनसंपर्क च्या जोरावर 261जनानी रक्तदान करून अतिशय स्तुत्य असा उपक्रम राबवला.या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध मान्यवरांनी उपस्थिती दाखवली.रक्तदान 7:30 वाजता संपल्या नंतर ही मित्र परिवार रक्तदान करण्यासाठी येत होताच पण वेळेअभावी त्यांना रक्तदान करता आले नाही.हा कार्यक्रम यशस्वी होण्या साठी संयुक्त प्रतिष्ठान च्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम  घेतले या कार्यक्रमासाठी ज्ञानदीप ब्लड बँकेचे विशेष सहकार्य लाभले.

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकावर नातेपुते पोलिसांकडून कारवाई

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

नातेपुते पोलीस ठाणे अंतर्गत आगामी नवीन वर्षाच्या अनुषंगाने सर्व वाहनधारकाने ” वाहतुकीचे नियम पाळावे व अपघात टाळावे ” तसेच जे वाहनधारक हे वाहतुकीचे नियम पाळत नाहीत आशा वाहनधारकावर वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याने खालील प्रमाणे कारवाई करण्यात आलेले आहे
1) वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे 13 केसेस 13,000/ दंड
2) विना हेल्मेट वाहन चालविणे 58 केसेस 58,000,/हजार रुपये दंड3) ट्रिपल सीट वाहन चालवणे 28 केसेस 28,000/ हजार रुपये दंड4) वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने वाहने रस्त्यावर उभा करणे 40 गुन्हे दाखल केले.वाहनधारकाने रस्त्यावर चालताना वाहतुकीचे नियम पाळले नाही म्हणून मोटर वाहना अधिनियम अन्वये 2115 किसेस करून जवळपास 12,25,400/- रुपयापर्यंत दंड आकारणी केलेली आहे तसेच मध्य प्राशन करून वाहन चालवले म्हणून 22 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तसेच आगामी नवीन वर्ष स्वागत अनुषंगाने काही वाहनधारक हे दारू पिऊन गाडी चालवतात आशा तळी रामावर नातेपुते पोलीस स्टेशन मार्फत वेगवेगळ्या पथके नेमलेले असुन त्यामध्ये Api महारुद्र परजने, psi विक्रांत दिघे , पोलीस कॉन्स्टेबल , विश्वास जानकर, सुधीर हंगे, गणेश कुलकर्णी, रमेश करचे ,सोमनाथ मोहिते, सचिन चव्हान अमलदार , अधिकाऱ्यांची पथके नेमलेले असून सक्त करवाई करण्यात येत आहेत याबाबत नातेपुते पोलीस स्टेशनचे पोलीस API महारुद्र परजने यांनी माहिती दिली.

जय भीम शिवपालक अध्यक्ष आमचा लढवय्या नेता गेला- वैभव गीते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-
धनाजी तुकाराम शिवपालक यांचा दिनांक 25/12/2024 रोजी पहाटे 5.30 च्या सुमारास
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. रक्षा विसर्जन दिनांक 27/12/2024 रोजी सकाळी 7.30 वाजत होणार आहे.
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष व आंबेडकरी चळवळीचे नेते धनाजी शिवपालक यांच्या अकाली अचानक झालेल्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. असे उद्गार राज्य महासचिव
ऍड. डॉ. केवलजी उके यांनी श्रद्धांजली पर मनोगतात सांगीतले.
सोलापूर जिल्हा अध्यक्ष पंकज काटे यांनी सांगितले की आमचे नेते सोलापूर जिल्ह्याचा बुलंद आवाज,ढाण्या वाघ,
धनाजी शिवपालक यांच्या निधनाच्या नंतर आम्ही शिवपलक यांच्या कुटुंबीयांच्या सोबत शेवट पर्यंत आहोत.
सर्वांनी पार्थिवाचे अंतीम दर्शन घेतले.
धनाजी शिवपालक यांच्यासारखा निस्वार्थी वाघासारखा लढणारा शेवटपर्यंत साथ देणारा मित्रत्व जपणारा नेता आम्ही हरवला आहे… असे उदगार आंबेडकरी चळवळीचे नेते व उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य विकास दादा धाईंजे यांनी काढले.
यावेळी मुंबईहुन उद्योजक सामजिक कार्यकर्ते विनोद जाधव व मुंबई प्रदेश सचिव शशीभाऊ खंडागळे, ऍड.सुमित सावंत,महेश शिंदे मैत्री प्रतिष्ठान अध्यक्ष हे उपस्थित होते. त्यांनीही शिवपालक यांना श्रद्धांजली दिली. हजारो जनसमुदायांच्या उपस्थितीत अग्नी देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले संविधान वय 10 वर्ष अनिरुद्ध 6 वर्ष अशी मुलांची नावे आहेत.
धनाजी शिवपालक हे अन्याय अत्याचाराच्या विरोध लढणारे एक लढवय्या योद्धा होते. सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क होता.
धनाजी शिवपालक हे मातंग व बौद्ध समाजाला जोडणारा मौल्यवान महत्त्वाचा दुवा होते. सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांच्या अडचणीमध्ये धावून जाऊन त्यांच्या अडचणी सोडवणे हा शिवपालक यांच्या स्वभावाचा एक भाग होता. आपल्या स्वभावाने माणसांना जोडत राहणे हा त्यांचा विशेष गुण होता.
उंबरे पागे तालुका पंढरपूर या गावात बौद्ध मातंग दलितांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता हा अन्याय धनाजी शिवपालक यांनी मोडून काढला शिवपालक यांनी मंदिर प्रवेश करून मंदिर सर्वांसाठी खुले केले होते. पण ते स्वतः कधीही मंदिरात जात नव्हते.जे मंदिर सर्व समाजासाठी खुले आहे फक्त दलितांना सोडून ही बाब त्यांना खटकत होती. तहसील कार्यालय पंढरपूर जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे धरणे आंदोलने मोर्चे काढून अनेक आंदोलन त्यांनी यशस्वी केली.
त्यामुळे धनाजी शिवपालक यांना समाजभूषण पुरस्कार,
फुले शाहू आंबेडकर पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने वाशिम येथे घेण्यात आलेल्या महाअधीवेशन दरम्यान धनाजी शिवपालक यांना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हा मानाचा पुरस्कार बहाल करण्यात आला होता.
सोलापूर जिल्ह्यात बौद्ध मातंग चर्मकार होलार व अनुसूचित जाती अनुसूचित जमातींचे अकरा खून प्रकरणांमध्ये पीडित कुटुंबीयांना शासकीय नोकरी जमीन व पेन्शन मिळवून देण्यात धनाजी शिवपालक यांचा सिंहाचा वाटा होता. अनेक आंदोलन मध्ये सक्रिय सहभाग सिंहगर्जना केल्यासारखे भाषण, वाघाच्या डरकळ्या फोडल्यासारख्या महापुरुषांच्या घोषणा धणाजी शिवपालक द्यायचे.. आझाद मैदान मुंबई येथे देखील त्यांनी ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंमलबजावणीसाठी कंटिजंसी प्लॅन लागू होण्यासाठी आंदोलन केले होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखील पंढरपूर तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा झाल्याच्या नंतर संविधानाचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी धनाजी शिवपाल हे सज्ज झाले होते. भारतीय संविधान व बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा बारकाईने अभ्यास त्यांचा चालू होता.
धनाजी शिवपालक यांचे ऐतिहासिक सामाजिक कार्य पाहून शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने धनाजी शिवपालक यांना सोलापूर जिल्ह्याच्या सर्व शासकीय उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती वरती सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.
प्रांत,तहसीलदार,डी.वाय.एस.पी,पोलीस निरीक्षक यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलणे शासन निर्णय,परिपत्रकाचे दाखले देणे व गोरगरिबांची कामे करणे यामध्ये शिवपालक यांचा हातकंडा होता. अनेक नव्याने आंबेडकरी चळवळीत आलेल्या कार्यकर्त्यांसाठी शिवपालक एक ऊर्जा स्त्रोत होते. नवख्या पदाधिकाऱ्यांना नवख्या नेत्यांना शिवपालक नेहमी मार्गदर्शन करायचे.

माझ्या खांद्याला खांदा लावून मी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे चोख बजावने, माझा शब्द खाली न पडू देने, माझ्या सुरक्षेची काळजी घेणे, असा ऑलराऊंडर नेता आज आमच्यात राहिला नाही. परंतु त्यांनी केलेले सामाजिक कार्य हे कायम अमर राहील.
धनाजी शिवपालक यांचा जन्म मातंग समाजामध्ये झाला. मातंग समाजाला आंबेडकर वाद शिकवणारा संविधान समजावून सांगणारा, मातंग व बौद्ध या दोन्ही समाजामध्ये समन्वय साधनारा सामंजस्य निर्माण करणारा कोहिनूर हिरा म्हणजे धनाजी शिवपालक होय.
सकाळी उठले की जय भिम, झोपताना जय भीम, जय भीम हा शब्द म्हणजे शिवपालक यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला.
मी महाराष्ट्रातली अनेक हत्या व हत्याकांड पाहिले आहेत. अनेक प्रकारच्या केसेस हाताळले आहेत परंतु माझ्या डोळ्यात कधी पाणी आणले नाही. आज धनाजी शिवपालक यांनी या दगडासारख्या मनाच्या माणसाच्या डोळ्यातून पाणी आणले.

माणुस किती दिवस जगला यापेक्षा तो कसा जगला हे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य धनाजी शिवपालक यांच्यासाठी तंतोतंत लागु होते.

वैभव तानाजी गिते
राज्य सचिव नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस
सदस्य जिल्हा दक्षता व संनियंत्रण समिती पुणे
8484849480

श्री अंकुश भाऊ सुर्वे यांच्या जयंतीनिमित्त नातेपुते येथे विविध उपक्रम नातेपुते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे

श्री अंकुश भाऊ सुर्वे फाउंडेशन व विनायक सुर्वे मित्रपरिवार नातेपुते यांचे मार्फत मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी अंकुश भाऊ सुर्वे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये रक्तदान वृक्षारोपण जि. प . प्राथमिक शाळांना साहित्य वाटप करण्यात आले.कै. अंकुश सुर्वे यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. जनसामान्य लोकांना मोठा आधार दिला .त्यांचे कार्य दीपस्तंभ सारखे आहे.असे प्रतिपादन माजी आमदार आर. जी. रुपनवर यांनी केले .अंकुशभाऊ सुर्वे प्रतिष्ठान आणि विनायक भैय्या सुर्वे मित्रपरिवार यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर व शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमात ते बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहाजीराव उर्फ बाबाराजे देशमुख होते. पुढे बोलताना रुपनवर यांनी अंकुश सुर्वे यांच्या अनेक आठवणी, अनेक समाज उपयोगी कार्यावर प्रकाश टाकला .यावेळी बोलताना बाबाराजे देशमुख म्हणाले, स्वतःची गरीब परिस्थिती असतानाही अंकुश सुर्वे यांनी अनेकांना मदतीचा हात पुढे केला. लोकांच्या साध्या साध्या अडीअडचणी ते भागवत असत . बी.वाय. राऊत म्हणाले, अंकुशभाऊ लोकांच्या उपयोगी पडत असत. त्यामुळे त्यांचे जीवन हा आपल्या सर्वांच्या पुढे एक आदर्श आहे.  विनायक सुर्वे यांनीही त्याच्या वडिलांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला आहे. कै. अंकुश सुर्वे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ८६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रतिष्ठानच्या वतीने नातेपुते गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी दोन एलईडी टीव्ही, तीन प्रिंटर, तीन ग्रीन बोर्ड ,शाळांचे रंगकाम याचबरोबर या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना  स्पोर्ट ड्रेस, तसेच इतर शालोपयोगी साहित्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. एलईडी टीव्ही नगराध्यक्ष अनिता लांडगे आणि नगरसेविका शर्मिला चांगण यांनी उपलब्ध करून दिले. यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांनी विचार प्रवर्तक असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. विद्यार्थ्यांच्या रंगभरण, चित्रकला स्पर्धा ,तसेच वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते .या सर्व विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा अनिता लांडगे ऋतुजा मोरे , शिक्षण विस्तार अधिकारी सुषमा महामुनी ,एड.बी वाय राऊत, धैर्यशील देशमुख , ,माऊली पाटील, सतीश सपकाळ अर्जुन जठार, अतुल बावकर, रावसाहेब पांढरे ,अमित चांगण शशिकांत कल्याणी ,राहुल पद्मन हे उपस्थित होते. औदुंबर बुधावले व संदीप जाधव यांनी सूत्रसंचालन केले आभार विनायक सुर्वे यांनी मानले.

माळशिरस वकिलांकडून संविधानाच्या जागृतीसाठी राज्यस्तरीय पथनाट्य आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन

पुरोगामी महाराष्ट्र नेटवर्क- प्रमोद शिंदे

जागर संविधानाचा अभियानाअंतर्गत भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय पथनाट्य व रांगोळी स्पर्धा २०२४ या स्पर्धेचे आयोजन माळशिरस वकिलामार्फत करण्यात आले असून त्याची सूरवात वकिल संघटनेचे अध्यक्ष सौ. मोहिनी देव यांच्या हस्ते माळशिरस वकिल संघटनेच्या कार्यालयात झाले असून
पथनाट्य स्पर्धेसाठी
पहिले बक्षीस : १०,०००/-
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्रदुसरे बक्षीस : ७,०००/-
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्रतिसरे बक्षीस : ५,०००/-
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्ररांगोळी स्पर्धेसाठीपहिले बक्षीस : 1HP आटा चक्की
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्रदूसरे बक्षीस : मिक्सर ग्राईंडर
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्रतिसरे बक्षीस : डिनर सेट
स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
प्रवेश विनामुल्य राहणार असून स्पर्धकांना वयाची व शिक्षणाची अट नाही
नाव नोदणी ची अंतिम तारीख 15 जानेवारी 2025 असून
स्पर्धा ही दि. १९/०१/२०२५ रोजी सकाळी ९.०० वा. माळशिरस येथे सुरू होईल व स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण दि.२५/०१/२०२५ रोजी करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला / संघाला प्रमाणपन्न देण्यात आल्याची माहिती आयोजक समितीचे ॲड. सुमित सावंत आणि ॲड. धनंजय बाबर यांनी दिली आहे.आयोजक समिती मध्ये
ॲड. सुनिता सातपुते, ॲड. रजनी गाडे-सोनवळ, ॲड. धनंजय बाबर, ॲड. अमृत भोसले ॲड. सुमित सावंत, ॲड. भारत गोरवे, ॲड. नितीन भोसले, ॲड. वैभव धाईजे, ॲड. अजिंक्य नवगिरे ॲड. सुयश सावंत, ॲड. धैर्यशिल भोसले, ॲड. वैशाली कांबळे, ॲड. मनोज धाईंजे ॲड. अभिषेक चंदनशिवे, ॲड. निलेश जाधव, ॲड. दत्तात्रय सावंत व सर्व सन्माननीय माळशिरस वकील संघटना सदस्य, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांचा समावेश आहे.संपर्कॲड. सुमित सावंत मो. 9970944991ॲड. भारत गोरवे
मो.9850736190ॲड. सुयश सावंत मो.848384404ॲड. वैशाली कांबळे
मो.8329525003

रत्नत्रयइंग्लिश स्कूल मध्ये फळ वाटपाचा स्तुत्य उपक्रम

 पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क-प्रमोद शिंदे

 मांडवे येथील रत्नत्रय शैक्षणिक संकुलात फळवाटपाचा स्तुत्य उपक्रम प्रत्येक शनिवारी राबविला जातो. त्यामुळे लहान मुलांना   लहापणापासूनच फळे खाण्याची सवय लागावी यासाठी हा स्तुत्य उपक्रम प्रत्येक शनिवारी शाळेमध्ये घेण्यात येतो. नियमित फळांचे सेवन केल्याने पचनशक्ती वाढते,  त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचा हा उपक्रम घेण्यामागचा प्रमुख हेतू म्हणजे मुलांमध्ये असणारे कला गुण दर्शविण्याची त्यांना संधी उपलब्ध करून देणे. मुलांमध्ये स्टेज डेरिंग निर्माण करणे हा आहे.  या दरम्यान मुलांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम, प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. सदर प्रसंगी    सचिन लवटे ,  राहुल लवटे,  रघुनाथ वाघमोडे,  अरुण वाघमोडे, जतेंद्र निंबाळकर,  ज्योतीराम शिंदे, सौ माधुरी शिंदे, सौ रूपाली शिंदे, सौ पूनम खांडेकर, सौ ताराबाई वाघमोडे, सौ दिपाली वाघमोडे, सौ सोनाली वाघमोडे, सौ निकिता सोनवणे, सौ प्रतीक्षा सोनवणे,  उपस्थित होते.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मेघा सुतार मॅडम यांनी केले.फळवाटप दातार:श्री शशिकांत पंडित सर.

मारकडवाडी येथे जमावबंदी आदेश न पाळणाऱ्यां 89 जणांसह आमदार उत्तमराव जानकर व इतर लोकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-

 मारकडवाडी चाचणी मतदान करण्यासाठी येथील ग्रामस्थांनी फेर चाचणी मतदान येण्याची मागणी तहसीलदार निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली होती परंतु निवडणूक अधिकारी यांच्याकडून ही मागणी फेटाळण्यात आली होती तरीसुद्धा मतदान केल्यावर ग्रामस्थ ठाम होते. वर पोलीस प्रशासन यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व अनुचित प्रकार घडू नय म्हणून 163 अन्वय नाव बंदी आदेश लागू करण्यात आला होता. तरीसुद्धा या आदेशाला नजुमानता आदेशाचे पालन न करता लोक एकत्र आल्याने पोलीस प्रशासनाने 89 जनांसह आमदार उत्तमराव जानकर व इतर लोकांवर गुन्हे दाखल केली आहे. याबाबतची प्रेस नोट सुद्धा जारी केली आहे.प्रेस नोट मध्ये अशाप्रकारे नमूद केले की, मौजे मारकडवाडी ता. माळशिरस गावातील ग्रामस्थ यांनी मा. तहसीलदार सो. यांना आमचे गावातील मतमोजणी योग्य पध्दतीने झाले नसुन आम्हाला ईव्हीएम मशिनवर संशय आसल्याने आम्हाला बैलेट पेपरवर फेर मतदान होणेबाबत परवानगी मिळावी. याकरिता अर्ज करण्यात आला होता. सदर अर्जावर मा. तहसिलदार सो व प्रांतअधिकारी सो. अकलूज यांचे कार्यालयाकडुन कळविण्यात आले की २५४ माळशिरस (अजा) विधानसभा निवडणुकीची प्रक्रीया दिनांक २३/११/२०२४ रोजी पार पडली असुन अशा पध्दतीने कोणत्याही गावाला फेर मतदान प्रक्रिया करता येणार नाही याबाबत स्पष्ट कळविले असुनही मारकडवाडी गावातील ग्रामस्थ हे मिडीया मार्फत दिनांक ०३/१२/२०२४ रोजी मतदान प्रक्रिया घेण्यावर ठाम होते. गावातील ग्रामस्त यांना पोलीस प्रशासनाने वारंवार अशा पध्दतीन आपण फेर मतदार प्रक्रिया पार पाडु नये याबाबत अवाहन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने मा. उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलुजघटना दिनांक-०२/१२/२०२४ ०५/१२/२०२४ या दरम्यान भारतीय संहिता २०२३ चे कलम१६३ अन्वये मौजे मारकडवाडी या गावात जमावबंदी करण्यात आली होती. परंतु सदर गावातील ग्रामस्तयांनी मारकडवाडी गावात सकार्की ०७/०० वाजलेपासुन सुमारे २५० ते ३०० अंदाजे लोकांचा बेकायदेशीरजमाव जमवुन बैलेट पेपरवर मतदान करण्याची प्रक्रीया राबवण्याची तयारी केली होती. सदर अनुषंगाने तेथेमा. मा. उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलुज यांचे आदेशान्वयेकायदा व सुव्यवस्था कामी महसुल नायब तहसिलदार श्री सिध्दनाथ विठठल जावीर तहसील कार्यालयमाळशिरस यांची नेमणुक करण्यात आली होती त्यांचे फिर्यादीवरून इसम नामे १) गौतम आबा माने रा.कन्हेर ता. माळशिरस, २) बाबा माने रा कन्हेर, ३) मारुती देशमुख रा माळशिरस, ४) युवराज झंजे रा मेडद५) विष्णु नारणवर रा उंबरे दहिगाव ६) शामराव बंडगर रा तिरवंडी ७) कालिदास रुपनवर, ८) भानुदाससालगुडे रा सदाशिवनगर, ९) तुकाराम ठवरे रा खुडुस १०) बाजी माने रा कन्हेर, ११) दादा माने राकन्हेर, १२) हनुमंत सरगर रा कचरेवाडी, १३) पांडुरंग वाघमोडे रा माळशिरस, १४) सोमनाथ पिसे रा पुरंदावडे१५) माणिक एकनाथ वाघमोडे रा माळशिरस, १६) हनुमंत ठवरे रा खुडुस, १७) तुकाराम देशमुख रामाळशिरस, १८) जावेद मुलाणी, १९) अजय सकट २०) आनंदा विष्णु मारकड रा मारकडवाडी २१) रणजितसरवदे, २२) रजनिश बनसोडे २३) साजन माने देशमुख २४) संतोष माने २५) अभिजीत साठे, २६) हनुमंतवायदंडे २७) हनुमंत भाऊ शेंडगे २८) बापु मुंगुसकर २९) स्वप्निल पवार सर्वे रा. वेळापुर ३०) स्वप्निलदत्तात्रय वाघमारे रा बागेचीवाडी अकलुज. ३१) रामा शेंडगे रा वेळापुर, ३२) बापु गायकवाड रापिसेवाडी, ३३) बाबा तुपे रा वेळापुर, ३४) जब्बार मुलाणी रा वेळापुर, ३५) मामा पांढरे रा नातेपुते, ३६) नाथारुपनवर रा डोंबाळवाडी, ३७) नाना शिंदे रा पिरळे, ३८) प्रकाश कदम रा कदमवाडी ३९) सुनिल भालचंद्रपाटील रा फोंडशिरस ४०) बंडु पाटील रा फोंडशिरस ४१) संतोष सोपान वाघमोडे रा माळशिरस ४२) माऊलीपाटील रा नातेपुते ४३) भिमराव नरुटे रा तामशिदवाडी ४४) विक्रम पाटील रा माळसिरस ४५) मनोज दडस राबांगर्डे ४६) आप्पासाहेब देशमुख रा माळशिरस ४७) सचिन सावंत रा दहिगाव ४८) सर्जेराव जानकर रामाळशिरस ४९) संतोष देशमुख रा माळशिरस ५०) संतोष बंडगर रा खुडुस ५१) पिनु पाटील रा फोंडशिरस५२) रोहिदास रणदिवे रा फॉडशिरस, ५३) किसन ढोबळे रा फोंडशिरस, ५४) रामा रणदिवे रा फोंडशिरसकोंडशिरस, ५५) दादा लाळगे रा नातेपुते ५६) वैभव दादा रणदिवे रा फोंडशिरस ५७) दिपक दादा रणदिवे रा फोडशिरस ५८) दिपक रामा रणदिवे रा फॉडशिरस, ५९) अशोक बंडगर रा पाटील वरती अकलुन ६०) मोहण बापुराव झंजे रा मेडद, ६१) आप्पासाहेब पंढरीनाथ वाघमोडे रा मारकडवाडी ६२) सागर तानाजी मारकड रा मारकडवाडी ६३) रामदास शिवाजी काळे रा माळशिरस ६४) समादान भाऊ भोसले रा माळशिरस ६५) जिवन चाळासाहेब देवकाते रा धानोरे वेळापुर ६६) आण्णा मारुती हाक्के रा धानोरे वेळापुर ६७) नाथा सुरेश देवकाते रा धानोरे वेळापुर ६८) काकासाहेब पांडुरंग घुले रा वटपळी माळशिरस ६९) रामभाऊ आण्णा शेंडगे रा वटपळ माळशिरस ७०) बाजी पंढरीनाथ वाघमोडे वटपळी माळशिरस ७१) हनुमंत ज्ञानेश्वर लाळगे रा नातेपुते ७२) राहुल बाबासो बंडगर रा तिरवंडी ७३) पोपट बाबुराव विर रा अकलुज ७४) शशिकांत मेघराम दिक्षीत रा अकलुज ७५) प्रविण रमेश बागल रा अकलुज ७६) संतोष बाबुराव वाघमोडे रा फोंडशिरस ७७) योगेश नारायण ढोबळे रा फोंडशिरस ७८) संतोष लक्ष्मण वाघमोडे रा फोडशिरस ७९) सचिन मधुकर जाधव रा पुरदावडे ८०) दादा ज्ञानदेव चव्हाण रा पुरदावडे ८१) राजेश विष्णु चव्हाण रा पुरदावडे. ८२) गणेश विजय मारकड रा मारकडवाडी.८३) सागर बिचुकले रा नातेपुते ८४) प्रेम देवकाते रा नातेपुते. ८५) राजाभाऊ रुपनवर रा एकशिव. ८६) मा. आमदार श्री. उत्तमराव शिवदास जानकर रा वेळापुर ८७) रणजित मारकड रा मारकडवाडी. ८८) तेजस पाटील रा धर्मपुरी ८९) शहाजी बाळु वाघमोडे रा मारकडवाडीता. माळशिरस जि. सोलापुर असे व इतर काही लोक हे सकाळी ०८.०० वाचे सुमारास मारकडवाडी गावातील ग्रामस्थ मतदान करण्यासाठी मौजे मारकडवाडी येथील ग्रामपंचायती समोर जमा होऊ लागले. तसेच त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी परगावाहुन लोक जमा झाले होते. त्यावेळेस वरील सर्व लोकांना आम्ही स्पिकर द्वारे जमावबंदीचा आदेश लागु असल्याचे पुन्हा पुकारले असता वरिल सर्व इसमांनी आप-आपसात व प्रशासनासोबत चर्चा केल्या नंतर त्यांनी ते आता चाचणी मतदान करणार नसले बाबत तोंडी कळवुन तेथुन निघुन गेले आहेत.म्हणुन वरील इसम यांचेविरूध्द दि. ०३/१२/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. ते ११.३० वा.चे दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय, मारकडवाडी ता. माळशिरस येथे मतदानासाठी व मतदानास पाठिंबा देण्यासाठी आलेले वरील सर्व इसम व इतर १०० ते १५०लोक जमा होऊन त्यांनी मा. उपविभागीय दंडाधिकारी, अकलुज यांचेकडील आदेश क्र. जबाबी/कावि-२२७५/२०२४अन्वये मौजे मारकडवाडी ता. माळशिरस जि. सोलापुर या गावच्या संपुर्ण क्षेत्रात दि ०२/१२/२०२४ रोजी सकाळी ०७.००वा. पासुन ते दि. ०५/१२/२०२४रोजी रात्री १२.०० वा. पर्यत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३चे कलम १६३ अन्वये जमावबंदी आदेश लागु असुन सुध्दा बेकायदेशीर जमाव जमवुन आदेशाचा भंग केला आहे म्हणुन नातेपुते पोलीस ठाणे गु.र.नं. ३९९/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम बी.एन.एस. सन २०२३चे कलम ,१८९(१),१८९(२),१९०, २२३ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशासनाच्या दडपशाहीमुळे मतदान प्रक्रिया थांबली-आमदार उत्तमराव जानकर

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क –


प्रशासनाच्या दडपशाहीमुळे मारकडवाडी येथील चाचणी मतदान प्रक्रिया थांबली गेली. पोलीस प्रशासनाच्या दबावामुळे लोक मतदानासाठी बाहेर पडू शकले नाहीत.पोलीस प्रशासनाने कलम 144 लागू करून लोकांवरती एक प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.अशा प्रकारचे प्रतिक्रिया उत्तमराव जानकर यांनी मारकडवाडी येथे दिली.  याबाबत हकीकत अशी की मारकडवडी येथील ग्रामस्थांनी  ईव्हीएम मशीन मध्ये मतदान प्रक्रियेत घोटाळा झाला असल्याचा आरोप करत प्रसार माध्यमांच्या समोर फेर मतदान घेण्याचे निवेदन तहसीलदार यांना दिले होते.त्यावर निवडणुका अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळला जरी असला तरी मतदान करण्याची भूमिका मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी घेतली होती. सकाळपासूनच उभारण्यात आले होते.व त्या बुथवर बॅलेट पेपर, मतदार यादी.निवडणुकी संदर्भातील सर्व साहित्य. ठेवण्यात आले होते.मतदान चालू होण्यापूर्वी. पोलीस प्रशासनाने वाय एस पी शिरगावकर यांनी येथील ग्रामस्थांना कलम १४४ लागू झाल्याचे सांगितले एक जरी मतदान झाले तर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.आशा प्रकारच्या सूचना ग्रामस्थांना दिल्या कायदा सुवेवस्था बिघडणार नाही. यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.शेवटी पोलीस प्रशासन व आमदार उत्तमराव जानकर  यांच्यात चर्चा झाली असता उत्तम जानकर व ग्रामस्थांनी चर्चा करून मतदान प्रक्रिया निर्णय मागे घेतला.उत्तमराव जानकर बोलताना म्हणाली की ही लढाई पुढे अशीच सुरू राहील यागोदर मी दोनदा निवडणूक लढवली व त्यामध्ये माझा पराभव झाला तरीसुद्धा मी आक्षेप घेतला नाही मी जरी निवडून आलो असलो तरी आत्ताच्या मतदान प्रक्रियेत ईव्हीएम मध्ये घोळ करण्यात आला आहे.असा देखील आमदार उत्तमराव जानकर यांनी आरोप केला आहे.येत्या पंधरा दिवसात त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे ही माध्यमांना सांगितले.

पोलिसांनी गोळ्या जरी झाडल्या तरी मतदान होणारच-उत्तमराव जानकर नातेपुते

पुरोगामी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रमोद शिंदे-


सध्या महाराष्ट्रात बहु चर्चित असलेले माळशिरस तालुक्यातील मरकडवडी  गावात तीन तारखेला फेर मतदान होण्यासाठी तणाव पूर्ण वातावरण निर्माण झाले असून माळशिरस विधानसभेचे नूतन आमदार उत्तमराव जानकर व ग्रामस्थ यांनी तटस्थ भूमिका घेतल्याचे पहावयास मिळत आहे. पत्रकारांची बोलताना उत्तमराव जानकर म्हणाले की पोलीस प्रशासनाने गोळ्या जरी घातल्या तरीसुद्धा मतदान होणारच असा पवित्रा घेतला आहे. ईव्हीएम मशीनने या मतदान प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून मतदान चाचणीच्या माध्यमातून त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही सत्य जनतेसमोर आलं पाहिजे अशीभूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे.त्याचबरोबर माजी आमदार आर.जी रुपनवर बोलताना म्हणाले शासनाने व निवडणूक योगाने  लोकांना नोटीसा देऊन दबाव टाकण्यापेक्षा मारकडवाडीतील गावाकऱ्यांची त्यामागची भावना काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. आंबेडकरी चळवळीचे नेते विकास धाईंजे म्हणाले मारकडवाडी येथील लोकांची भूमिका ही लोकशाही टिकवण्याच्या दृष्टिकोनातूनच पाऊल आहे.त्यामुळे मतपत्रिकेवरती मतदान व्हायला काय हरकत नाही.तसेच गावकऱ्यांनी सुद्धा काहीही झालं तरी मतदान करणारच अशी भूमिका या ठिकाणी व्यक्त केली आहे. मरकड वाडीत सध्या तणावपूर्ण वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त व फौज फाटा तैनात केला आहे.

You may have missed